महाराष्ट्राचा कॉमेडी स्टार भाऊ कदम घेतो ‘एवढे’ मानधन; रक्कम वाचून व्हाल चकित…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

भाऊ कदम म्हटले की तुमच्या चेहऱ्यावर हसू आले असेल. छोटे छोटे डोळे, काळा रंग, निरागस चेहरा घेऊन एक ‘मूर्ती लहान आणि कीर्ती महान’ असणारा एक कॉमेडी सुपरस्टार आज प्रत्येक मराठी मनावर राज्य करत आहे.

3d86e36e365bbdf8229e8cea139391e0

Advertisement

चित्रपटात काम करण्यासाठी गोरा रंग, दणगट शरीर, मोठे केस आणि इतर बऱ्याच गोष्टी लागतात. मात्र यातील काहीही नसताना भाऊ कदम नावाचा अवलिया प्रत्येकाच्या मनात आहे. कॉमेडी मराठी चित्रपटांसाठी मधला काही वर्षांचा कालावधी अक्षरश: सुवर्णकाळ होता.

याच काळात मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि काही अभिनेत्यांनी कॉमेडीत नाव कमवले. तेव्हा भाऊ या चित्रपटसृष्टीत कुठेच नव्हता. हा काळ उलटला आणि कॉमेडी चित्रपटांचे आणि अभिनेत्यांचे चाहते कमी झाले. याच काळात एक नाव घराघरात जात होतं आणि ‘भाऊ कदम’ येणार म्हटलं की लोकांच्या नजर टीव्हीवर खिळलेल्या असायच्या.

See also  "बाई, बुब्स आणि ब्रा" हेमांगी कवीच्या या पोस्टवर तृप्ती देसाई यांनी विचारला रोखठोक प्रश्न...
Advertisement

Shreya Bugde Bhau Kadam Kushal Badrike Recreate Ratris Khel Chale 2 in Chala Hawa Yeu Dya

आज ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाऊ आपल्या सर्वांना भेटतच असतो. भाऊ अनेक कार्यक्रमाच्या सुपाऱ्याही घेतो. अनेक वर्ष मोठा संघर्ष केलेला भाऊ आजही जमिनीवर पाय घट्ट रोवून उभा आहे. एकेकाळी एका कार्यक्रमाला जायला मिळावे म्हणून भाऊच्या बायकोने आपले कानातले गहाण टाकले होते. मात्र आज हाच भाऊ बायकोला पाहिजे ते दागिने विकत घेऊन देऊ शकतो, इतके पैसे कमावतो आहे.

Advertisement

भाऊचा संघर्ष हा खूप मोठा आहे. ज्यांना त्याचा संघर्ष माहिती आहे, ते आजही भाऊला सलाम करतात. प्रामाणिक आणि लोकांमध्ये सहज मिसळणारा भाऊ कदम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या एका एपिसोड साठी तब्बल 80 हजार रुपये घेतात. आपल्याला मात्र आज हे 80 हजार रुपये भाऊसाठी सहज वाटतील. मात्र एकेकाळी अवघ्या 100 रुपयांसाठी भाऊने आणि त्याच्या कुटुंबाने खूप मोठा त्याग, संघर्ष केलेला आहे.

See also  "मुंबईतील ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही" अभिनेत्री मृन्मयी देशपांडेने सांगितले 'त्या' भयानक रात्रीबद्दल...

66861789

Advertisement

गरिबीत वाढलेल्या भाऊ कदमला लागलेला नाटकांचा नाद त्याला आज थेट पडद्यावर घेऊन आला. मात्र त्यासाठी लागणारा संयम भाऊकडे होता. त्यासाठी लागणारे कष्ट करण्याची त्याची तयारी होती.

मनात इच्छा असल्यास तुम्हाला काहीही आडवे येत नाही. कदाचित भाऊ कदम हा शेवटचा मराठी कॉमेडी सुपरस्टार ठरू शकतो, असे चित्रपट क्षेत्रातील जाणकार मंडळी म्हणत असतात. कारण कॉमेडी करणे हे खूपच अवघड काम आहे आणि आता त्यात काही मंडळी ‘स्टार’ होऊ शकतात पण ‘सुपरस्टार’ नाही.

Advertisement

bhaukadamofficial 20200623 123414 0

टीव्हीवर मराठीत कॉमेडीचा एखादा भन्नाट कार्यक्रम चालू आहे आणि त्यात भाऊ नाही, असे अजूनतरी दिसले नाही. आज भाऊचे चाहते सबंध महाराष्ट्रात आहेत. चाहते म्हणून भाऊवर प्रेम करणारी मंडळी सर्वच वयोगटाची आहेत.

See also  'माझ्या नवऱ्याच्या बायको' मधील या प्रसिद्ध अभिनेत्याची खऱ्या आयुष्यातील प्रेमकथा ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

कुटुंबाने दिलेली साथ आणि आपल्यातील कलागुणांच्या जोरावर आज भाऊ कदमने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close