अमिताभ, गोविंदासह फिल्म इंडस्ट्रीने ज्यांच्या डान्स स्टेप्स कॉ’पी केल्या त्या मराठमोळ्या भगवान दादांच्या रंजक गोष्टी जाणून घ्या…

अगदी आजही अनुरागच्या “ल्युडो” फिल्म ज्यांचे मधे “ओss बेटा जी” गाणे ऐकून आपण एन्जॉय करतो, त्याच्यावर डोलतो त्या आपल्या मराठमोळ्या भगवान दादांविषयी जाणून घेऊ या काही रंजक गोष्टी…

सन २०१६ मध्ये मराठी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, निर्माता, न’र्त’क, भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित, शेखर स’र’तां’डे’ल दिग्दर्शित एक अ’ल’बे’ला नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात मराठी अभिनेते मंगेश देसाई यांनी भगवान दादांची भूमिका साकारली होती. लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालननेही त’त्का’ली’न लोकप्रिय अभिनेत्री गीता बालीची भूमिका केली होती.

या काही रंजक गोष्टी भगवान दादांविषयी : १९७५ ते १९८९ दरम्यानच्या हिंदी फिल्म्स मध्ये भगवान दादा सर्वात जास्त वेळा हवालदार आणि ह’वा’ल’दा’र पांडू झाले. फरार (1975), शंकर शंभू (1976), खेल खि’ला’ड़ी का (1977), चाचा भतीजा (1977), शि’क्षा (1979), सा’ह’स (1981), कातिलों के कातिल (1981), द’र्द-ए-दिल (1983), बिंदिया चमकेगी (1984), सनी (1984), झू’ठा स’च (1984), रामकली (1985), ल’व’र बॉय (1985), का’ली ब’स्ती (1985 ), फ’र्ज़ की जं’ग (1989), गै’र का’नू’नी (1989).

या शिवाय भगवान दादांनी कुक, बा’र’टें’ड’र, डान्सर, स्वतः भगवानदादा, लेखक, से’क्रे’ट’री, अभिनेता, कैदी, प्रवासी, दा’रू विक्रेता, ट्रे’न मा’स्ट’र, क’व्वा’ल, डा’कू अशा कित्येक ‘किरकोळ’ भूमिकाही केल्या. मुंबईच्या दादर भागात लालूभाई में’श’न नावाची चा’ळ होती. मुंबईची जगप्रसिद्ध गणपती विसर्जन मिरवणूक दरवर्षी या चा’ळीसमोर न चुकता थांबायची. “भोली सुरत दिलके खो’टे” या गाण्यावर चा’ळी’त राहणाऱ्या भगवान दादांचा डान्स व्हायचा अन मग त्यानंतरच मिरवणूक पुढे जायची. हिंदी चित्रपटांचा पहिला ऍ’क्श’न हिरो कदाचित भगवान दादाच होते. हाताच्या बु’क्क्यां’नी ढि’शुं’म ढि’शुं’म फा’ई’ट त्यांनीच सुरू केली. तेही बॉडी ड’ब’ल डु’प्लि’के’ट न घेता. हिंदी चित्रपटांतील भगवान दादा पहिले स्टार डान्सर होते.

भगवान दादांनी १९४९ साली भारतीय सिनेमाचा पहिला भ’य’प’ट चित्रपट भे’डी बंगला बनविला. व्ही शांताराम यांच्यासारखे दिग्गज चित्रपट निर्माते त्यावरून खूप प्रभावित झाले होते. भगवान दादांचे वडील कापड गि’र’णी’त काम करायचे. त्यांचा जन्म १९१३ मध्ये महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. पूर्ण नाव भगवान आबाजी पालव होते. नंतर त्यांना भगवान, मास्टर भगवान आणि भगवान दादा म्हणून संबोधले गेले.

त्यांचे बालपण हलाखीच्या प’रि’स्थि’ती’त गेले. दादर, परळच्या कामगार एरियात ते वाढले, खेळले. इयत्ता चौथीत त्यांनी शाळा सो’ड’ली. परंतु नंतर ते आपल्या काळातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक बनले. सुरुवातीला त्यांनी मूक चित्रपटांचतुन काम करण्यास सुरवात केली. १९३१ ते १९९६ पर्यंत म्हणजे जवळपास ६५ वर्षे दादा फिल्म इंडस्ट्रीत ते एक अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, निर्माता आणि इतर भूमिका करत सक्रिय राहिले. दादा राज कपूर यांचे जवळचे मित्र होते.

राज कपूर यांनी भगवान दादांना सामाजिक संदेश देणारा चित्रपट बनविण्याचा सल्ला दिला. ज्यावर त्यांनी अ’ल’बे’ला’चे दिग्दर्शन केले. हा चित्रपट १९५१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी राज कपूरचा आवारा आला होता. अलबेला त्यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट होता. पहिल्या क्रमांकावर राज कपूरचा आ’वा’रा आणि दुसऱ्या क्रमांकावर गुरू दत्तचा बाजी होता. या चित्रपटा नंतर भगवान दादा आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर होते. परंतु नंतर त्यांनी अ’ल’बे’ला’च्या ध’र्ती’वर झ’मे’ला आणि ला’बे’लासारखे चित्रपट केले जे अ’ल’बे’ला इतके यशस्वी ठरले नव्हते.

हसते रहना हा भगवान दादांच्या आयुष्याचे वा’टो’ळे करणारा चित्रपट ठरला. या फिल्मचा हिरो किशोर कुमार होता. हा चित्रपट करण्यासाठी दादांनी आपले आयुष्यभर कमावलेले सर्व भां’ड’व’ल आणि पत्नीचे दागिने ता’र’ण ठेवले. परंतु हा चित्रपट पूर्णच होऊ शकला नाही. आपल्या नखऱ्यांनी किशोर कुमारने चित्रपटाच्या निर्मितीचे इतके नुकसान केले की चित्रपटच गुं’डा’ळा’वा लागला. जुहूमध्ये समुद्रासमोर दादांकडे २५ खोल्यांचा बंगला होता. आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी एक, अशा ७ आलिशान महागड्या गा’ड्या होत्या. चेंबूरमध्ये दादांचा आशा स्टुडिओही होता.

सलग अनेकदा अ’प’य’शी ठरल्यानंतर ते दादरमधील चाळीत दोन खोल्यांत राहू लागले. शेवटी तिथेच त्यांना म’र’ण आले. बॉम्बे टू गोवा (1972) हा अमिताभ बच्चनचा व्यावसायिक आणि नायक म्हणून पहिला चित्रपट होता. पण तोपर्यंत त्याला नृत्य कसे करावे हे माहित नव्हते. बसमध्ये देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रख दी नि’शा’ने पे जान .. हे गाणे होते ..ज्यात बच्चनला नाचता आले नाही. नंतर बच्चन यांनी हळू हळू नृत्य शैली विकसित केली. हात बाहेर करून, हळू हळू पाय हलवत आणि नंतर पुढे सरकत. ती भगवानदादाची स्टा’ई’ल होती. भगवान दादा हेच खरे बच्चन यांच्या नृत्याचे प्रेरणास्थान होते. आजही बॉलिवूडमधील दिग्गज नृत्य दिग्दर्शक या स्टेप्सला भगवानदादा स्टेप असेच म्हणतात. याच शैलीत बहुतेक भारतीय विवाहसोहळा, पा’र्ट्यां’मध्ये नाचत असतात.

गोविंदा आणि मिथुन यांच्यासह अनेक स्टार्सच्या नृत्यशैलीवर भगवान दादांचा मोठा प्र’भा’व आहे. ऋषी कपूर किशोरवयीन असतांना तर स्वत: भगवान दादांनी त्यांना नृत्याच्या विविध पद्धती शिकवल्या. त्याबद्दल ऋषी कपूर हे सदैव दादांचे ऋणी राहिले. भगवान दादांच्या १९४० पूर्वीच्या चित्रपटांची रि’ळे आता उपलब्ध नाहीत. कारण मुंबईच्या गोरेगाव येथील फिल्म ने’गे’टि’व्ह’ज ठेवलेल्या गोदामात आ’ग लागली आणि त्यात हा सर्व खजिना जळून रा’ख झाला. भगवान दादा दिग्दर्शित अ’ल’बे’ला केवळ भारतातच नव्हे तर पूर्व आफ्रिकेतही खूप लोकप्रिय होता.

त्यांनी आयुष्यात ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. दादांना शेवरलेट कारचा इतका आवड होता की त्यांनी फक्त शेवरलेट नाव आहे म्हणून शेवरलेट नावाच्या चित्रपटात काम केले होते. भगवान दादांनीच त्यांचे मित्र आणि संगीतकार सी. रामचंद्र यांना चित्रपटांमधून संधी दिली, ज्यांनी १०० हून अधिक चित्रपट केले. ये जिंदगी उसी की है आणि ऐ मेरे वतन कें लोगों सारख्या उत्कृष्ट गाण्यांची रचना केली. गीतकार आनंद बक्षी यांना चित्रपट क्षेत्रांत आणण्यात भगवान दादा यांचेही महत्त्वपूर्ण योगदान होते. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, अमर प्रेम, आराधना, शोले, परदेस, मोहरा, यादे, खु’दा’ग’वा’ह यासारख्या ६०० हून अधिक चित्रपटांमध्ये ब’क्षी साहेबांनी गाणी लिहिली.
हेमंत कुमार यांनाही त्यांचा पहिला मोठा चित्रपट ‘ना’गी’न’ (१९५४) मिळवून देण्यात दादांचा सिंहाचा वा’टा होता.

शेवटच्या गरिबीच्या काळात दादांचे सर्व मित्र त्यांना सो’डू’न गेले. पण ओम प्रकाश, सी. रामचंद्र आणि राजिंदर कृष्णा असे मित्र होते जे शेवटच्या वेळेपर्यंत त्यांना चा’ळी’मध्ये भेटायला येत होते. अखेरच्या काळात दादांनी खूप म’द्य’पा’न केले. इतके की, मित्रांनी विनोदाने म्हटले होते की जर त्यांनी पिलेल्या दा’रू’च्या रिकाम्या बा’ट’ल्या विकल्या असत्या तरी वांद्रे येथे बंगला विकत घेऊ शकले असते. पण दादांचा मृ’त्यू मात्र हृ’द’य’वि’का’रा’च्या झ’ट’क्या’ने झाला. २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या मृ’त्यू’व’र शो’क व्यक्त करतांना आपल्या संदेशात म्हटले आहे की भगवान दादांनी हिंदी चित्रपटसृष्टीत विनोदांच्या संपूर्ण पिढीला आपल्या अभिनयातून आणि खास नृत्याच्या शैलीतून प्रेरित केले आहे.

Leave a Comment