भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे सोंगाड्या आहेत, ‘या’ भाजप नेत्याने केली जहरी टीका

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुंबई: भाजपचे 12 आमदार 1 वर्षासाठी निलंबित झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. अनेक भाजप नेते राज्य सरकारवर टीका करताना दिसत असून, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची तुलना मोगलाईशी करत, लोकशाहीचा खून करण्यात आला आहे अशी टीका केली. तसेच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव खोटे बोलत असून त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या धोरणावर नेहमी आक्रमकपणे भाष्य करणारे नारायण राणे यांचे पुत्र भाजप नेते नितेश राणे यांनीही कालच्या प्रकरणावर भाष्य केले आहे. भास्कर जाधव हे नरकासुर असून सोंगाडया आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

See also  श्रावण महिन्यात या तीन राशींवर असेल भगवान शिवजींची कृपा, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी...

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना नितेश राणे पुढे म्हणाले की, “आम्ही कोकणातले आहोत, तसेच भास्कर जाधवही कोकणातले आहेत. कोकणात दशावतार असतात. त्यात वेगवेगळे सोंग घेणारा नरकासुर असतो. जे लोक भास्कर जाधवला ओळखतात त्यांना माहिती आहे की भास्कर जाधव हे सोंगाड्या आहेत. काल विधानसभा सभागृहात झालेल्या गोंधळात कोणीही भास्कर जाधव यांना शिवी दिली नाही. मात्र तमाशातील सोंगाड्या प्रमाणे ते आहेत. त्यांनी सोंग केले.”

आमचे 12 आमदार ओबीसी आरक्षणासाठी लढले असून. ओबीसी समाजावर अन्याय होत होता, म्हणून ते लढले असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. भास्कर जाधव यांच्यावर टीका करत असताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरेही सोंगाड्याच आहेत. मुख्यमंत्री सभागृहात काहीच बोलत नाही, कारण तेही सोंगाड्याच आहेत. एक सोंगाड्या वर बसला आहे अन एक सोंगाड्या खाली बसला आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली.

See also  'तारक मेहता...' मालिकामध्ये मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप, या मनसे नेत्याने शेअर केला व्हिडिओ!

या 12 आमदारांचे झाले निलंबन

अभिमन्यू पवार, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुंटे, आशिष शेलार, योगेश सागर, नारायण कुचे, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, पराग आळवणी, कीर्ती कुमार भांगडिया, हरिष पिंगळे या 12 आमदारांचे 1 वर्षासाठी निलंबन झाले आहे

निलंबन झालेल्या 12 आमदारांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत सरकारकडून कारवाई अहवाल मागवून घेण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment