तब्बल ४०० कोटीं रुपये खर्चून होणारे मा. बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक नेमके असेल तरी कसे? जाणून घ्या सविस्तर…

Advertisement

मित्रांनो!, अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा निर्मितीत वापर अन् तब्बल ४०० कोटींचा खर्च करुन साकार होणारे मा.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणाऱ्या आणि त्यांच्या कणखर नेतृत्वाची साक्ष देणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात करण्यात आले.

images 1548236415593 images 1548164462328 balasaheb thackeray

Advertisement

राज्य शासनातर्फे १४ महिन्यांमध्ये हे भव्यदिव्य स्मारक उभारले जाईल. त्यासाठी ४०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अरबी समुद्राच्या साक्षीने हेरिटेज बिल्डिंग असलेल्या महापौर बंगल्यात एक भव्य संग्रहालय उभारण्यात येणार असून ते बाळासाहेबांच्या झंझावाती जीवनप्रवासाचे साक्षीदार असेल. स्मारक समितीचे सचिव उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले. टाटा प्रोजेक्ट्सचे योगेश देशपांडे यांनी सादरीकरण केले.

See also  "अहो महानायक मोठेपणा दाखवा हो", मनसेचा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना सणसणीत इशारा...

शिवाजी पार्क मैदान आणि अरबी समुद्र यांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. स्मारकासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Advertisement

स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील वास्तुविशारद आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला आहे.

Advertisement

स्मारकासाठी भू-वापर तसेच पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या वास्तू उभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

See also  बदलण्यात आले 8 राज्यांचे राज्यपाल, ‘अशी’ आहे नवीन राज्यपालांची यादी

new project 2021 03 31t204231.807 202103590650

Advertisement

स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी २५० कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यासाठी १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश असणार आहे. यात स्मारकाची इमारत तर वैशिष्ट्य असेलच पण यासोबतच बाह्य सजावट, बागबगीचा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, लेझर शो, डीजिटल पद्धतीनं गोष्टी सांगणे अशा सुविधा देखील असणार आहेत.

सोनचाफ्याची फुुले बाळासाहेबांना विशेष आवडत असत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मारकाच्या ठिकाणी सोनचाफ्याची झाडे लावण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी कळ दाबली आणि ड्रिलिंग मशीनने थेट कामालाच सुरुवात झाली.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  देश संकटात असताना टाटा पुन्हा धावले मदतीला, टाटा स्टीलतर्फे रोज २०० ते ३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात.
Advertisement

Leave a Comment

close