‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातील शंतनू मानेचे पुढे काय झाले तुम्हाला माहित आहे का?

“छुपाना भी नही आता” हे गाणं आठवतयं. या गाण्यातील जो अभिनेता होता त्याबाबतची ही खबरबात. “अशी ही बनवाबनवी” ह्या चित्रपटाने त्या काळात रसिकप्रेक्षकांवर अचंबित असा प्रभाव पाडला असचं म्हणावं लागेल. हा चित्रपट आजही एव्हरग्रीन आहे. आजही अनेक वेळा सोशल मिडीयात या चित्रपटातील दृश्यांवर विनोदी पद्धतीने मेम्स तयार तर होतातच शिवाय अनेक जण काही सवांदाची मिमिक्रीही करतात.

“अशी ही बनवाबनवी” या चित्रपटात सर्व पात्रांची भुमिका अगदीच अप्रतिम आहे. या चित्रपटातील दोन तीन खास सवांद तुमचे सत्तर रूपये वारले किंवा इतर जसे की सिगारेटचे डोहाळे लागलेत असे भन्नाट विनोदी संवाद यात आहेतच शिवाय जीवण जगताना काय काय उठाठेवी कराव्या लागतात याची ग्वाही हाच चित्रपट देऊन जातो.

सचिन पिळगावकर, अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे यांसोबत या सिनेमात आणखी एका कलाकाराने आपलं काम बखुबी निभावलेलं आहे. शंतनू त्या पात्राच नाव. या पात्राची खास भुमिका वठवणारा कलाकार म्हणजे सिद्धार्थ रेने. १९७७ साली एका बालकलाकाराचा रोल करत त्याने सिनेसृष्टीत पाऊलं ठेवलं. त्यानंतर १९८० साल हे या कलाकारासाठी मोठ भाग्याचं ठरलं.

या वर्षी या अभिनेत्याने थेट पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासमवेत एक चित्रपट केला होता. पनाह, तिलक, चानी या अशा अनेक चित्रपटांची नोंद त्यांच्या नावे होईल. मनी रत्नम दिग्दर्शीत वंश या चित्रपटात पहिल्यांदाच प्रमुख भुमिकाही सिद्धार्थ रेनेनी केली. यानंतर खास म्हणजे, “बाझीगर” हा शाहरूखचा हीट सिनेमा. या सिनेमातही सहाय्यक अभिनेता म्हणून तो राहिला.

तमिळ व तेलुगू सुंदर असलेली अभिनेत्री म्हणजे, शांतीप्रिया. ती त्या काळात अगदी नावाजलेली होती. पुढे चालून “शांतीप्रिया” यांच्याशीच सिद्धार्थ रेनेनी लग्न केलं. अक्षय कुमारच्या सौगंध या एकमेव बाॅलिवूड सिनेमात त्या काळात शांतीप्रिया दिसली होती.

सिद्धार्थ रेने व शांतीप्रिया यांच्या लग्नाला तेव्हा जेमतेम 5 वर्ष झाली होती नी अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ यांचा वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांना पश्चात दोन मुले होती. पण त्यातील मुलाचा मृत्यू झाला अन पुढे शांतीप्रिया आपल्या मुलीसोबत राहिल्या. त्यांनी बऱ्याच काळ स्वत:ला अभिनयापासून दूर ठेवलं, परंतु सध्या त्या पुन्हा मालिकांमधून पुनरागमन करत असल्याची चर्चा जोर धरत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment