“या” कारणामुळे सलमान खानने रागात साइन केला होता “तेरे नाम”, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपला सलमान खान भाईजान सध्या त्याच्या “अंतिम – द फायनल टूथ” या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये बिझी आहे. शुक्रवारी हा चित्रपट थिएटरला रिलीज झाला. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमानने हल्लीच “सारेगामापा” या सिंगीग शो च्या सेटवर हजेरी लावली. मात्र यावेळी बजरंगी भाईजान ने एका अशा गोष्टीचा खुलासा केला, जो ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. त्याचे झाले असे की, निलांगना नावाच्या एका कंटेस्टंट ने सलमान खान च्या “तेरे नाम” या चित्रपटाचे गाणं सादर केले.

आपल्या Old Is Gold अशा चित्रपटातील गाणं ऐकल्यावर सलमान च्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मग काय विचारता, बजरंगी भाईजान ने हाच धागा पकडून “तेरे नाम” चा एक किस्सा सांगितला. या चित्रपटात सलमान चा जो लुक होता, त्यामागे देखील एक खूपच इंटरेस्टिंग अशी कहाणी आहे. परंतु खूप कमी लोकांना हे ठाऊक आहे. नेमकं काय बरं असू शकते, हे माहीत करून घेण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक असालच ना. तर आज आम्ही तुम्हांला हेच आपल्या या आर्टीकल मधून सांगणार आहोत.

See also  "करीना सोबत मी याच कारणामुळे लग्न केले", सैफ अली खानने अखेर कबूल केल्या त्या सिक्रेट गोष्टी...

अभिनेता सलमान खान ने सांगितले की,”तेरे नाम या चित्रपटाचे निर्माते व माझे जवळचे खास मित्र मनचंदा हे एकदा माझ्याकडे आले. तेव्हा मी माझ्या दुसर्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त होतो. तेव्हा तुला माझ्या चित्रपटासाठी टक्कल करावं लागेल, असे त्यांनी मला म्हटले. त्यावर मी टक्कल कसं करणार? हा प्रश्न मला पडला होता. कारण मी आणखी एका दुसर्या चित्रपटाचे शूटिंग करत होतो. म्हणून मी त्यांना कोणताही शब्द देऊ शकलो नाही.

त्याचदरम्यान मला खूप ताप आला होता व तो दुसर्या चित्रपटाचा दिग्दर्शक मला सारखा फोन करून शूटिंगला बोलवत होता. त्यामुळे मी एवढा वैतागलो की, रागारागात बाथरूममध्ये गेलो आणि संपूर्ण टक्कल करून आलो. त्यानंतर लगेचच दुसर्या दिवशी मी “तेरे नाम” च्या निर्मात्यांना फोन केला व तुमचा चित्रपट करण्यासाठी मी तयार आहे, असे सांगितले. खरंतर तेव्हा प्रत्येक व्यक्ती मला हा चित्रपट करू नको, असा सल्ला देत होते. परंतु का ते माहित नाही, मला तो चित्रपट करायचा होता.

See also  प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर लग्नाआधीच होती प्रेग्नंट? प्रेगनेंसी मागील सत्य ऐकून थक्क व्हाल!

तुम्हांला माहीत आहे का, “तेरे नाम” या चित्रपटात सलमान वेड्यांच्या इस्पितळात पोहोचतो. तेव्हा त्याचे एकंदरीत संपूर्ण टक्कल दाखवले आहे. त्याआधी मात्र तो लांब केसांत दिसतो. सलमान खान ची ही हेअरस्टाईल सुद्धा बरीच फेमस झाली होती. “तेरे नाम” हा सिनेमा 2003 मध्ये रिलीज झाला होता.

सतिश कौशिक दिग्दर्शित “तेरे नाम” हा चित्रपट सलमान च्या करियर मधील एक सुपरङुपरहिट चित्रपट आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटातील सर्व गाणी देखील रिलीज झाली होती. सिंगर हिमेश रशमिया याने ह्या एकाच चित्रपटासाठी एकूण 13 गाणी दिली होती. ती सगळी गाणी अप्रतिम होती, परंतु फक्त 7 गाणी निवडली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment