भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक सवाल, म्हणाल्या तुम्ही ड्रायविंग…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई: सध्या राज्यभर पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. कोकणात तर पावसाने अक्षरशः हैदोस माजवलाय. अनेक ठिकाणी नदी-ओढ्यांना पुर आला असून, अनेक गावे आणि जनता पुरात अडकून आहेत. या परिस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत कोकणच्या दिशेने जाणार का ? असा टोमणा चित्रा वाघ यांनी मारला आहे.

एकादशी निमित्ता विठ्ठल पुजा करण्यासाठी भर पावसात मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत पंढरपूरला गेले होते. त्यांच्या ड्रायविंगमुळे विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ड्रायविंग कौशल्याची खरी गरज आता असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले की, राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वतःची जबाबदारी समजत स्वतः गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का ? मुख्यमंत्री महोदय तुमच्या ड्रायविंग कौशल्याची खरी गरज आता आहे. त्यांनी हे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोकणच्या परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. राज्यातील अनेक भागात ढगफूटी झाली. कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

ड्रायविंग वरुन मुख्यमंत्र्यांना विरोधकांनी धरले धारेवर..

See also  अभिनेत्री मयुरी देशमुख यांच्या सासूने अशी काही भावनिक पोस्ट केली ती वाचून तुमच्या डोळ्यात येईल पाणी...

उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौर्‍यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकांचा वर्षाव केला आहे. ‘मुख्यमंत्री जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही.’ अशा तीव्र शब्दात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॅारीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालंय”

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment