आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे अकस्मात निधन, काळाच्या ओघाने एक अमूल्य रत्न हरवले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेले श्री गुरु बालाजी तांबे (वय 81 ) यांचे आज नि’धन झाले. श्री गुरु तांबे यांची मागील आठवड्यातच त’ब्येत खा’लावल्याने त्यांना उपचारासाठी ताबडतोब पुणे येथील खाजगी रु’ग्णालयात दाखल करण्यात आले. हे उ’पचार सुरू असतानाच त्यांचे नि’धन झाले.

तांबे यांच्या पा’र्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल आणि संजय व नातवंडे असा परिवार आहे. बालाजी तांबे यांच्या अचानकपणे अशा जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा ङोंगर को’स’ळ’ला आहे.

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे ते संस्थापक होते. श्रीगुरू तांबे यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा पाच दशके प्रसार व प्रचार केला. शास्त्रशुद्ध आणि गुणवत्तापूर्ण आयुर्वेदिक औषधांच्या संशोधनाची निर्मिती करून ती सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले.

See also  मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी याने "या" अभिनेत्रीसोबत गुपचूप उरकला साखरपुडा, पाहा त्यांचे हे फोटोज्

त्याचप्रमाणे त्यातून विविध समाज घटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद हे केवळ फक्त आपल्या भारतापुरतेच मर्यादित न ठेवता त्याचा प्रसार संपूर्ण जगभरात केला. इतकंच नव्हे तर त्याचे महत्त्व परदेशातील इतर नागरिकांनाही त्यांनी आपल्या पद्धतीने पटवून दिले.

श्रीगुरू तांबे यांनी “गर्भसंस्कार” या पुस्तकाचे लेखन केले. या पुस्तकाच्या लाखो प्रती वाचकांनी घेतल्या. इंग्रजीसह तब्बल सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे. श्री गुरु तांबे यांना आज संपूर्ण जगभरात प्रत्येक व्यक्ती ओळखते. स्टार मराठीतर्फे तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment