नाना पटोलांच्या स्वबळाच्या नार्‍यावर अशोक चव्हाणांची धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नांदेड: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षात सर्व काही ठीक सुरू आहे असं दिसत नाही. यास कारण म्हणजे कॉंग्रेस कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संधी मिळेल तेव्हा स्वबळावर निवडणूक लढवणार असलायचे वक्तव्य करत आहेत. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही असं विरोधी पक्षातील नेते म्हणत आहेत.

अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया…

या प्रकरणावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांच्याकडून आश्चर्यकारक उत्तर मिळाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आज नांदेडमध्ये होते. पत्रकारांनी त्यांना गाठून नाना पटोले यांच्या स्वबळावर निवडणुका लढणार असल्याच्या विधानावर त्यांचे मत विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले, “नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिलाय याबाबत मला काही माहिती नाही.” त्यांचं उत्तर ऐकून पत्रकारही आश्चर्यचकित झाले. यामुळे कॉंग्रेस मध्ये दोन गट पडले की काय? या चर्चेला उधाण आले आहे.

See also  कोरोनातून बरे झाल्यानंतर हा भ'यंकर रो'ग घेतोय जीव, राज्य सरकारने पहिल्यांदाच दिली कबुली...

हा विषय इथेच संपला असून महाविकास आघाडी सरकार पूर्ण 5 वर्षे टिकेल असा दावाही अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.

पटोले नेमकं काय म्हणाले?

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासूनच नाना पटोले कॉंग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे बोलत आहेत. निवडणुकांना अजूनही 3 वर्षे बाकी असताना नाना पटोले यांच्या विधांनामुळे अनेक चर्चांना उधाण येत आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की, “स्वबळावर लढायचे की नाही याबाबत आम्ही पक्षाची स्ट्रॅटेजी बनवत आहोत. आम्ही अनेक वेळा ठेच खाल्ली असल्यामुळे यावेळी पूर्ण तयारीनिशी उभे राहणार आहोत.”

राष्ट्रवादी कॉंग्रेसवर विश्वासघाताचा आरोप करत नाना पटोले म्हणाले की, “2014 मध्ये ऐनवेळी राष्ट्रवादीने आमच्यासोबत विश्वासघात केला. तसा विश्वासघात पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण तयारीनिशी उभे राहणार आहोत.“

See also  पोलिस भरती होताना शपथ घेतलीये.. मग आत्ता कोरोनाला घाबरुन सुट्टी काढुन घरी गावाला का जायचं...

स्वबळावर लढायचे की नाही ते सोनिया आणि राहुल गांधी ठरवतील…

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही नाना पटोले यांच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर चिमटा काढला आहे. कॉंग्रेस स्वबळावर लढेल की नाही? हे सोनिया आणि राहुल गांधी ठरवतील असा टोमणा मारला आहे. तसेच शरद पवार यांनीही नाना पटोले यांचे वक्तव्य आम्ही मनावर घेत नसल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment