‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचे प्रेक्षक खूपच चिडले आहेत बबड्यावर, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टीव्हीवर अशा या अत्यंत विक्षिप्त वागणारा या बबड्याला मात्र घालवायचा आहे लोकांच्या मनांत असणारा त्याच्याबद्दलचा राग! बबड्या… ज्याला नुसते पाहूनच प्रेक्षकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो अभिनेता आशुतोष पत्की मात्र प्रेक्षकांच्या शि’व्या आणि रा’गाला स्वतःच्या अभिनयाला रसिक मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादाची मिळालेली पावतीच समजतो. पण, खरेतर तो एका वेगळ्याच विचारात आहे.

आशुतोष म्हणतो की, “आता जर त्याला भविष्यातील नवीन सिरीयल वा चित्रपट आदींच्या प्रोजेक्ट्समध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारायला हव्या असतील, तर आधी या बबड्याच्या भूमिकेवर असलेला प्रेक्षकांचा रा’ग घालवावा लागेल.”

77668820

अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका पाहताना लाखो प्रेक्षकांना एकाच प्रश्न पडतो की, एव्हढे कसले हे विचित्र, विक्षिप्त वागणे ? ज्याला फक्त पाहूनच प्रेक्षकांचा संताप होतो ती ‘बबड्या’ची म्हणजे सोहम कुलकर्णीची भूमिका करणारा आशुतोष पत्की सध्या फारच चर्चेत आहे. नुकतीच त्याची fb live मुलाखत दाखविली गेली. ज्यात त्याला रसिक प्रेक्षकांच्या भ’या’न’क रो’षाला सामोरे जावे लागले. अर्थात ती त्याच्या उत्कृष्ट भूमिकेची पोचपावतीच होती.

‘आईचा छळ करायला लाज वाटत नाही?’, ‘कधीतरी चांगला वाग’ अशा धारदार प्रतिक्रियांतून प्रेक्षक त्यांचं प्रेम व्यक्त करतात. दुसरीकडे अभिनयाचं भरभरून कौतुक करतात. आशुतोष म्हणतो ,” भर बाजारात एक आजी एकदा मला खूप ओ’र’ड’ल्या होत्या. ‘बबड्या’ म्हणूनच त्या माझ्याशी बोलत होत्या. शेवटी, ‘आईला मदत करेन, कपडे धुवत जाईन’ अशी आश्वासनं देऊन मी माझी सुटका करून घेतली होती. एकदा ट्रेनच्या प्रवासात, कुणी ओळखू नये म्हणून एकदा हुड आणि टोपी घालून मी संपूर्ण प्रवास केला होता.”

See also  "माहेरची साडी" या चित्रपट मराठी अभिनेत्री अलका कुबल आधी सलमानच्या या अभिनेत्रीला ऑफर केला होता, पण...

01manual 6alekbbkvn40 list

स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल यावेळी बोलताना तो म्हणाला की, “मी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण रीतसर घेतलेलं असून स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करण्याची इच्छा आहे. पण, अभिनयाचे बालपणापासून कुतूहल होतं. बाबांकडे अनेक निर्माते-दिग्दर्शक यायचे. मी उत्तम अभिनेता होऊ शकेल असा विश्वास अनेकांनी मला दिला. हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आधी मी अनुपम खेर यांच्या संस्थेतून अभिनयातही पदवी घेतली आणि आत्मविश्वासानं या क्षेत्रात पाऊल टाकलंय.

हा मुलगा आईला एवढा त्रास कसा देऊ शकतो? हा प्रश्न स्क्रिप्ट वाचतांना मलाही पडलेला. इथे चॅनल आणि लेखकांची टीम मिळून मालिकेचा ग्राफ ठरवतात. कथानकाच्या पुढच्या वळणासाठी बबड्या किती वाईट आहे हे दाखवणं गरजेचेच होते. अभिनय करताना फक्त सोहम म्हणून विचार करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. प्रेक्षकांना सोहमचा राग येतो याचा आनंद आहे. तीच कामाची खरी पावती आहे

See also  डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला को'रो'नाची लागण...

agga bai sasubai cs ep250

माझ्या भविष्यातील प्रोजेक्ट्समध्ये काम करतांना वैविध्यपूर्ण भूमिका हव्या असतील, प्रथम या बबड्याच्या प्रतिमेतून बाहेर पडून लोकांचा राग घालवावा लागेल. ती इमेज पुसल्यानंतरच कदाचित ते माझ्या प्रेमात पडतील. आणि त्यासाठी मला प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील. हे चॅलेंज स्वीकारण्याची माझीपण तयारी आहे.

माझे आई-बाबा नियमितपणे मालिका बघतात. बबड्याच्या विचित्र, विक्षिप्त वागण्याचा त्यांनाही खूप राग येतो. तितकेच एक अभिनेता म्हणून माझ्या होणाऱ्या प्रगतीचं आई-बाबांना खूप कौतुकही आहे. पडद्यावरील माझ्या प्रत्येक हालचालींकडे, हावभावांकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. मला अजून खूप शिकायचंय, असं ते दोघे मला नेहमीच सांगतात.

70511136

“स्वतः शेफ असल्यामुळे मी अस्सल खवैया आहेच. चिकन आणि मासे मला खूप आवडतात. बटर चिकन आणि गार्लिक नान ही माझी ऑल टाईम फेवरेट डिश आहे. आई कोकणस्थ असल्यामुळे अनेक कोकणी पाककृतींची मेजवानी घरी नेहमीच असते. थालीपीठ, घावने, तळलेले मोदक हे पदार्थही मी आवडीनं खातो.” असेही आशुतोषने नमूद केले.

मालिकेतील सहकलाकारांबद्दल बोलतांना तो म्हणाला की, “अनुभवी अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा आहे. ते मला खूप समजून घेतात, वेळोवेळी मार्गदर्शन करतात. तेजश्री हक्कानं मला अनेक गोष्टी शिकवत असते. सेटवर माझं मराठी वाचन करून घेण्यापासून, अभिनयातल्या छोट्या-छोट्या जागा परिणामकारक कशा करायच्या इथपर्यंत सगळंच ती मला खूप आपलेपणाने शिकवते. आमचे स्वभाव, आवडी-निवडी सारख्या आहेत. बाइक रायडिंगची दोघांनाही आवड आहे. शूटिंगला जाताना मी खाण्याचे सात-आठ डबे सोबत घेऊन जातो. मासे, चिकन, अंडी, भात असे वेगवेगळे पदार्थ त्यात असतात.

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' फेम या अभिनेत्याने आर्थिक तंगी मध्ये विकले पेपर-अगरबत्ती, मुलगा दुर्मिळ आ'जाराने झगडत आहे...

A Still From Agga Bai Sasubai 2020 09 18T191657.520

भविष्यात काय प्लॅन्स आहेत असे विचारले असता तो म्हणाला की, “बाबांनी मला सांगितलं होतं, त्याप्रमाणे मी सुरुवातीला सहायक दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याकडे काम केलं. कॅमेरा, कपडेपट, मेकअप हे वेगवेगळे विभाग समजून घेतले. अभिनय करताना या गोष्टींचा नेहमीच फायदाच होतो. भविष्यात उत्तम अभिनेता होण्याबरोबरच मला दिग्दर्शन क्षेत्रातही उतरायचं आहे.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment