मराठमोळा कॉमेडी किंग भरत जाधव..यांच्या मुलीला पाहिलंत का.? दिसते खूपच सुंदर

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार भरपूर गाजले आहेत, त्यांच्या अप्रतिम अभिनयाची झलक रसिक मंडळी पुन्हा पुन्हा आवडीने पाहतात. यातीलच एक अभिनेता ज्यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या विनोद पद्धतीने आजवर मराठी रंगभूमी भलतीच खेळवली आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट विशेष गाजलेला आहे, शिवाय जाधवांचे नाव यांनी अभिनयाच्या पडद्यावर थाटात गाजवले आहे. हेच ते अभिनेते आहेत भरत जाधव. अभिनेता भरत जाधव यांनी आजवर अनेक भूमिका पार पाडल्या आहेत, त्यांच्या खळखळून हसवणाऱ्या भूमिका आजही खूप आवडीने पाहिल्या जातात.

मराठी रंगभूमीवर अनेक चित्रपटात, नाटकात वेगवेगळ्या नावाने त्यांनी पडद्यावर एन्ट्री केलेले पाहायला मिळते, प्रत्येक एन्ट्री मध्ये एक खास रोचकपणा जाणवतो म्हणून तर त्यांची लोकप्रियता आजदेखील ठणठणीत आहे. आपण त्यांच्या बद्दल तर सगळी माहिती जाणतोच, पण आज आपण त्यांच्या मुलीबद्दल खास माहिती घेणार आहोत. भरत जाधव हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते नेहमीच आपले व आपल्या कुटुंबाचे काही खास फोटो शेअर करत असतात. मित्रहो कलाकार एकदा जर पडद्यावर झळकले आणि गाजले तर पडद्याआड सुद्धा त्यांना पाहण्यासाठी विशेष गर्दी होते.

See also  या कारणामुळे कीर्तनकार शिवलीला पाटीलने घेतला बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय...

ते कलाकार कसे आहेत, जीवनात काय करत आहेत. त्यांच्या वयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक असतात. मित्रहो अभिनेता भरत जाधव यांची थोरली लेक खूप छान दिसते, वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात न येता तिने स्वतःच्या करिअर साठी वैद्यकीय क्षेत्र निवडले असून या क्षेत्रात ती आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत आहे. तिचे नाव सुरभी जाधव असे आहे, मागच्या वर्षी ती एमबीबीएस परीक्षेत उत्तम गुणांनी पास झाली आहे. डॉ. सुरभी जाधव हिने पुण्यात आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

सोशल मीडियावर सुरभी अधिक सक्रिय नसते, अभिनेता भरतच नेहमी आपल्या लेकिसोबतच फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करतात. वडील इतके मोठे अभिनेता असून, सर्वत्र प्रसिद्ध आणि लोकप्रिय असूनही त्यांची दोन्ही मुले सोशल मीडियावर सक्रिय नसतात. आपल्या करिअर साठी अतोनात प्रयत्न करतात, नेहमी मेहनत आणि आपला दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करून ते जीवनात सक्रिय होत आहेत. त्यांच्या आयुष्यातील काही गोड क्षण त्यांचे बाबाच नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात. अगदी साधे राहणीमान असून खूपच सुंदर दिसतात.

See also  एकेकाळी पेपर अंथरुण स्टेशनवर झोपणारी आज आहे एक यशस्वी मराठी अभिनेत्री, जाणून घ्या "ती" ची संघर्ष कहाणी...

अभिनेता भरत जाधव यांचेही राहणीमान साधे आहे, मात्र त्यांच्या कलेची उंची भरपूर आहे. पडद्यावर त्यांना पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी लोक खूप आतुर असतात. कधी गोंदया, तर कधी निरनिराळ्या भूमिकेतून आजवर त्यांनी विशेष लक्ष आकर्षित केले आहे. त्यांचे अनेक चाहते आजही त्यांना खूप पसंत करतात, अशीच ही लोकप्रियता नेहमी राहो ही सदिच्छा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment