एकेकाळी दोन वेळेच्या जेवणाला तरसत होती अभिनेत्री भारती सिंग, आज आहे करोडोंची मालकीण…

एके काळी अक्षरशः दोन वेळेच्या जेवणाला महाग असलेल्या प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगच्या घरी नुकतेच एनसीबीने ड्र’ग्स प्रकरणात छा’पे टाकले. एनसीबीने भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोव्या इथल्या घरी धा’ड टाकली. भारती सिंग टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. भारतीने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. भारतीने आयुष्यातील पंजाब ते मुंबई प्रवासा साठी प्रचंड संघर्ष केला होता.

भारती  केवळ दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट झाली. तिने लहानपणापासूनच खूप काम केले. तिच्या आईने तर प्रचंड हालअपेष्ठा सहन केल्या आहेत. घरात तीन भाऊ-बहीण असूनही तिच्या आईने तिघांचे शिक्षण केले. एका मुलाखतीत भारती सिंग ने सांगितले होते की, ‘मी माझ्या कूपनमधून दिवसाला पाच रुपये वाचवायची आणि महिन्याच्या शेवटी घरी फळं घेऊन जायचे. त्यावेळी दोन वेळेचे जेवायचे हाल होते.

READ  आपल्याच बहिणीवर खूपच ज'ळ'त होती अभिनेत्री करीना कपूर, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!

अशा परिस्थितीत  घरात फळ बघून आनंद व्हायचे. त्या काळात मी अमृतसरमध्ये रंगमंचावर काम करायचे.  मी कॉलेजमध्ये असताना मित्रमैत्रिणींसोबत मजा मस्ती करत होते. त्यावेळी सुदेश लहरी यांच्या नजरेत माझे टॅलेंट भरले. त्यांनी मला कॉमेडी ड्रामामध्ये काम करायला सुचवले.

असे असले तरी कॉमेडी ड्रामाचा भाग व्हायला मी नकार दिला होता. पण माझ्या टीचरने मला सांगितले की, तू काम केल्यामुळे कॉलेजचे देखील चांगले नाव होईल, एवढेच नव्हे तर तुझी फी सुद्धा माफ केली जाईल. फी माफीचे ऐकल्यावर मी या कार्यक्रमासाठी होकार दिला आणि माझा अभिनयप्रवास सुरू झाला.

bharti singh

रसिकांची लाडकी कॉमेडीयन भारतीच्या संपत्तीबाबत फारसं कुणाला माहिती नाही. रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली भारती आज मोठ्या मेहनतीने कोट्यावधीची मालकीण बनली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार भारती एका शोमधून सुमारे ८ ते १० लाखांची कमाई करते. तिला अ‍वॉर्ड शो आणि इतर वेगवेगळ्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याची भली मोठी रक्कम दिली जाते.

READ  90 च्या दशकातील आपल्या विनोदांनी हसवणारा हा विनोदी अभिनेता आज जगतोय एकाकी जीवन!

विशेष म्हणजे भारती सिंह भारती सिंह टीवी कलाकारांमध्ये सर्वाधिक कमाई करणारी कलाकार आहे. टीव्ही कलाकारांमध्ये सर्वाधिक कमाई असणाऱ्या १०० भारतीय कलाकारांच्या फोर्ब्सच्या यादीत भारती सिंगचेही नाव आहे.  तिचे वार्षिक उत्पन्न ७ कोटींच्या घरात आहे. याशिवाय  अनेक तिच्याकडे आलिशान आणि महागड्या कार्सचे कलेक्शन  आहे.

28f7541727362d2c5de419fae3edb381

यात ऑडी क्यू 5 आणि मर्सिडीज-बेंझ जीएल 350 आहेत. मुंबईतही एक आलिशान घर आहे. भारती सिंगचे देशभरात लाखो चाहते आहेत. तिचे ३ डिसेंबर २०१७ रोजी हर्ष लिंबाचिया या कलाकाराशी लग्न झाले आहे. लग्नानंतर भारतीने आपले कॉमेडीचे काम सुरूच ठेवले.

स्वतःच्या अभिनयकौशल्यतेने भारतीने यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवली परंतु, सध्या भारती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. एन.सी.बी.ने सध्या बहुचर्चित असलेल्या ड्र’ग्स प्रकरणात तिच्या घरी छापे टाकले असून अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोव्या इथल्या घरीही धाड टाकली. भारती सिंगला अ’ट’क करुन आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाला स’म’न्स पाठवले आहे.

READ  बॉलीवूड मध्ये येण्याअगोदर या अभिनेत्री होत्या खूपच लठ्ठ, या अभिनेत्रीला तर तुम्ही ओळखू ही नाही शकणार!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment