छत्रपतींच्या शौर्य आणि धैर्याचा साक्षीदार असलेला धर्मवीरगड, केवळ आडवाटेवर असल्यामुळे दुर्लक्षित झालेला हा प्रेक्षणीय भुईकोट

प्रचलित नाव ‘बहादूरगड’ सरकारी गॅझेटनुसार ‘पांडे पेडगावचा भुईकोट’ आणि सन २००८ च्या २५ मे रोजी सर्व इतिहास व छत्रपती संभाजी महाराज प्रेमींनी नव्याने नामकरण केलेला हा ‘धर्मवीरगड’. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव मधील भीमा नदीच्या तटावर वसलेला हा सुंदर, प्रेक्षणीय भुईकोट. धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या व सुप्रसिद्ध अष्टविनायकापैकी एक असलेल्या सिध्दटेकच्या श्रीसिद्धीविनायका पासून केवळ ९ कि.मी. अंतरावर असलेला हा प्रेक्षणीय भुईकोट सुंदर किल्ला केवळ आडवाटेला असल्यामुळे दुर्लक्षित राहिलाय. .

हा भूईकोट अगदी देवगिरीच्या यादवांच्या काळातला. किल्ल्यातील शिवमंदिराच्या रचनेवरून ते सहज लक्षात येते. दक्षिणेचा सुभेदार, औरंगजेबाचा दुधभाऊ बहादूरशहा कोकलताश याचा तळ पेडगावला असतांना त्याने पेडगावच्या भुईकोटाची डागडूजी करुन त्याला बहादूरगड नाव दिल्याचा इतिहास आहे. या किल्ल्याच्या इतिहासात दोन घ’ट’ना अत्यंत महत्वाच्या आहेत.

पहिली घ’ट’ना : ६ जून इसवी सन १६७४ रोजी शिवाजी महाराज छत्रपती झाले. या सोहळ्यात स्वराज्याला बराच खर्च आला होता. तो भरून काढण्याची आयती संधी बहादूर खानाने महाराजांना दिली. बादशाह औरंगजेबाला पाठविण्यासाठी बहादुरगडावर १ कोटींचा खजिना आणि २०० जातिवंत अस्सल अरबी घोडे आल्याची खबर छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तहेरांमार्फत मिळाली. महाराजांनी आपल्या सरदारांना गमिनी काव्याची बिनतो’ड रणनीती आखून दिली.

मावळ्यांनी त्यानुसार बहादूरगडावर ह’ल्ला चढवला. सैन्याचे दोन भाग केले. एक तुकडी भल्या पहाटे बहादूरगडावर चालून गेली. बहदूरखान पेडगावातल्या मोगल सैन्यासह मराठ्यांवर चालून गेला. थोडया हातघाईच्या ल’ढा’ई झाल्यावर मराठ्यांनी अचानक माघार घेतली आणि मराठ्यांचे सैन्य पळायला लागले. मराठे पळत आहेत हे पाहून बहादूर खानाला चेव आला. त्यानी मराठ्यांचा पा’ठ’ला’ग केला. मराठ्यांनी मोगल सैन्याला पेडगाव पासून २५ कोस लांब नेले. इकडे मराठ्यांच्या दुसऱ्या मोठ्या तुकडीने किल्ल्यावर ह’ल्ला चढवून खजिना, अरबी घोडे, मौल्यवान सामान लु’टू’न, तंबू , डेरे इ. जाळून पो’बा’रा केला.

दुसरी घ’ट’ना : नंतर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मोगलांनी संगमेशवर जवळ कै’द केले. दिनांक १५ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी त्या दोघांना पेडगावला बहादूरगडावर आणण्यात आले. तिथे त्यांची उंटावरुन धिं’ड काढण्यात आली. साम, दाम, दं’ड,भे’द सगळ्यांचा वापर करून पाहिला पण स्वराज्याचा छावा काही औरंगजेबापुढे झुकला नाही. देव,देश,आणि धर्मासाठी धैर्याने ब’लि’दा’न देऊन शंभूराजे धर्मवीर झाले.

किल्ल्यामध्ये काय पहाल? पेडगावातुन थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारा पर्यंत खाजगी प्रवास व्यवस्था आहे. जाता येते. किल्ल्याचे गावाकडील प्रवेशव्दार उत्तरेस आहे. भव्य किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला भैरवनाथाचे मंदिर आहे. मूळ मंदिर यादव काळातील आहे. बांधकाम दगडी असून ओसरी, सभामंडप, अंतराळ आणि ग’र्भगृह या पद्धतीची रचना आहे. हनुमानाची आणि गणपतीची मुर्ती आहे. गर्भगृहात शिवपिंड आहे. मंदिरासमोर गजलक्ष्मीची मुर्ती आहे. सध्या गडावर मल्लिकार्जुन मंदिर, त्रिद्ली रामेश्वर मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, पाताळेश्वर मंदिर इ. मंदिरे आहेत. मंदिरे जरी काही प्रमाणात ढासळलेली असलीत तरी दगडांवरील कुशलतेने केलेले कोरीव काम निव्वळ अप्रतिम.

दक्षिण प्रवेशव्दाराच्या जवळ मशीद आहे. छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना कै’द करुन सन १६८९ च्या १५ फ़ेब्रुवारीला बहादूरगडावर आणलेल्या स्थळी आता एक कोरीव खांब असून त्याला शौर्य स्तंभ म्हणून पुजले जाते. किल्ल्याच्या पूर्वेकडील प्रवेशव्दाराच्या बाहेर भवानी मंदिर आहे.

पेडगावास कसे जाल? इतिहास व शंभूराजे प्रेमीं व इतर पर्यटकांनी शक्यतो सप्टेंबर ते फेब्रुवारी दरम्यान धर्मवीरगड/बहादूरगड/ पेडगावचा भुईकोट पाहाण्यास सुयोग्य काळ आहे. रेल्वे किंवा बसने दौंड गावी यावे. दौंड मधून गाडीने सिध्दटेक आणि नंतर बहादूरगड.

पुणे किंवा अहमदनगर वरून श्रीगोंदा व तेथून डायरेक्ट पेडगाव. तुलनेने हा सोपा मार्ग आहे. गडावर राहण्याची, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीय. सबब एक दिवसाची भेट देणेच इष्ट.

Leave a Comment