झेंडा चित्रपटानंतर अवधूत गुप्तेंना व्हावं लागलं भूमिगत; बाळासाहेब ठाकरेंनी दाखवली होती ‘ती’ तयारी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

झेंडा सिनेमाचे जेव्हा पोस्टर समोर आले तेव्हा त्यात लोकांना सर्वात आधी दिसला तो बाळासाहेब ठाकरेंचा ‘हात’. कुठल्याही सभेत गेल्यावर त्यांची हात उंचावून लोकांना अभिवादन करण्याची पद्धत आणि पोस्टरमधील हात, त्यावरील भगवे वस्र आणि हातातील रुद्राक्षाच्या माळा हे पाहून लोकांच्या सहज लक्षात आलं की, हा ‘हात’ बाळासाहेबांचा आहे. आणि हाताच्या दोन्ही बाजूला होते 2 चेहरे. जे हुबेहूब उद्धव आणि राज ठाकरे यांच्या चेहऱ्याशी मेळ खात होते.

त्यातील दोन्ही नेत्यांची भाषा, स्वभाव, बोलण्याची आणि वागण्याची पद्धत या ठाकरे कुटुंबातील राज आणि उद्धव यांच्याशी कनेक्ट करणारी आहे. अगदी पक्षांची नावंसुद्धा जवळपास सारखी आहे. जनसेना – शिवसेना, महाराष्ट्र साम्राज्य सेना – महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

असं म्हटलं जातं की, बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा उद्धव ठाकरेंकडे झुकते माप द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून राज दु’खावले आणि त्यानंतर घ’डणारी एकेक घ’टना त्यांच्यावर परिणाम करणारी ठरली. अखेर राज यांच्या दुःखाचा उद्रेक झाला आणि ‘नवनिर्माण’ झालं.

हा सिनेमा प्रचंड वा’दात सापडणार, असं दिसत होतं. ठाकरे कुटुंबाशी सबंधित असलेल्या या सिनेमाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मनसे स्थापन होऊन नुकताच काही काळ झाले होते, मनसे फॉर्ममध्ये होती. राज ठाकरे नावाच्या माणसाने शहरासह खेड्यातील लोकांच्याही मनावर गारुड घातले होते. आणि अशातच झेंडाचं पोस्टर आणि ट्रेलर लोकांसमोर आलं आणि वा’दाला सुरुवात झाली.

See also  अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया' मधील छोटी टीना आता आहे 2 मुलांची आई, आज अशी दिसते ओळखणेही झाले क'ठी'ण...

या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांच्यावर ह’ल्ला होणार, अगदी असेही म्हटले जात होते. अशातच आ’क्रमक असलेल्या नारायण राणेंच्या पुत्राचा म्हणजेच नितेश राणेंचा अवधूत यांना फोन आला. आणि त्यांनी सांगितले की, सदा मालवणकर हे कॅरेक्टर नारायण राणे यांच्याशी सार्धम्य असणारे असून चित्रपटात आक्षेप घेणारे प्रसंग आहेत. त्यामुळे तुम्ही तो उद्या प्रदर्शित करू शकत नाही, अशी ध’म’की त्यांना देण्यात आली.

दरम्यान राज ठाकरे यांचे मित्र असलेले आणि मराठीतील बडे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही यावर खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, चित्रपटांची जाहिरात करताना राजकीय पोस्टर म्हणून स्फो’ट’क गोष्टी दाखवून वा’द उकरून काढायची काहींची इच्छा असते, असा टोला त्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. मी जेव्हा चित्रपट काढतो तेव्हा मला विश्वास असतो, त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवण्याची गरज पडत नाही.

आता वा’दा’ला तोंड फुटले होते. जिथे चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. त्या अंधेरीच्या ‘फन रिपब्लिक’मध्ये राणेंच्या स्वाभिमान पक्षाचे 100 ते 150 कार्यकर्ते आले आणि त्यांनी आ’क्षेप घेतला.

नंतर गुप्तेंना ध’म’क्या सुरु झाल्या. अनेक लोकं गुप्तेंच्या घरावर चाल करून आली. गुप्ते कुटुंबाला पो’ली’स संरक्षण देऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. नंतर गुप्ते भूमिगत झाले, इतकी भ’यानक परिस्थिती आली होती.

See also  नॅशनल क्रशचा रेड हॉट फोटोशूट होतोय व्हायरल... चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले रश्मीकाने पुन्हा एकदा..

अखेर गुप्ते त्यांच्या कुटुंबाला घेऊन थेट गोव्याला निघून गेले. अवधूत यांनी आपला फोन बंद करून ठेवला होता. या चित्रपटाबद्दल विविध वृत्तपत्रांमध्ये अनेक गोष्टी लिहून आल्या. काहींनी या चित्रपटाच्या समर्थनाची तर काहींनी वि’रो’धी भूमिका घेतली. एकाच बाजूने दाखवलेला चित्रपट आहे, झेंडा चांगलं आहे, अशा वेगेवेगळ्या टोकाच्या भूमिका लोकांच्या आणि वृत्तपत्रातून येत होत्या.

मात्र एका वृत्तपत्रात असे लिहून आले होते की, झेंडा या चित्रपटाच्या वा’दा’त शिवसेनेनं जेवढं ताकदीने अवधूत गुप्ते यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे होतं. तितक्या ताकदीने शिवसेना उभी राहिली नाही.

हे वृत्तपत्र छोटे होते, लोकल होते मात्र ते बाळासाहेबांपर्यंत जाऊन पोहोचले. बाळासाहेबांनी थेट अवधूत गुप्तेंना फोन केला मात्र बंद आला मग ‘शिवसेना स्टाईल यंत्रणा’ उभी राहिली आणि अवधूत गुप्तेंच्या बायकोचा नंबर मिळवला. त्यावर बाळासाहेबांनी फोन केला. आणि त्यांच्यात असा संवाद झाला. हा संवाद अवधूत गुप्ते यांनी स्वतः कलर्स मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे.

बाळासाहेब :- काय रे? कुठेस? भूमिगत झालायेस?
अवधूत :- हो भूमिगत आहे.
बाळासाहेब :- हो. त्रास झाला तुला या प्रकरणाचा..
अवधूत :- हो.. खरंय… थोडा त्रासच झाला.

See also  हि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, लग्नाच्या फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ...

बाळासाहेब :- एका मासिकात असं लिहून आलं की, या वा’दा’त शिवसेना तुझ्या पाठीशी पाहिजे तितक्या ताकदीने उभी राहिली नाही. आता बाकीच्या लेखाचं जाऊ दे. पण मला तुला एक विचारायचं आहे. की तुला खरच असं वाटतं का की, शिवसेना तुझ्या पाठीशी ताकदीने उभी राहिली नाही?

हा किस्सा सांगताना अवधूत गुप्ते भावनिक झाले. पुढे अवधूत यांनी सांगितले की, बाळासाहेब मला म्हणाले, तुला 1 टक्का जरी असं वाटत असेल की, या वादात शिवसेना तुझ्या पाठीशी उभा राहिलेली नाही तर तू माझ्याकडे ये आणि तुझ्या आर्थिक नुकसानीपासून तर जे काही नुकसान झालं असेल तुझ्यासोबत हा बाळासाहेब ठाकरे उभा राहीन.

यावेळी बाळासाहेबांबद्दल बोलताना अवधूत भावूक होऊन सांगत होते की, एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या माणसाला आयुष्यभराचं विकत घेऊन टाकायला हा एक फोन पुरेसा असतो.

अखेर हा वाद संपला मात्र हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात कायमचं लिहिलं गेलं. बाळासाहेबांनी कलेची कायम कदर केलेली आहे. ‘बाळासाहेबांनी संपूर्ण नुकसानभरपाई द्यायची दाखवलेली तयारी’ ही गोष्ट एक कलाकार आणि माणूस म्हणून अवधूत गुप्ते यांच्या आयुष्यभर लक्षात राहणारी होती.

 

Ram

Ram

Leave a Comment