‘अग्ग बाई सासूबाई’ फेम सोहम म्हणजेच आशुतोष पत्कीचं खरं आयुष्य पहा कसं आहे !

.

सध्या झी मराठी वाहिनीवर ‘ अग्ग बाई सासूबाई ’ ही मालिका खूप लोकप्रिय होत आहे. त्या मालिकेला एक वर्षं पुर्ण झालेलं आहे. त्यामधील सगळेच पात्र प्रेक्षकांना फार आवडत आहेत. एकतर ती मालिका कौटुंबिक असल्याने घराघरात पोहचली आहे. मालिका सध्या वाहिनीवर एक नंबर वर आहे. त्यात असलेला गोडवा आणि मालिकेत येणारा नवा मोड प्रेक्षकांना खूप भावत आहे.

त्या मालिकेत सोहम नावाचं पात्र फार हिट झालेलं आहे. त्या पात्राचं मालिकेत असलेला वावर हा जमेची बाजू ठरत आहे. त्यानंतर शुभ्रा, आसावरी आणि अभिजित राजे हे तर रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत. रिपीट भाग सुद्धा प्रेक्षक खूप आवडीने पाहत असतो. हे त्या मालिकेचं खूप विशेष गोष्ट. आज आपण त्यातल्या सोह्मच्या खऱ्या आयुष्याची गोष्ट जाणुन घेणार आहोत.

सोहमचं खरं नाव आहे आशुतोष पत्की. आशुतोष पत्की हे मराठी मधील मोठं नाव नसलं तरी छोटया पडद्यावर अभिनय गाजवणारा लोकप्रिय नट मात्र नक्की आहे. आज तो या मालिके मुळे घराघरात पोहचला आहे. त्याचं लहानपण सगळं मुंबईत गेलं. जन्म मुंबईत झाला. पुढे शाळा आणि कॉलेज सुद्धा मुंबईतचं पुर्ण केलं. अभिनयची आवड त्याला लहानपणीपासूनचं होती. फक्त मोठं झाल्यावर त्याने अभिनयाला वाट मोकळी करून सुरुवात केली.

त्याचे वडील मराठी मधील एक उत्कृष्ट प्रसिद्ध संगीतकार आहेत. त्यांचं नाव आहे अशोक पत्की. डीजी रुपारेल मधून त्याने कॉलेजचं सर्व शिक्षण पुर्ण केलं. अभिनयात येण्याआधी एक मोठं हॉटेल चालू करायचं त्याचं स्वप्न होतं. म्हणूनच त्याने कॉलेज नंतर कोहिनूर कॉलेज ला हॉटेल म्यानेजमेंट चं शिक्षण घेतलं.

पण त्याने शाळेत आणि कॉलेज मध्ये अनेक नाटके केल्याने अभिनयाचा किडा काही केल्याने मरत नव्हता. मग त्याने शेवटी अभिनय क्षेत्रातच करियर करायचा निर्णय घेतला. त्याने अनुपम खेर ड्रामा स्कूल मध्ये अडमिशन घेतलं.

एवढ्चं नाहीतर काही चित्रपटामधून त्याने सह दिग्दर्शक म्हणून ही काम केलं आहे. मधु इथे चंद्र तिथे, श्रीमंत दामोदर पंत या मराठी चित्रपटात त्याने काम केलं आहे. त्याची पहिली मालिका होती मेहंदीच्या पानावर.

या मालिकेमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. अनेक मराठी चित्रपट ऑफर होऊ लागले. सध्या मात्र तो अग्ग बाई सासूबाई या मालिकेत काम करत आहे. त्यात त्याची सोहम ही भूमिका खूप रसिकांच्या पसंतीस पडत आहे.

Leave a Comment