अभिनेत्री अश्विनी महांगडे यांचे सामाजिक क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल, अभिमान वाटावा अशी आहे त्यांची कामगिरी

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे अभिनयासोबतच समाजकार्यात देखील हातभार लावतात. परंतु हे कलाकार प्रसिद्धीसाठी नव्हे तर आपण देखील या समाजाचे काहीतरी देणं लागतो, यासाठी आपापल्या परीने जमेल तशी मदत करतात. समाजातील जनसामान्यांचे प्रश्न सुटण्यासाठी व त्यांना उत्तम आयुष्य जगता यावे यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील आपली राणू अक्का म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगङे हिला तर आपण सर्वजण ओळखतो. अश्विनी ह्या नेहमीच समाजसेवेसाठी तत्पर असतात. अगदी त्याचप्रमाणे त्यांनी कोरोना काळात देखील मदतीचा हात पुढे केलेला आपल्याला दिसला. कोरोनाच्या विळख्यात सापडलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची कठीण परिस्थितीत जेवणाची गैरसोय होऊ नये, म्हणून अभिनेत्री अश्विनी महांगङे यांनी त्यांना मोफत जेवणाची सोय उपलब्ध करून दिली.

See also  "रंग माझा वेगळा" मालिकेतील श्वेता आहे महाराष्ट्रातील या प्रसिद्ध व्यक्तीची मुलगी, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

234184823 669668227762093 8128957725347952999 n

हा उपक्रम त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांत राबविला. अश्विनी ह्यांचे मूळ गाव सातारा मधील वाई. आपले वडील प्रदीपकुमार महांगङे यांच्या प्रेरणेनेच त्यांनी समाजकार्यात सहभाग घेतला. यामधूनच त्यांनी काही वर्षांपूर्वी रयतेच्या स्वराज्य प्रतिष्ठानाची स्थापना केली होती. या प्रतिष्ठानाअंतर्गत आजवर त्यांनी कित्येक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

या उपक्रमांत मग पुस्तक संग्रहालय असो वा रक्तदान शिबिर. कोरोनाच्या कठीण काळात रुग्णांना बेङ मिळवून देणे असो वा विविध सांस्कृतिक उपक्रमांतून कलाकारांना योग्य मार्गदर्शन करणे, प्रोत्साहन देणे. अशा प्रकारच्या सर्व उपक्रमांत रयतेचे स्वराज्य या प्रतिष्ठानने सहभाग घेतला व मदतीचा हात पुढे केलेला आपल्याला पाहायला मिळाला.

235899726 669509787777937 848699347752184636 n

या सर्व उपक्रमांचे कौतुक होत असतानाच रयतेचे प्रतिष्ठान आता आणखी एक नवे पाऊल उचलताना दिसत आहे. या प्रतिष्ठानाअंतर्गत पहिली रुग्णवाहिका लोकसेवेत दाखल करण्यात आली. 15 ऑगस्ट 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी या पहिल्या रुग्णवाहिकेचे पूजन केले आहे. यासाठी अभिनेत्री अश्विनी महांगङे यांचे कौतुक देखील केले जात आहे.

See also  या मराठमोळया अभिनेत्रींनी चाहत्यांना दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा अशाप्रकारे...

तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री अश्विनी महांगङे यांच्या प्रमाणेच आता आणखी एक मराठी अभिनेत्री आपल्या फाऊंडेशन मार्फत संपूर्ण राज्यात मदतीसाठी धावून येत आहे. ही अभिनेत्री म्हणजे दिपाली सय्यद. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दिपाली सय्यद हिने आपल्या चॅरिटी ट्रस्ट मार्फत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटी देणार असल्याचे सांगितले.

त्याप्रमाणे पूरग्रस्त भागात जाऊन तेथील परिसराची तिने पाहणी सुद्धा केली होती. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील आपल्या ह्या दोन्ही अभिनेत्री सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे फक्त अभिनयापुरतेच मर्यादित न राहता ह्या अभिनेत्रींचे हे सामाजिक कार्य देखील सतत प्रशंसास्पद ठरेल, यात काही वाद नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment