बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात या सुप्रसिद्ध कलाकारांची होणार ध’माकेदार एन्ट्री, जाणून घ्या कोण आहेत ते कलाकार…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

टेलिव्हिजनवर कॉन्ट्रोवर्शियल शो म्हणून ओळखला जाणारा आणि अतिशय आवडीने पाहिला जाणारा शो बिग बॉस. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व लवकरच तुमच्या- आमच्या सर्वांच्या भेटीस येत आहे. बिग बॉस मराठीचे पहिले पर्व हे 15 एप्रिल 2018 ला पार पडले. या पर्वात अभिनेत्री “मेघा धाङे” ही विजयी ठरली.

पहिल्या पर्वाला तर चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुसरं पर्व चाहत्यांच्या भेटीस आले. या पर्वात “शिव ठाकरे” याने बिग बॉस 2 ची ट्रॉफी मिळवली. ही दोन्ही पर्व अतिशय भन्नाटपणे अख्ख्या महाराष्ट्रात गाजली. त्यामुळे आता तिसऱ्या पर्वात बिग बॉस हाऊस मध्ये कुणाला बरं एन्ट्री मिळणार, याची नुकतीच यादी समोर आलेली आहे.

अभिनेत्री रसिका सुनिल : झी मराठी वाहिनीवरील “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेतील शनायाची भूमिका साकारलेली अभिनेत्री रसिका सुनिल. सौंदर्य आणि मालिकेतील तिच्या अभिनयाला चाहत्यांनी खूप पसंती दिल्याने ती कमी कालावधीतच अतिशय लोकप्रिय झाली.

अभिनेत्री नेहा खान : नेहा खान हिने युवा, शिकारी, काळे धंदे आणि गुरूकुल यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. नेहा ही अतिशय उत्कृष्ट ङान्सर आहे. “युवा ङान्सिंग क्वीन” मध्ये ती स्पर्धक होती. तर सध्या झी मराठी वाहिनीवर “देवमाणूस” या मालिकेतून ती प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.

See also  या मराठमोळया अभिनेत्रीने स्वतःचेच जुने कपडे काढले विकायला, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिनेता सुयश टिळक : “का रे दुरावा” या मालिकेतून सुयश टिळक हा सर्वांच्या घराघरांत पोहोचला. बापमाणूस, दुर्वा त्यानंतर सुयश शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला. आपल्या मराठी सिनेसृष्टीत चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुयश टिळक याने बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत सुद्धा पदार्पण केले आहे.

अभिनेता चिन्मय उद्गीरकर : टेलिव्हिजनवरील छोट्या पडद्यावर चिन्मय उद्गीरकर हे नाव तर सर्वत्र गाजते. चिन्मयने स्वप्नांच्या पलीकङले, नांदा सौख्य भरे आणि घाङगे & सून या मालिकांतून उत्कृष्ट अभिनयाने आपल्या चाहत्यांच्या हृदयात स्वतःची जागा बनवली. त्यामुळे तो देखील महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात लोकप्रिय झाला आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान : टेलिव्हिजनवरील झी मराठी वाहिनीवर “होणार सून मी या घरची” या मालिकेमुळे प्रत्येक घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान. ही “अग्गंबाई सासूबाई” या मालिकेत देखील प्रमुख भूमिकेत झळकली होती. आतापर्यंत तेजश्रीने फक्त मालिकांमध्येच नव्हे तर चित्रपट व नाटकांत सुद्धा काम केले आहे.

See also  अभिनेत्री तेजश्री प्रधान करणार आहे फक्त अश्या मुलाशी लग्न, ज्याच्यामध्ये असतील हे गुण...

अभिनेत्री पल्लवी सुभाष : पल्लवी सुभाष हिने आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचप्रमाणे तिने जाहिरातींमध्ये देखील काम करून आपल्या अभिनयाची कमाल दाखवली आहे.

अभिनेत्री अक्षया देवधर : झी मराठी वाहिनीवरील “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर म्हणजेच आपल्या पाठक बाई यांना तर आपण सर्वजण ओळखतो. 2016 मध्ये अक्षया देवधर हिला खूप मोठा ब्रे’क मिळाला. साधारणत: चार वर्षे ही मालिका रसिकांच्या मनावर राज्य करत होती.

अभिनेता संग्राम समेळ : अभिनेता संग्राम समेळ याने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आपल्या करियरची सुरुवात त्याने नाटकापासूनच केली होती. “पुढचं पाऊल” या लोकप्रिय मालिकेत त्याने काम केले. या मालिकेत समीरच्या भूमिकेने त्याला ओळख मिळवून दिली. त्याचप्रमाणे स्टार प्रवाह वाहिनीवरील “ललित 205” या मालिकेत सुद्धा त्याने काम केले होते. या मालिकेत त्याने राजाध्यक्षची भूमिका साकारली होती. तसेच त्याने “हे मन बावरे” या मालिकेत सुद्धा काम केले होते.

See also  या अभिनेत्रीचा मुलगा चालवतो पाव भाजीचे हॉटेल... अभिनयाच्या मागे न लागता निवडला हा मार्ग...

अभिनेता ऋषी सक्सेना : झी मराठी वाहिनीवर प्रचंड लोकप्रियता मिळवलेली मालिका “काहे दिया परदेस” यातून अभिनेता ऋषी सक्सेना हा महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचला. तेव्हापासूनच तो लोकांच्या पसंतीत आला. अमराठी असलेला ऋषी सक्सेना हा मराठी प्रेक्षकांचा म्हणजेच प्रामुख्याने मूलींचा जास्त फेवरेट आहे.

अभिनेत्री पल्लवी पाटील : पल्लवी पाटील या अभिनेत्रीने “रुंजी” या मालिकेतून आपल्या चाहत्यांच्या हृदयात घर केले. उत्कृष्ट व सालस अभिनयातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री पल्लवी पाटील ही लवकरच बिग बॉस च्या तिसऱ्या पर्वातून आपल्या भेटीस येत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment