“अशी ही बनवाबनवी” फेम दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रे ची पत्नी दिसते खुपच सुंदर…. पहा तिचे काही फोटो..!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट आहेत, त्यांच्या काही खास अंदाजामुळे आजही रसिकांना गुंतवून ठेवतात. या चित्रपटातून अनेक कलाकार अजरामर झाले आहेत, म्हणून आज सुद्धा त्यांच्या आठवणीत त्यांच्या गाजलेल्या भूमिका भरपूर मनोरंजन करतात. असाच एक अभिनेता ज्याने मराठी चित्रपट सृष्टीतील प्रचंड विनोदी असलेल्या चित्रपटातून आपली एक निराळी ओळख मिळवली होती, आणि हीच ओळख आज सुद्धा अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवते. मित्रहो हा चित्रपट तुम्ही देखील पाहिला असेलच,”अशी ही बनवाबनवी” हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय आहे.

या चित्रपटात खूपशा खास जोड्या भेटीस आल्या होत्या, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे, सचिन पिळगावकर, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर यांच्या सोबत अनेक कलाकार या चित्रपटात झळकले होते. हा चित्रपट इतका गाजला आहे की प्रेक्षकांना आज देखील यातील एक न एक डॉयलॉग अगदी तोंडपाठ आहे. शिवाय यातील सर्व गाणी सुद्धा मन वेधून घेतात, गाण्यातील बोल, लय, ताल, सूर अगदी सर्वकाही लक्षवेधी आहे. यातीलच एक भूमिका आज आपण चर्चा करणार आहोत, ही भूमिका आहे चित्रपटातील धनंजय माने यांच्या लहान भावाची म्हणजेच शंतनू माने याची.

See also  नुकत्याच दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकलेल्या मराठी अभिनेत्रीचा डान्स व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया...

मित्रहो आपण सर्वजण जाणून आहोतच की या चित्रपटात शंतनूची भूमिका किती आकर्षक आहे, ही भूमिका अभिनेते सिद्धार्थ रे यांनी साकारली होती. त्यांनी १९७७ मध्ये आलेल्या “चानी” या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर १९८० मध्ये “थोडीसी बेवफाई” या चित्रपटातून थेट अभिनेता म्हणून पडद्यावर पदार्पण केलं होतं. हा चित्रपट त्यांच्यासाठी खूप खास ठरला, कारण यामध्ये त्यांना पद्मिनी कोल्हापूरे यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली होती. नंतर ९० च्या दशकात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केले होते.

सिद्धार्थ यांनी १९९९ मध्ये लोकप्रिय अभिनेत्री शांतीप्रिया हिच्याशी विवाह केला होता. शांतीप्रिया यांनी तमिळ आणि हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. एक कलाकार म्हणून शांतीप्रिया उत्कृष्ट आहेत. शिवाय त्यांची सुंदरता देखील अनेकांना आकर्षित करणारी आहे. अक्षय कुमारच्या “सौगंध” या पहिल्याच चित्रपटात शांतीप्रिया अभिनेत्री होत्या. त्या साऊथची अभिनेत्री भानुप्रिया यांची लहान बहीण आहेत, शांतीप्रिया आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाला अवघे पाच वर्षे लोटली होती. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते.

See also  लेकीला निरोप देत या अभिनेत्याने टाकली पोस्ट... "पिल्लू निघालं वैमानिक व्हायला"..

मात्र नियतीला काही वेगळाच निर्णय घ्यायचा होता, म्हणून तर अचानक ८ मार्च २००४ रोजी वयाच्या ४१व्या वर्षी सिद्धार्थ यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या दांपत्याला दोन मुले सुद्धा आहेत, मुलाचे नाव शुभम आणि मुलीचे नाव शिष्या आहे. सिद्धार्थ गेल्यावर हार न मानता पुन्हा जोमाने उठून शांतीप्रिया ने आपल्या आई असल्याची सर्व कर्तव्य पार पाडली. त्यांनी दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण दिले व त्यांचा सांभाळ केला. सिद्धार्थ रे जरी आपल्या मध्ये नसले तरीही त्यांच्या अनेक भूमिका नेहमी त्यांना जिवंत ठेवतात व त्यांच्या आठवणींना खतपाणी घालतात. त्यामुळे त्यांच्या आठवणी अशाच उमलत राहो ही सदिच्छा. मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

See also  तृप्ती देसाई बिग बॉस मराठीतून बाहेर आणि आता करणार राजकारणात प्रवेश! तयारी सुरू...
Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment