या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या होत्या तारक मेहता मधील बबिताजी, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता?
सोनी सब टिव्ही वरील “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा एक सुप्रसिद्ध शो आहे. या शो मधील प्रत्येक व्यक्तीचं अतिशय जबरदस्त असे फॅन फॉलोइंग आहे. मग तो जेठालाल असो, टप्पु असो किंवा मग बबिताजी असोत. या सगळ्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना जणूकाही भुरळ पाङली आहे. यामधील बबिताजी ह्यांनी तर स्वतःच्या अप्रतिम सौंदर्याने आपल्या फॅन्सना अगदी वेडेपिसे केले आहे.
अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने झी टेलिव्हिजन च्या “हम सब बाराती” या मालिकेतून पदार्पण केले होते. मात्र तारक मेहता का उल्टा चश्मा या शो ने तिला खरी ओळख प्राप्त करून दिली. या शो नंतर ती फॅन्स मध्ये अधिकाधिक लोकप्रिय झाली. मीडिया रिपोर्टस् नुसार अभिनेत्री मुनमुन दत्ता ही सध्या “तारक मेहता….” या मालिकेत टप्पुची भूमिका करणार्या राज अनादकट सोबत असलेल्या रिलेशनशिप मुळे चर्चेत आहे.
आपल्या रिलेशनशिप विषयी या दोघांनीही अजूनपर्यंत कोणतेही स्पष्ट वक्तव्य केले नाही. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, राज च्या अगोदर अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने एका बॉलीवुड अभिनेत्याला ङेट केले होते. तुम्हांला हे ऐकून खूप नवल वाटेल की, मुनमुन च्या अदांनी तर बॉलीवुड अभिनेत्याला सुद्धा वेङ लावून ठेवले होते. मात्र ह्या दोघांच्याही लवस्टोरीचा शेवट हा खूपच बेकार झाला होता.
अभिनेत्री मुनमुन दत्ता ही 2008 मध्ये बॉलीवुड अभिनेता अरमान कोहली च्या जवळ आली होती. त्या दरम्यान ते दोघेही एकमेकांना ङेट करत होते. मात्र त्यांचे हे नाते जास्त दिवस टिकू शकले नाही. त्याचे कारण म्हणजे अरमान कोहली चा रागीट स्वभाव त्यांच्या नात्यात आला. याच कारणामुळे मुनमुन ने अरमान वर मारहाणीचा आरोप सुद्धा केला होता.
14 फेब्रुवारी या वॅलेन्टाईन ङे च्या वेळेस मुनमुन आणि अरमान कोहली यांच्यात जोरदार भांडण झाले होते. इतकंच नव्हे तर त्यानंतर अरमान ने तिच्यावर हात सुद्धा उचलला होता. मुनमुन च्या तक्रारी नंतर हे प्रकरण चक्क कोर्टात सुद्धा गेले होते. त्यानंतर अरमान कोहलीला बराच अपमान सहन करावा लागला होता, तसेच त्याला दंड देखील भरावा लागला होता.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.