‘बायको अशी हव्वी’ या लोकप्रिय मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी ही सुंदर अभिनेत्री आहे तरी कोण? माहितेय..

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या कोरोना मुळे महाराष्ट्र मध्ये लॉ’क डा’ऊ’न आहे. आणि याचा मनोरंजन क्षेत्राला खूप मोठा फ’ट’का बसत आहे. कारण अनेक मालिकांना परराज्यातील ठिकाणी शूटिंग करावं लागत आहे. काही गोवा, दमन, सिल्वासा तर काही हैदराबाद.

मनोरंजन आणि आर्थिक चक्र न थांबावं म्हणून चाललेला हा खटाटोप. पण अश्यात कोणत्याच चॅनेल ने नवीन मालिकेचा घाट घातला नाही. उलट ज्या मालिका टीआरपी मध्ये लो आहेत त्या तर बंदच करून टाकल्या.

Advertisement

पण कलर्स मराठी यावर तोडगा काढत आहे. तो म्हणजे एक बायको कशी हव्वी या विषयावर एक छान शी नवी मालिका घेऊन येत आहे. ती कधीपासून आणि कोण लेखक दिग्दर्शक याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Advertisement

मालिकेचा विषय काय आहे तर एकंदरीत असं आहे की लग्न होऊन मुलगी संसाराचे सुंदर स्वप्न घेऊन सासरी येते, साखर पाण्यात जशी सहज विरघळावी तशी संसारात मिसळून ती गोडवा आणते. ती हे सगळे निरपेक्षपणे पार पाडत असते. परंतु त्या बदल्यात तिच्या वाट्याला काय येते? सासरच्यांना सून अशी हवी असते जी घरातल्या चौकटीत बसेल आणि नवर्‍याला अशी बायको हवी जी त्याच्या अपेक्षांना पूर्ण करेल. याच धाग्याला घेऊन कलर्स मराठी घेऊन येत आहे नवीकोरी मालिका ‘बायको अशी हव्वी.’ तर अश्या पध्दतीने मालिका प्रेक्षकांना भेटायला येत आहे.

See also  "हक्काच्या प्रेमाचं माणूस..." अगबाई सासूबाई मधील शुभ्राची पोस्ट सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल...

119585556 935812066903988 6212081191183844718 n

Advertisement

मालिकेत गौरी देशपांडे हि नवखी अभिनेत्री तर अभिनेता विकास पाटील प्रमुख भूमिकेतपहायला मिळणार आहेत. गौरी देशपांडे हिची हि पहिलीच टीव्ही मालिका असली तरी तुम्ही तिला ह्यापूर्वी देखील मराठी चित्रपटात पाहिलं असेलच. गौरी देशपांडे हिच्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात…

“बायको अशी हव्वी” या मालिकेत अभिनेत्री गौरी देशपांडे हिने जान्हवी हे पात्र साकारले आहे. तर विकास पाटील ने विभासचे पात्र साकारले आहे. ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्सने केली असून लेखन-दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे. मालिकेचे कथानक विभास आणि जान्हवी भोवती गुरफटले असल्याने नव्या विचारांची जान्हवी विभासच्या बुरसटलेल्या विचारपद्धतीला कशी बळी पडते आणि त्यातून ती मार्ग कसा शोधते यावर आधारित असणार आहे.

See also  सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू लॉ'कडा'ऊन मध्ये करत आहे हे काम, पाहून थक्क व्हाल! म्हणाल रिंकू हे...
Advertisement

157743886 1399305067079545 1510125416028921074 n

जान्हवीचे दमदार पात्र साकारणाऱ्या गौरी देशपांडे बद्दल या काही खास गोष्टी तुम्हाला कदाचित माहीत नसतील. गौरी हि मुंबईतच लहानाची मोठी झाली तिचे शिक्षण देखील मुंबईत झाले. पद्मभूषण वसंतदादा पाटील स्कुल अँड कॉलेज मधून तिने शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने Audiologist and Speech Language Pathologist केलं. ती एक उत्तम निवेदक देखील आहे अनेक मंचावरून तिने अभिवाचनाचे सादरीकरण केले आहे. या प्रवासात डॉ वंदना ताई बोकील यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन तिला मिळाले आहे.

Advertisement

पाठीमागे जर मार्गदर्शक खंबीर असेल कुणी तर मग यशाची फिकीर राहत नाही. या अभिनेत्री बाबत तेच झालं. ती शिकता शिकता घडत गेली. म्हणजे अजूनही तिचा प्रवास चालूच आहे.

116899092 1187973178218406 3199095558825417352 n

Advertisement

“अशी बायको हव्वी” या मालिकेतून ती छोट्या पडद्यावर आगमन करत आहे. याअगोदर २०१५ साली ‘बाबांची शाळा’ या चित्रपटात तिने काम केल होत. याच बरोबर “मोगरा” या ऑनलाइन नाटकातही ती झळकली आहे. गौरीला डान्सची देखील विशेष आवड आहे सोबतच तिने मॉडेलिंग ही केले आहे. कवितांची तिला विशेष गोडी आहे अनेकदा आपल्या इंस्टाग्रामवरून ती वेगवेगळ्या कवितांचे सादरीकरण करताना दिसते.

See also  बॉलीवुड अभिनेत्री सई मांजरेकरची बहीण देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

बायको अशी हव्वी ही मालिका इतर मालिका पेक्षा जरा वेगळी पहायला मिळणार आहे नव्या विचारांची जान्हवी ही नवऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करणारी असेल की स्वतःची स्वप्ने पूर्ण करणारी असेल ? हे काही भागातच स्पष्ट होईल मात्र प्रेक्षकांना ती कितपत आवडणार हे देखील येत्या काही दिवसांतच अधिक स्पष्ट होईल.

Advertisement

28752363 154619465209238 7022942467276144640 n

अश्या मालिकेत प्रमुख भूमिका सावरून प्रेक्षकांना भुरळ घालण्याची सुरुवात झालेली आहे. तर या अभिनेत्रीला आणि तिच्या सर्व टीम ला पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close