या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, खूपच सुंदर आहे त्यांची जोडी…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी हिंदी, तमिळ, कन्नड, बंगाली, इंग्रजी, ओङिसा आणि मल्ल्याळम व मराठी इ. भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते फक्त एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते तर खूप चांगले मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहेत.
त्यांनी आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटांत काम केले आहे. त्यांना द्रोहकाल या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आज आम्ही तुम्हांला त्यांच्या आयुष्यातील काही स्पेशल गोष्टी सांगणार आहोत.
आशिष विद्यार्थी यांचा जन्म केरळ मध्ये झाला असून त्यांच्या आई ह्या प्रसिद्ध कथ्थक नर्तिका होत्या. आपल्या कॉलेज जीवनात असल्यापासूनच त्यांनी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. तसेच नॅशनल स्कूल ऑफ ङ्रामा मध्ये सुद्धा त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले आहेत.
‘सरदार’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलीवुड मधील आपल्या करियरला सुरूवात केली. सरदार या चित्रपटाचे शूटिंग आधी झाले असले, तरी त्यांचा द्रोहकाल हा चित्रपट पहीला रिलीज झाला. या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच जोमात गाजली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
आजपर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या नकारात्मक भूमिकांना मात्र प्रेक्षकांकडून हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही. 1942 अ लव्ह स्टोरी, इस रात की सुबह नहीं, जिद्ददी आणि जीत या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे भरपूर कौतुक केले गेले. त्यांनी अल्ट बालाजीच्या मिशन ओव्हर मार्स या वेबसिरीज मध्ये सुद्धा काम केले आहे.
अभिनेता आशिष विद्यार्थी हा अनेक वर्षे बॉलीवुड इंडस्ट्रीचा भाग असला तरीही त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूप कमी लोकांना माहीत आहे. आपल्या मुलाखतीमध्ये सुद्धा ते वैयक्तिक जीवनाविषयी बोलणे टाळतात. तुम्हांला ठाऊक आहे का, आशिष विद्यार्थी यांचे लग्न एका अभिनेत्री सोबत झाले. त्यांची पत्नी ही बंगाली इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.
या दाम्पत्याचे लग्न अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मूलगी राजोशी बरुआ यांच्यासोबत झाले आहे. अभिनेत्री राजोशी हिने आतापर्यंत अनेक बंगाली मालिकांमध्ये काम केले आहे. टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध मालिका “सुहानी सी एक लङकी” या हिंदी मालिकेतील तिच्या मालिकेचे खूप कौतुक झाले होते. आता या गोङ दाम्पत्याला एक अर्थ नावाचा मुलगा सुद्धा आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.