रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने या वेळी भावाला चुकूनही बांधू नये राखी, नाही तर होतील भयंकर परिणाम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“रक्षाबंधन” हा बहीण- भावाच्या पवित्र नात्याचा सण आहे. यावर्षी 22 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आहे. मित्रांनो रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून हा सण साजरा करते. परंतु शास्त्रात सांगितल्याप्रमाणे भद्राकाल, पंचक आणि राहू काळात हा सण मुळीच साजरा करू नये. या काळात बहिणीने भावाला चुकूनही राखी बांधू नये. कारण हा काळ खूपच अशुभ मानला जातो. त्यामुळे या काळात केलेल्या कोणत्याही गोष्टी ह्या अशुभ मानल्या जातात आणि शेवटी त्यांचा परिणाम हा वाईटच होतो.

अगदी पुरातन काळापासून आपण हा सण साजरा करत आलो आहोत. “रक्षाबंधन” च्या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र बांधते. त्याच्याकङून ती अभिवचन घेते की, प्रत्येक संकटात तो तिचे रक्षण करेल आणि भाऊ सुद्धा आपल्या बहिणीचे रक्षण करतो. अगदी प्रेमाने व आपुलकीने तो आपल्या बहीणीला हे वचन देतो. बहीण सुद्धा परमेश्वराकडे ही प्रार्थना करते की, आपल्या भावाला त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी व समाधान लाभू दे.

See also  "माझं घर माझा संसार" चित्रपटातील या अभिनेत्रीला झाला होता हा घातक आजार, वयाच्या 31 व्या वर्षीच घेतला तिने जगाचा निरोप

चला तर मग मित्रांनो आपण जाणून घेऊया की राखी पौर्णिमेचा प्रारंभ केव्हा होतो आणि तिचा शेवट केव्हा होतो. आपण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला दरवर्षी रक्षाबंधन हा सण साजरा करतो. तर यावर्षी श्रावणी पौर्णिमा ही 21 ऑगस्ट रोजी शनिवारी सायंकाळी 7 वा. सुरू होते. तर दुसर्या दिवशी म्हणजेच रविवारी 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी समाप्त होते.

मित्रांनो तसे पाहता, संपूर्ण दिवसभरात केव्हाही रक्षाबंधन साजरी केली जाते. परंतु भद्राकाळ हा न चुकता लक्षात ठेवावा. भद्राकाळ हा 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी प्रारंभ होत आहे. तर 22 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजून 37 मिनिटांनी संपत आहे.

बहुतांश लोक हे ब्रह्ममुहूर्त वैगेरे असे पाहून मग स्वतःच्या हातून चुका घङवून आणतात. परंतु अशा चुका मुळीच करू नये. श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे 5 वा. 37 मिनिटांपर्यंत भद्राकाल आहे. त्यापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे राहूकाळ. हा 22 ऑगस्ट रक्षाबंधनच्या दिवशी सायंकाळी 4.30 पासून ते सायंकाळी 6.00 पर्यंत आहे. म्हणजेच जवळपास दीड तास हा राहू काळ आहे. या काळात कोणत्याही बहिणीने आपल्या भाऊरायाला राखी बांधू नये.

See also  देवमाणूस 2 मालिकेत ही प्रसिद्ध विनोदी मराठी अभिनेत्री घेणार दमदार एंट्री...

कोणते आहेत बरं रक्षाबंधनचे शुभमुहूर्त :
रक्षाबंधनच्या दिवशी भद्राकाळानंतर केव्हाही राखी बांधली तरीही चालते. परंतु आम्ही तुम्हांला काही खास तीन शुभमुहूर्त सांगणार आहोत. या मुहूर्तावर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधल्यास ते तुमच्या भावाच्या सुखी आयुष्यासाठी व आनंदी जीवनासाठी अत्यंत लाभदायक ठरते.

1) पहिला मुहूर्त :
सकाळी 9 ते 12 हा पहिला शुभमुहूर्त आहे. या काळात तुम्ही आपल्या भाऊरायाला बिनधास्तपणे मन प्रसन्न ठेवून राखी बांधू शकता.

2) दुसरा मुहूर्त :
रक्षाबंधनच्या दिवशी दुपारी 1.30 ते 3.00 हा दुसरा अत्यंत लाभदायक असा शुभमुहूर्त आहे. बहीण- भावाच्या पवित्र नात्याचा सण तुम्ही यावेळी नक्कीच साजरा करू शकता.

3) तिसरा शुभमुहूर्त :
तिसरा शुभमुहूर्त हा राहूकाळ संपल्यावर सुरू होतो. हा शुभमुहूर्त सायंकाळी 6 ते 10 असा आहे. या काळात रक्षाबंधन आनंदाने व उत्साहाने साजरी केली जाऊ शकते.

See also  धक्कादायक; एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही मुलांचे झाले एकाच दिवशी निधन....

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment