सैराट फेम अभिनेता तानाजी गळगुंडे सोबत चित्रपटात झळकणार ही प्रसिध्द अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

एकदा लोकप्रिय झालेल्या कलाकाराची एकामागून एक चित्रपट हे येत असतात. कारण त्यांचा चाहतावर्ग वाट पाहत असतो. सैराट मध्ये लोकप्रिय झालेला लंगड्या चा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. तर तो कधी चित्रपट करेल ? अशी आशा लागून असते. तीही आता लवरकच पूर्ण होणार आहे.

सैराट चित्रपटात प्रदीपची (लंगड्या) भूमिका गाजवणारा कलाकार “तानाजी गळगुंडे” आपल्या आगामी दोन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चार वर्षांत त्याने दोन चित्रपट केले. जे आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

२०१६ साली सैराट हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यातील एक ना एक भूमिका लोकप्रिय झाली होती. कारण सैराट ची नाळ मातीशी जोडलेली होती. त्यात लंगड्याची प्रदीपची भूमिका साकारणारा हा तानाजी गळगुंडे काही मोजक्या “माझा अगडबम” हा चित्रपट आणि “भूतीयापा” या वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आला होता.

See also  "या" मराठमोळ्या अभिनेत्रीच्या नवऱ्याने पारंपरिक दिवाळी फराळाची परदेशात विक्री करून केली करोडोंची उलाढाल...

e1e0105ff3af9d621df79946c9305d8f

त्यामुळे बरेच दिवस त्याचं काही पडद्यावर पाहायला भेटलं नाही. पण आता तानाजी लवकरच आपल्या दोन आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.

सैराट मधील सल्याची भूमिका साकारणारा अरबाज शेख आणि तानाजी हे दोघेही सैराट नंतरही कायम सोबत असतात. त्यांची यारी दोस्ती आता पडद्यावर दिसणार आहे. “फ्री हिट दणका” या चित्रपटात तइ दोघे एकत्रित झळकणार आहेत.

Monalisa Bagal

प्रेम मैत्री, आणि त्याच्या जगण्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याने या दोघांच्या मैत्रीचे, प्रेमाचे दर्शन पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लॉन्च झाले असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याचित्रपटासोबत तानाजी आणखी एका चित्रपटातून प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्या चित्रपटाचं ही मोशन पोस्टर नुकतेच व्हायरल झालं.

See also  ज्या बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या छोट्या उंचीमुळे हिनवलं जायचं ते आज आहेत सुपरस्टार...

त्यात तानाजी अभिनेता गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी या दिगग्ज कलाकारांसोबत काम करत आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांना फार आवडले असून, ट्रेलर आणि चित्रपटाच्या प्रतीक्षेत रसिक आहेत.

अनुप जगदाळे दिग्दर्शित “भिरकीट” या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. बरं त्या चित्रपटात तानाजी सोबत “मोनालीसा बागल” ही अभिनेत्री झळकणार आहे.

ड्राय डे, परफ्यूम, गणू, झाला बोभाटा, टोटल हुबलाक अशा चित्रपट आणि टीव्ही मालिकेतून मोनालीसा बागल महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. तिच्या या सर्व भूमिका लोकप्रिय ही झाल्या होत्या. आता अशीच एक नवीन भूमिका ती घेऊन येत आहे.

भिरकीट चित्रपटातून तानाजी सोबतची तिची केमिस्ट्री कशी जुळून येते ? नेमकं चित्रपटात काय असेल ? हे पाहणे आता उत्सुकतेचं ठरत आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तानाजीला प्रमुख भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना निश्चितच आवडणार आहे पण त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल….

See also  दुःखद निधन: अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या भावाचं झालं दुःखद निधन....कुटुंबात पसरली शोककळा...

कारण फ्री हिट दणका तर अजून शूट व्हायचा आहे तर भिरकिट लवकरचं रसिकांना भेटायला येणार आहे. सल्या आणि लंगड्या दोघांनाही नव्या चित्रपटाच्या खूप शुभेच्छा…

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment