घरातुन बाहेर न पडता सुद्धा कसा झाला अमिताभ बच्चन यांना कोरोना, जाणून घ्या काय आहे कारण…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

करोना हा एक असा व्हायरस रोग आला आहे की ज्याने कसलाही जात धर्म पाहिलेला नाही. म्हणजेच याचा अर्थ तो कुणालाही होऊ शकतो. गरीब श्रीमंत कोणत्याही व्यक्तीला लागण होऊ शकते. सुरुवात जेव्हा झाली तेव्हा याबद्दल अनेक जण लिहीत होते. पण आता या रोगाचं नाव काढायचं सुद्धा वीट जनतेला आला आहे.

Advertisement

परवा पासुन मीडिया मध्ये एकच बातमी पसरली आहे. की अमिताभ बच्चन यांना करोना ची लागण ! होय हे खरं आहे. साऱ्या देशभरात त्यांच्या फॅन्स साठी खुप दुःखद बातमी ठरली. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. ते लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थनाही व्यक्त केल्या. म्हणजे बॉलिवूड मधील कलाकारांना सुद्धा हा रोग सोडत नाहीये. पण काहींना असा प्रश्न पडला आहे की बच्चन लॉक डाउन मध्ये बाहेर न जाताही अमिताभ बच्चन यांना करोना झालाच कसा ?

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने अंडरवर्ल्डला केले होते खुले चॅलेंज, त्यानंतर अभिनेत्रीला...

हिंदी मधील जेष्ठ मुलाखतकार कोमल नाहाटा यांच्या ट्विटरवर त्यांनी असं म्हंटलय की अभिषेक बच्चन त्यांच्या ब्रिथ या वेबसिरीजच्या डबिंग साठी साऊंड अँड डबिंग स्टुडिओत काही दिवसांपूर्वी जात होते.

Advertisement

तिथे त्यांचा कुणाशी तरी कोविड पोसिटीव्ह शी संबंध आला असेल आणि त्यामुळे त्यांना लागण झाली. मग याचा परिणाम अमिताभ बच्चन, ऐश्वर्या, मुलगी आराध्या यांना कोविड ची लागण झाली. फक्त जया बच्चन यांना लागण झालेली नाही नाहीतर सारं बच्चन कुटुंब पोसिटीव्ह आढळून आलं असतं.

रिपोर्ट पोसिटीव्ह आल्यावर लगेच अमिताभ व अभिषेक यांना नानावटी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं. ऐश्वर्या आणि मुलगी आराध्य यांना मात्र घरातच होम विलगीकरनामध्ये राहावं लागलं आहे. या सर्वांना फार त्रास होत नाही. पण हा रोग खुप घातक ही आहे. कधी काय होईल याचा भरवसा राहिलेला नाही. काळजी घेणं हेच प्रथम कर्तव्य आहे.

See also  पहिल्या पत्नीच्या निधनानंतर या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने केलं 18 वर्षांनी लहान अभिनेत्री सोबत लग्न...
Advertisement

सगळ्या भारतातून अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंब याही परिस्थितीतुन बाहेर येऊ. अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत. याधीचे अनेक छोट्या मोठ्या रोगांवर अमिताभ यांनी संघर्ष करून विजय मिळवला आहे. त्यामुळे या कोविड युद्धात सुद्धा ते जिंकतीलच यात मात्र कसलीच शंका नाही.

त्यांच्या कामाबाबत बोलायचं झालं तर सध्या ते अनेक चित्रपट मध्ये यावर्षी आपल्याला दिसणार आहेत. त्यामध्ये झुंड, चेहरे सारखे चित्रपट आहेत. काही दिवसांपूर्वी ओटीती वर गुलाबो सिताबो हा चित्रपट ही त्यांचा प्रदर्शित झालेला आहे. तर झुंड चित्रपट नागराज मंजुळे यांचा आहे. तो ही लवरकच प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ९० च्या दशकातील या बॉलिवूड अभिनेत्रीवर आली आहे खूपच वाईट वेळ, घरातले सामान विकून...
Advertisement

Leave a Comment

close