या अभिनेत्रीने उद्ध्व’स्त केले बॉबी देओल चे करियर, पण आज ती आहे सर्वात प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकाराचा एक प्रसिद्धीचा टप्पा असतो, ज्यामध्ये त्याला अफाट यश मिळाते पण नंतर तो कलाकार कुठेतरी हरवून जातो. असेच काहीसे अभिनेता बॉबी देओल सोबत घडले, एकेकाळी सोल्जर आणि अजनबी सारख्या सुपरहिट चित्रपट त्याने केले आणि आज आज त्याची कारकीर्द कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. बॉबीने त्याच्या बुडत्या कारकीर्दीचे श्रेय एक अभिनेत्रीला दिले आहे, जिच्यासोबत त्याने सुपरहिट चित्रपटात काम केले होते. चला तर मग जनून घेऊया कोण आहे टी अभिनेत्री जिच्यामुळे अभिनेता बॉबी देओलची कारकीर्द उद्ध्वस्त झाली.

2007 साली सुपरहिट चित्रपट ‘जब वी मेट’ चे दिग्दर्शक इम्तियाज अली यांची पहिली पसंती शाहिद नसून बॉबी देओल होता, पण शाहिदला करीनाच्या सांगण्यावरून हा चित्रपट मिळाला. बॉबी देओलने आपल्या एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. बॉबीने सांगितले की जेव्हा त्याने इम्तियाजचा ‘सोचा ना था’ चित्रपट पाहिला तेव्हा तो त्याचा चाहता झाला आणि त्याच्यासोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली. मग इम्तियाजने या चित्रपटाची स्क्रिप्ट बॉबीकडे नेली आणि चित्रपटाचे नाव सांगितले, पण त्या वेळी हा चित्रपट खूपच महागडा वाटत होता. इम्तियाज अली अनेक प्रॉडक्शन हाऊसशी बोलले पण काही काम झाले नाही, सर्वांनी चित्रपट बनवण्यास नकार दिला व सर्व या चित्रपटाला महागडा चित्रपट असे म्हणू लागले, असे झाल्यावर मग तो चित्रपट बनवण्याची गोष्टच ट’ळली.

See also  प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा "झुंड" चित्रपटाच्या प्रदर्शनावर बं'दी, कारण...

नंतर सुमारे 6 महिन्यांनंतर, बॉबीला दुसऱ्या कुणाकडून ही बातमी मिळाली की जब वी मेट या नावाने हा चित्रपट बनू लागला आहे. हे कळल्यावर बॉबीला ध’क्का बसला आणि त्याने इम्तियाजशी संपर्क साधला. इम्तियाज अलीने बॉबीला सांगितले की, शाहिदला चित्रपटाची अभिनेत्री करीना कपूरच्या सांगण्यावरून कास्ट करण्यात आले आहे. बॉबी देओलला अजूनही पश्चाताप होतो की जर त्याला हा चित्रपट मिळाला असता तर आज त्याची कारकीर्द वेगळी असती कारण जब वी मेट हा चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता. बॉबी आणि करीनाने अजनबी आणि दोस्ती सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अजनबी हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि दोस्ती फ्लॉप ठरला.

बॉबी देओलच्या कारकिर्दीला पुन्हा सुरु करण्यासाठी, त्याला दबंग सलमान खानच्या सांगण्यावरून रेस -3 हा चित्रपट मिळाला. या चित्रपटात तो अधिक चांगला दिसावा यासाठी सलमानने त्याच्या लूकवर बरेच कामही केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बॉबी आणि सलमानला एकत्र दाखवण्यात आले होते जेणे करून सलमानमुळे बॉबी देखील प्रकाश झोतात येईल. रेस ३ मध्ये तो सलमानच्या विरुद्ध रोल मध्ये दिसला होता. बॉबीच्या करिअरला पुढे नेण्याची जबाबदारी सलमानने घेतली आहे आणि एकदा भाईजानने कुणाचे करिअर बनवण्याचा विचार केला की तो ते पूर्ण करतो. बॉलिवूडमधून एक बातमी समोर आली आहे की बॉबी सलमानच्या पुढील चित्रपटातही दिसणार आहे, जरी चित्रपटाचे नाव औपचारिकरित्या उघड केले गेले नसले तरी सलमान लवकरच ही बातमी सर्वांना देणार आहे. आता हे पाहावे लागेल की बॉबी देओल सलमानच्या मेहनतीला दाद देईल कि नाही, हे येणारा काळच सांगेल.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment