बिग बॉस विजेती ही अभिनेत्री झाली किन्नर, फोटो व्हायरल, कारण जाणून थक्क व्हाल!
सध्या मराठी मध्ये, हिंदी मध्ये बिग बॉस मराठी हा रियालिटी शो चांगलाच चर्चेत आहे. कारण लोकांना तेही एक घरच वाटतं. मग लोकं गुंतून जातात. बिग बॉस आजी माजी सगळेच स्पर्धक कलावंत हे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध असतात.चर्चेत येण्यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आज आम्ही तुम्हाला असेच एक उदाहरण देणार आहोत. ज्यामध्ये एका बिग बॉस विजेत्या कलाकाराने चक्क स्वतःला किन्नर बनवलेलं आहे. का ? कशासाठी ? तेच सविस्तर पाहुयात…
करण जोहर सूत्र संचालक म्हणून जिथं काम करायचा ते बिग बॉस ओटीटी हिंदी’ संपलेलेलं आहे आणि अश्यात आता लगेच लोकप्रिय रियालिटी शो ‘बिग बॉस 15’ सुरू होत आहे.
‘बिग बॉस’च्या एका विजेत्याचे सोशल मीडियावर किन्नर बनून जे फोटो व्हायरल केले आहेत, ते सध्या प्रचंड चर्चेचा विषय बनत आहेत. फोटो पाहून लोकांना, चाहत्यांना धक्का बसत आहे. चाहत्यांना, प्रेक्षकांना समजत नाही की या फोटोतील किन्नर झालेली अभिनेत्री नेमकी कोण आहे ? हे फोटो पाहून ओळखणे फार कठीण आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमकं कोण आहे आणि अशा अवतारात का दिसत आहे ?
ही किन्नर बनलेली दुसरी कोणी नाही तर ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती अभिनेत्री दिव्या अग्रवाल आहे. आता यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे, पण हे खरे आहे. सत्य आहे. अभिनेत्री दिव्या अग्रवालची हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. किन्नर बनलेली दिव्या अग्रवाल लवकर एका वेबसिरीज मध्ये प्रेक्षकांना, तिच्या चाहत्यांना दिसणार आहे. म्हणून तिने किन्नर हे पात्र हुबेहूब साकारलेलं आहे.
Alt Balaji च्या वेब सीरिज ‘कार्टेल’ मध्ये दिव्या अग्रवाल अनेक वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसून येणार आहे. सिरियल किलरची भूमिका तिने साकारलेली आहे. या फोटोत ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती दिव्या अग्रवाल एका नपुंसकाच्या अवतारात दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोत दिव्याला लाल जोडी, जड दागिने घालताना दिसून येत आहेत.
चाहते किन्नर झालेल्या या अभिनेत्रीला ओळखूच शकत नाहीत, असा तिने मेकअप केलेला आहे. यापूर्वीही अभिनेत्रीचे फोटो व्हायरल झाले होते. एकामध्ये ती एक वृद्ध व्यक्ती म्हणून दिसली होती, तर एकामध्ये ती हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या गेटअपमध्ये होती. तिने स्वतः च्या इन्स्टाग्राम हँडलवर व्हायरल झालेल्या दोन्ही लूकची फोटो पोस्ट केली आहेत. जे प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत.
‘स्प्लिट्सविला 10’ फेम आणि ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ या चित्रपटाने आपली अभिनेत्री म्हणून ओळख इंडस्ट्रीत सशक्त करणारी दिव्या अग्रवाल नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दिव्या ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि बिनधास्त आहे. तिला मनासारखं जगायला आवडतं. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी प्रचंड शुभेच्छा.