‘भाभीजी घर पर है’ मधील अंगुरी भाभींचे ग्लॅमरस हाॅ’ट फोटो होत आहेत खूपच व्हायरल, फोटो पाहून थक्क व्हाल!

सुरूवातीपासूनच टिव्हीवर लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे “भाभीजी घर पर है”. या मालिकेत विनोदी, थोडे हटके व बऱ्याचशा इतर गोष्टींचे स्वरूप आपल्याला पहायला मिळते. या मालिकेतली अंगुरी भाभी ही नेहमीच चाहत्यांना आपल्या अदाकारीतून घायाळ करत असल्याची प्रचिती आपल्याला येतेच.

67fe0f82ead891a30cadc26500c3f126

अंगुरी भाभीच्या पात्राला खऱ्याने योग्यरित्या वठवलं ते म्हणजे शुभांगी अत्रे या अभिनेत्रीने. ही अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावरून नेहमीच प्रेक्षकांच्या व चाहत्यांच्या संपर्कात येत असते. त्याआधी टेलीव्हिजन इंडस्ट्रीमधल्या कस्तुरी या मालिकेतून कस्तुरी नावाच्या पात्राची महत्वपूर्ण भूमिका शुभांगीनेच रंगवली होती. “कसोटी जिंदगी की”, “दो हंसो का जोडा” या दोन चांगल्या गाजलेल्या मालिकेतूनली आपल्या अभिनयाची दमदार छाप शुभांगी अत्रेने पाडल्याचं पहायला मिळतं.

इंदोर, मध्यप्रदेश येथून तिने तिच्या डिग्री शिक्षणाची पदवी प्राप्त केली. आणि नंतर जाहिरातींमधून ती टिव्हिवर प्रथमतः झळकली. फार जणांना कदाचित हे माहित नसेल परंतु हवन या मालिकेत थेट नकारात्मक भुमिका साकारत आपल्यातील सर्व कौशल्य तिने जगासमोर मांडली असंच म्हणावं लागेल.

See also  लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने दिली गोड बातमी, नेटकऱ्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया...

EavbfoUUEAAv4QP

शुभांगी अर्थात अंगुरी खऱ्या आयुष्यात सलमान खानची फार मोठी फॅन असल्याचही वारंवार पहायला मिळतं. तिला एक मुलगीदेखील आहे. पियुश पुरे या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालेलं आहे. शुभांगीचा मालिकेतील “सही पकडे हैं” हा डायलॉग प्रचंड प्रसिद्ध झाला आहे.

सध्या अंगुरी भाभींच्या दिलखेच अशा मादक अदांनी सोशल मीडियावर अगदी आग लावल आहे. अर्थातच शुभांगी अत्रे हीने सोशल मीडियावर नुकतेच तिच्या अकाउंटवरून तिचे ग्लॅमरस फोटोज शेअर केले आहेत. चाहत्यांमधून या फोटोंवर अगदी कमेंट्सचा वर्षावही होत आहे, शिवाय हे फोटोज वाऱ्याप्रमाणे सर्वत्र शेअर होताना दिसत आहेत.

78909740

शुभांगी अत्रे आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात प्रचंड स्टायलिश असल्याचीही गोष्ट एकदा शुभांगीने स्वत: सांगितली होती. शुभांगी अत्रे हिला तिच्या आयुष्यात टाईम मॅनेजमेंट या गोष्टीला खुप मोलाच स्थान आहे. तिने मास्टर इन बिझनेस ॲडमिनीस्ट्रेशन अर्थात “एम बी ए” या विषयात पदवी प्राप्त केली आहे. शुभांगीचा लग्नानंतर टिव्ही मालिकेमधून प्रवास सुरू व्हायला एकता कपूरचा महत्वाचा वाटा आहे.

See also  या बॉलीवूड स्टार्सनी केले होते लव्ह मैरिज, काही वर्षांतच झाले घटस्फोट, या अभिनेत्याने तर गमावली सर्व संपत्ती!

शुभांगीने “अधुरी हमारी कहानी” या मालिकेमधील देवसेना ही एकप्रकारची महत्वपूर्ण भुमिका निभावली होती. चिडीयाघर या मालिकेतही शुभांगीने एक भुमिका पार पाडली होती. शुभांगी अत्रे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रिल्स व्हिडिओदेखील सतत शेअर करत असते.

370745 angoori bhabhi

आणि तिचे रिल्स अनेकदा ट्रेंडींगमधेही चालत असल्याचे पहायला मिळतात. तिच्या आजवरच्या आयुष्यात तिने आय टी ए अवार्ड 2016 चा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा खिताबही पटकावला आहे. इंडियन टेली अवाॅर्ड्सकडूनही बेस्ट ॲक्ट्रेस इन कॉमिक रोल ज्युरी पुरस्कार हादेखील अवाॅर्ड मिळाला आहे.

शुभांगी अत्रेने सावधान इंडिया, गुलमोहर ग्रॅंड, दो हंसो का जोडा, जलवा ४ टू का १, ये रिश्ता क्या कहलाता है, कुमकुम, करम अपना अपना यांसारख्या प्रोजेक्ट्स मधूनही आपल्या कामाची छाप रसिकप्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. बिग बॉसच्या एका पर्वातही ती आली होती.

See also  नेहा कक्करला लग्नामध्ये भेटवस्तू म्हणून मिळालेल्या या घड्याळाची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment

close