बाहुबली चित्रपटातील हा मास्क घातलेला सीन सोशल मीडियावर होतोय प्रचंड वायरल, तुम्हीही पहा हा विडिओ…
.
बाहुबली हा सिनेमा सगळयांनाच परिचित असेल. अनेकांनी तो पाहिलाही असेल. त्या सिनेमाने भारतीय रसिक प्रेक्षकांनवर खूप राज्य केलं होतं. करोडो रुपये कमवून अनेकांचा इतिहास त्या चित्रपटाने मोडलेला आहे.
त्यामध्ये कट्टपाने बाहुबलीला का मारलं ? ही गोष्ट खूप व्हायरल झाली होती. दाक्षिणात्य चित्रपट असणाऱ्या बाहुबलीने अनेक भाषांत करोडो रुपयांची कमाई केली. मोठा तामझाम असणारा तो पहिला भारतीय सिनेमा बनला.
Good job @avitoonindia and @coollazz #Unitedsoft VFX Studio team! #BBVsCOVID #IndiaFightsCorona #StaySafe
I hope everyone stays safe and exercise caution in these times. pic.twitter.com/kmhOyK3012
— rajamouli ss (@ssrajamouli) June 26, 2020
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. आणि कुणाला कोणत्या वेळेला काय आवडेल हेही. अनेक लोकं कमी वेळात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी या माध्यमाचा वापर करतात. रोज कितीतरी व्हिडीओ व्हायरल होतात. यातून काही लोकांच्या लक्षात राहतात तर काही नाही.
एस एस राजामौली हे बाहुबली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ते सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. ते त्यांच्या ट्विटर वरून नेहमी चर्चेत असतात. सध्या ट्विटरवर त्यांनी शेयर केलेला व्हिडीओ खूप व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये बाहुबली या चित्रपट मधील एक सिन आहे. ज्यामध्ये बाहुबली आणि बल्लाळदेव हे लढाई साठी एकमेकांनसमोर येतात.
पण त्यांनी तोंडाला मास्क लावलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणं हे खुप बंधनकारक झालेलं आहे. काळजीपूर्वक मास्क लावण्यात आलेला हा व्हिडिओ लोकांना खूप आवडतं आहे. पुन्हा त्यांचं बाहुबली वरील प्रेम जागृत होत आहे. खूप कमी वेळात तो व्हिडीओ सगळीकडे पसरला. लाखो व्हीवस मिळवून त्याने ट्रेंडीग मध्ये आपलं नाव आणलं.
हा व्हिडिओ प्रभास स्टार च्या चाहत्यांना खूप आवडत आहे. त्यावर अनेकांनी प्रतिसाद देऊन कॉमेंट्स द्वावरे आपल्या भावना व्यक्त केल्या. विनोदी झालेला व्हिडीओने लोकांचं निखळ मनोरंजन होत आहे.