‘गाडगे & सून’ फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमये पडलीये या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या प्रेमात, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

मराठी चित्रपट आणि मालिका क्षेत्रात प्रेम प्रकरणाची चर्चा नेहमीच चालू असते. कधी एक अभिनेता दुसऱ्या अभिनेत्री सोबत तर दुसरा तिसरीकडे. अशीच एक जोडी सध्या महाराष्ट्र मधील मराठी मनोरंजन क्षेत्रात चर्चेत येत आहे.

जिचं नाव काय आहे ? याची उत्सुकता आपल्याला लागलेली असेल. चला तर मग जाणून घेऊयात. मराठी इंडस्ट्रीत आणखी एका नव्या जोडीची चर्चा आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) आणि अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) या दोघांच्या नावाची जोरदार चर्चा (Relationship) रंगली आहे.

नुकताच ७ नोव्हेंबरला भाग्यश्रीचा वाढदिवस झाला. या वाढदिवसादिवशी भूषण प्रधानने लिहिलेली पोस्ट या चर्चेला कारण ठरली आहे.  भाग्यश्रीच्या वाढदिवसादिवशी भूषणने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. यामधून त्याचं तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त होतंय. पण अद्याप या दोघांनी आपल्या प्रेमाची कुठेही अधिकृती घोषणा केलेली नाही. त्यांनी जाहीरपणे जरी प्रेम दाखवलं नसलं तरी दिसतं ते काही खोटं नाही.

सोशल मीडियावर या दोघांचे पोस्ट आणि व्हिडिओ हे नातं खूप खास असल्याचं स्पष्ट करतात. पण या दोघांनी या नात्याची कबुली दिलेली नाही. असं वाटतं की या दोघांनी आपलं नातं अजून जाहिर करायचं नाही. पण सोशल मीडियावर ते आपलं प्रेम लपवू शकलेले नाहीत.

या अगोदरही भूषण, भाग्यश्री आणि प्रार्थना बेहेरेचे आऊटिंगचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यावेळी देखील या दोघांच्या नावाची चर्चा झाली होती. पण अजूनही या दोघांनी आपल्या प्रेमाचा, नात्याचा खुलासा केलेला नाही.

असं म्हटलं जातं, की दोघेही एकमेकांना मनापासून प्रेम करतात. पुढे चालून लग्न करण्याचा सुद्धा त्यांचा निर्णय झालेला आहे; पण अजून सार्वजनिक केलेलं नाही. त्यांची लोकप्रियता ही खूप आहे. त्यांच्या चाहत्यांना ही दोघे एकत्र आल्यावर आनंदच असेल.

आता याचा जाहीरपणे कधी निर्णय घेतील याकडेच सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. त्या दोघांना नव्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment