भाद्रपद महिण्यात या गोष्टी करणे टाळा नाही तर, होऊ शकते हे मोठे नुकसान…

भगवान शिवशंकराच्या भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या पवित्र श्रावण मासातील अमावस्या संपताच दिनांक १९ ऑगस्ट २०२० पासून भाद्रपद महिन्यात प्रारंभ होत आहे.

हिंदू पौराणिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यात कुठलेही शुभकार्य करणे हे निषिद्ध ठरविण्यात आले आहे. या ठिकाणी आपल्याला एक मोठा विरोधाभास पहावयास मिळतो, तो म्हणजे भाद्रपदात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करणे निषिद्ध ठरविण्यात आलेले असतानाही, हाच भाद्रपद महिना चातुर्मासातील चार महिन्यांपैकी एक महिना म्हणून गणला जातो.

ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला असता याचे स्पष्टीकरण आपल्याला मिळते. ते असे की,भाद्र या शब्दाचा अर्थ कल्याण असा आहे आणि ज्योतिष पंडितांच्या विवेचनानुसार भाद्रपद या शब्दाचा अर्थ कल्याणकारी फळ अथवा परिणाम प्रदान करणारा असा होतो.

ज्योतिष शास्त्र असे सांगते की, भाद्रपद महिन्यामध्ये पवित्र पावन व्रतवैकल्य व भक्तिभाव यांना विशेष मान्यता प्राप्त आहे. श्री गणेश चतुर्थी सारखे पावन पर्व व विशेष महत्वाचे दिवस याच भाद्रपद महिन्यात येतात. सन २०२० मध्ये भाद्रपद महिना हा १९ ऑगस्ट रोजी सुरू होऊन १७ सप्टेंबर रोजी समाप्त होत आहे.

चला तर मग जाणून घेऊन या भाद्रपद महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करणे टाळावे ते…

भाद्रपद महिन्यामध्ये या गोष्टी करणे उत्तम फलदायी ठरेल…

  • भाद्रपदात दानधर्म पुण्यकर्म करण्याला विशेष महत्त्व आहे.
  • या महिन्यात श्रीगणेशाची मनोभावे पूजाअर्चा करावी. श्रीगणेशास प्रिय असणारे लाल रंगाचे जास्वंदाचे फुल अर्पण करावे. सोबतच श्रीगणेशास प्रिय असणारे मोदक लाडू आदींचा नैवेद्य दाखवून प्रसादरूपे वाटल्यास, आपल्या आयुष्यातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळण्याचा मार्ग सुकर होतो.
  • गायी, वासरांना हिरवा चारा टाकावा.
  • स्नानाच्या पाण्यात किंचित गोमूत्र मिसळून स्नान केल्यास पापक्षालन होते असे शास्त्र सांगते.
  • गायीच्या दुधापासून बनविलेल्या पदार्थांचा, जसे लोणी, तूप आदींचा आहारात वापर करावा. त्यामुळे शरीरपुष्टी होऊन, त्याचा आरोग्यास लाभ होतो आणि आपणास दीर्घायुष्य प्राप्त होते.

आता पाहुया भाद्रपद महिन्यात काय करणे टाळावे…

  • कोणत्याही प्रकारचे मंगल अथवा शुभकार्य करू नये.
  • लग्नकार्य, साखरपुडा, नवीन उद्योग व्यवसाय सुरुवात, वास्तुप्रवेश, नामकरण, जावळ या प्रकारची शुभकार्ये टाळावीत.
  • या महिन्यात गूळ, तीळ, तिळाचे तेल, खोबऱ्याचे तेल, दही यासारखे पदार्थ खाऊ नयेत. अशा पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्यास, त्याचा प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होऊन आपले आयुष्यमान कमी होण्याची शक्यता निर्माण होते.
  • कष्ट न करता अथवा दानातून प्राप्त झालेल्या धान्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यास, धनसंपत्ती घटण्याची शक्यता असते.

टीप :- जरी भाद्रपद महिन्यात शुभकार्यास निषिद्ध मानले गेले असले तरी, अत्यंतिक आवश्यक असल्यास तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेऊनच पुढील निर्णय घ्यावेत. शुभं भवतु:!

Leave a Comment