कडू कारले खाण्याचे हे गोड फायदे तुम्हाला माहित आहेत का? हा गं’भीर रो’ग तर होतो मुळापासून न’ष्ट…

एखाद्या वाईट स्वभावाच्या माणसाला आपल्याकडे ‘कडू कारलं’ असं सहज म्हणलं जातं. पण कारल्याचा हाच कडवटपणा अनेक फायदे देऊन तुमच्या आरोग्यात गोडवा आणू शकतो. कडवट चव आणि वेगळे स्वरूप ह्यासोबतच अनेक रो’गांवर कारले प्रभावी आहे.

कारले अनेक महत्वाच्या पोषक तत्वांचा एक चांगला स्त्रोत आहे. विशेषत: व्हिटॅमिन सी ने समृद्ध असणारे हे रोग प्रतिबंधक, हाडांची निर्मिती ह्यात महत्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन ए सोबतच काही प्रमाणात पोटॅशियम, झिंक आणि लोह देखील कारल्यात असते.

कारले पेशींमध्ये साखरेचा वापर करण्याच्या पद्धती सुधारण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियमित करण्यासाठी जबाबदार असलेले इन्सुलिन नावाचे हार्मोनची निर्मिती करण्यास मदत करते. शुगर कमी करण्यासाठी औषधे घेणाऱ्या लोकांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्याचे सेवन केले पाहिजे.

काही अभ्यासातून असे दिसून येते की कारल्यात कॅ’न्स’रशी संबंधित गुणधर्म असू शकतात आणि हे पोट, कोलन, फुफ्फुस, ना’सो’फ’री’नक्स आणि स्तनाच्या क’र्क’रोगाच्या पेशीविरूद्ध प्रभावी ठरू शकते.

कारल्याच्या रसामुळे को’ले’स्टे’रॉलची पातळी कमी होऊ शकते, जी हृदयाच्या आरोग्यास मदत करेल. तरी ह्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे

कारल्यात कमी प्रमाणात कॅ’ल’री’ज आणि जास्त प्रमाणात फायबर असतात. अभ्यासात असे आढळले आहे की कारल्याच्या रसामुळे पोटातील चरबी आणि शरीराचे वजन कमी करण्यास देखील मदत होऊ शकते.

ह्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे अनेक वाईट परिणामांशी संबंधित असू शकते. अतिसार, उलट्या आणि पो’ट’दु’खीशी कारल्याच्या अतिसेवणाचा संबंध जोडला गेला आहे. त्यामुळे कारल्याचे सेवन योग्य प्रमाणात केले पाहिजे.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment