बाहुबली चित्रपटाची अश्या प्रकारे झाली होती शूटिंग, चित्रपटाच्या शूटिंगचा व्हिडिओ पाहून थक्क व्हाल!
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक सुपरङुपरहिट असे चित्रपट दरवर्षी येत असतात. असाच एक 2015 मध्ये अफलातुन अॅक्शनसह ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट ‘बा’हु’ब’ली’. हा चित्रपट रिलीज झाल्यावर चाहत्यांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळाला होता. थोडक्यात म्हणजे ‘बा’हु’ब’ली’ हा चित्रपट बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये रेकॉर्ड तोडणारा पहिलावहिला चित्रपट होता.
या चित्रपटाने संपूर्ण जगभरातून तब्बल 650 करोडोंची कमाई केली आणि म्हणूनच प्रचंड कमाई करणारा हा पहिलाच दक्षिण भारतीय चित्रपट होता. त्यामुळे या फिल्मने फक्त उत्कृष्ट रेकॉर्ड बनवले नाहीत. तर भारतीय चित्रपटांची खासियत देखील संपूर्ण जगासमोर ठेवली.
अभिनेता प्रभास ह्याने या ‘बाहुबली’ चित्रपटातून जगभरात प्रसिद्धी मिळवली. त्यामुळे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात प्रभास चे करोडो फॅन्स बनले. परंतु या चित्रपटात अभिनेता प्रभासला एवढे अॅक्शनसह बाहुबली कसे बनवले हे तुम्हांला ठाऊक आहे का बरं…चला तर मग मित्रांनो आज आपण हेच पाहणार आहोत.
या फिल्ममध्ये देवसेना आणि कुमार वर्मा हे शि’का’र करण्यासाठी जातात. तेव्हा त्यांच्या समोरच शेती व मोठमोठे पर्वत देखील दिसत आहेत. जे पाहून आपल्याला खूप मोहित करते. परंतु तुम्हांला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इथे कोणतेही मोठमोठे पर्वत नाहीत…तर हेवी इफेक्टचा वापर करून त्या जमिनीला उंच उंच पर्वतांचे रूप देण्यात आले आहे.
तर एका दृश्यात देवसेना ही एका नावेवर उभी असलेली दिसते व तिच्या मागे खूप मोठा समुद्र दिसत आहे. पण इथे सुद्धा सर्व नजरेचा खेळ आहे. कारण खरंतर देवसेना च्या मागे एक हिरवा कपडा लावूनच “क्रोमा टेक्निक” एडिटिंग केली गेली आहे आहे. अशाप्रकारे त्याला समुद्र म्हणून दाखवले आहे.
एक सर्वात अप्रतिम दृश्य ज्याकङे पाहणाऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. ते म्हणजे वीर बाहुबली जमीनीवर पडलेला असताना पुढच्या दिशेकडे तो घसरत जाताना दिसत आहे. कदाचित तो कोणत्या तरी गोष्टीपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुम्हांला माहित आहे का, खरं तर तेव्हा प्रभासला एका हिरव्या रंगाच्या कपड्यावर झोपवले गेले होते आणि तो पायाच्या साहाय्याने घसरत सरकण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर एडिटिंगच्या दरम्यान तो हिरवा कपडा हटवण्यात गेला. आपल्याला ते पाहताना वाटते की, प्रभास जमिनीला जोर लावून घसरत आहे.
त्यानंतर एका दृश्यात तर राजमाता यांच्या समोर एक पिसाळलेला हत्ती जोरात त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी येताना दिसत आहे. पण हे खरचं असेच आहे का? तर अजिबात नाही. कारण एका अँगलला त्रिकोणी आकारात बनून तेथे ठेवलेले असते. त्यानंतर एडिटिंगच्या साहाय्याने त्याला हत्ती बनवले गेले आणि त्याच्या मागे निळ्या कपड्याला मंदिराचे रूप दिले गेले.
‘बाहुबली’ या चित्रपटात एका उंच सिंहासनावर प्रभास बसलेला दाखवला आहे. तर त्यांची प्रजा त्यांच्यासमोर हात जोडून उभी दाखवली आहे आणि त्यांच्या मागे एक आलिशान राजवाडा पाहायला मिळतो. पण काय खरंच हा राजवाडा एवढा मोठा आहे का….तर अजिबात नाही. कारण या राजवाड्याचा थोङा हिस्सा बनवला आहे व बाकी सर्व हिस्सा V Effect च्या साहाय्याने दाखवला गेला आहे.
अशाप्रकारे ‘बा’हु’ब’ली’ या चित्रपटात अनेक दृश्य ही निळया रंगाच्या कपड्याच्या व अँगल च्या साहाय्याने शूट केलेली आहेत. तसेच अॅनिमेशन इफेक्ट्स च्या साहाय्याने ते अप्रतिम बनवण्यात आले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.