“बिग बॉस मराठी 3” होत आहे लवकरच सुरु, हे मराठी कलाकार येणार आपल्या भेटीस…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय कॉन्ट्रोवर्शियल शो “बिग बॉस मराठी 3” हा लवकरच आपल्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. नुकताच या सुपरङुपरहिट कार्यक्रमाचा प्रोमो सुद्धा शेयर करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रोमो पाहिल्यावर चाहत्यांमध्ये अधिकाधिक उत्सुकता वाढत असल्याचे दिसते.

केव्हा सुरू होणार आहे, असं विचारत आहात का? तर मित्रांनो बिग बॉस मराठी चा तिसरा सिझन हा 19 सप्टेंबर पासून दररोज रात्री 9.30 वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे लवकरच बिग बॉसच्या घरात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं तब्बल 90 दिवस एकत्र राहण्यासाठी येणार आहेत.

यामध्ये काहींचे एकमेकांसोबत चांगले सूत जमते, तर काहीजण मात्र एकमेकांचे वैरी होऊन जातात. पण तरीही 90 दिवस या घरात एकमेकांना सहन करत टिकून राहणे, हे घरातील प्रत्येक सदस्यासमोर एक मोठं आव्हान असते. त्याचसोबत बिग बॉसची आज्ञा पाळत त्यांना खडतर असे नवनवीन टास्क पूर्ण करावेच लागतात. ही जिद्द तर सर्वांनाच स्वतः मध्ये ठेवावी लागते.

See also  सैराट मधील आर्चीचे साडीतील हटके फोटो सोशल मीडियावर होत आहेत प्रचंड व्हायरल, पहा तिचे सुंदर फोटो...

शेवटी सर्व कलाकारांसमोर एक मोठा प्रश्न पडतो की, एकमेकांच्या चुका सांभाळत बिग बॉस च्या घरात टिकून राहायचं. अन्यथा मग स्वतःचा मार्ग निवङत आपणचं आपला झेंडा फङकवायचा, असे ठरवायचे. पण एक गोष्ट मात्र अगदी खरी आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कलाकारांचे खरे चेहरे प्रेक्षकांसमोर येतात. त्यामुळे सहभागी कलाकार आपल्या सोबतच्या इतर कलाकारांना ज्या प्रकारची वागणूक देतात, ते काही लपून राहत नाही.

बिग बॉस मराठीच्या मागील दोन सिझनमध्ये तर प्रेक्षकांची मनं जिंकून घेत कलाकारांनी आपले स्थान त्यांच्या मनात निर्माण केले होते. तर यावेळी बिग बॉस मध्ये सहभागी होणारे कलाकार कशा पद्धतीने व कोणते खेळ खेळणार आहेत, हे आपल्याला लवकरच समजेल. त्याचप्रमाणे चला तर पाहूया “बिग बॉस मराठी 3” मध्ये कोणकोणते कलाकार सहभागी होणार आहेत.

See also  'तुझ्यात जीव रंगला' मधील या अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न, लग्नाचे फोटो होतायत प्रचंड व्हायरल...

आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, अक्षया देवधर, प्रणित हाटे, नेहा जोशी, पल्लवी पाटील, पल्लवी सुभाष, भाग्यश्री लिमये, रुपल नंद, नक्षत्रा मेढेकर, खुशबू तावडे, संग्राम समेळ, चिन्मय उद्गीरकर, सुयश टिळक या सर्व मराठमोळ्या कलाकारांना आपण या सिजन मध्ये पाहू शकतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment