पडद्यावर सतत दा’रूच्या न’शेत असायचा, खऱ्या आयुष्यात दारूचा थेंबही स्पर्शिला नाही, अभिनेत्याची कारकीर्द ऐकून थक्क व्हाल!
इंदोर मध्ये जन्मलेलला एका अभिनेत्याने गरिबीच्या अनेक सं’क’टाना तोंड देत मुंबईची वाट धरली. लहानाचं मोठं होताना मिळेल ती कामं केली; पण अंगातली कला त्याला अस्वस्थ करत होती. शेवटी अभिनेता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्याने मुंबईत पाऊल टाकलं. मुंबईत तर संकटं अजून वाढणार होते. त्याने मात्र धीर सोडला नाही.
मुंबईत त्या काळी चालणाऱ्या बेस्ट बस मध्ये त्याने कंडक्टर ची नोकरी करायला सुरुवात केली. तो कलाकार असल्याने बस मधील प्रवाशी त्याला रसिक वाटायचे. बस चा रंगमंच होऊन जायचा. आणि कंडक्टर अभिनेता बनून अभिनय करायला लागायचा.
त्याची तिकीट काढण्याची पद्धत खूप विनोदी असायची. अनेक प्रकारचे किस्से तो सांगायला लागला की प्रवाशी हसून हसून नुसते बसून राहायचे. अनेकांचं ठिकाण मागे जायचं. हे रोजचं होऊ लागलं. अनेक प्रवाशी तर त्याच्या फक्त विनोदी अभिनयाला पाहायला प्रवास करायचे.
एक दिवस काय झालं, की सुपरस्टार अभिनेते बलराज साहनी त्या बसमधून प्रवास करत होते. त्याचं काळात त्यांच्या नव्या चित्रपटाचं ही काम चालू होतं. कारण ते गुरुदत्त यांच्या सोबत देवानंद अभिनित चित्रपट बाजीचं लिखाण करत होते. त्याच्या लिखाणावर विचार करत असतानाच त्यांचं लक्ष त्या विनोदी कंडक्टर कडे गेलं. तेव्हा बलराज साहनी यांनी त्याला ‘ तू गुरुदत्त ला भेट. माझं नाव सांगून. तू एक खूप चांगला कलाकार आहेस. गुरुदत्त ला एका चित्रपटासाठी अश्याच अभिनेत्याची गरज ये. ’ असं सांगितलं. कंडक्टर ला खूप आनंद झाला. कारण याचचं तर स्वप्न त्याने उराशी बाळगलेलं होतं.
बलराज साहनी यांनी दिलेल्या पत्त्यावर तो कंडक्टर पोहचला. ऑफिस मध्ये गुरुदत काम करत होते. कंडक्टर ने आत जाऊन गुरुदत्त ची भेट घेतली. मला बलराज साहनी यांनी पाठवलं आहे, असं सांगितलं. तेव्हा गुरुदत्त ने त्याला एका दा’रु’ड्या’चा अभिनय करायला लावला. कंडक्टर हा एक तर इंदोर च्या चाळीत जन्मलेला. त्यात तो लहानचा मोठा दा’रू पिवून आसपास लो’ळ’णा’रया माणसांला बघूनच झालेला.
अनुभवाला पणाला लावून त्यानं दा’रु’ड्याची भूमिका इतकी हूबेहूब आणि उत्तम साकारली की गुरुदत्त च्या मनात घर करून गेली. तूच माझ्या चित्रपटाचा दा’रु’डा भूमिका करणारा नायक असणार आहे, असं त्याला त्याचं वेळी सांगितलं. त्यानंतर पुढं गुरुदत्त यांनीच त्याचं नाव त्यांच्या एका फेव्हरेट व्हि’स्की वरून ठेवलं, जे पुढं इंडस्ट्रीसोबत साऱ्या भारतात गाजलं. गरिबीतून आपली वाट काढून सकारात्मकता जन्माला घालणारया अभिनेत्याचं नाव आहे, ‘ जॉनी वॉकर ’ ज्याने एकदा इंडस्ट्रीत एन्ट्री केली, त्यानंतर मग कधीच मागे वळून पाहिलं नाही. जॉनी वॉकरचं खरं नाव आहे, बदरुद्दीन.
बदरुद्दीन जमालउद्दीन काझी हे जॉनी वॉकरचं पुर्ण नाव. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२६ ला इंदोर मध्ये झाला. घरची परिस्थिती खूप ह’ला’खीची असल्याने लहानपणीपासून कष्ट करून पोट भरण्याची सवय झाली. त्याचा फायदा असा की यश मिरवता आलं आणि अपयश पचवता आलं. अपयश आल्यावर खचून न जाता पुन्हा तेवढ्याच जोमाने लढाईची उर्मी जॉनी वॉकर यांना मिळायची.
कला लहानपणीच अंगात भिनभिनायला लागली होती. मोठेपणी आपण अभिनेता होऊ शकतो. किमान प्रयत्न तरी करून बघू म्हणून कुटुंबाला घेऊन मुंबईत आले. सगळं घर मुंबईत मिळेल ते काम करून घर चालवू लागले. पुढं बेस्ट बस मध्ये नोकरी करताना बलराज साहनी यांच्याशी ओळख झाली आणि करियरला सुरुवात झाली. बलराज साहनी यांनी बदरुद्दीन ला त्याच्यातल्या कलाकराची ओळख करून दिली.
१९५१ साली चेतन आनंद, देवानंद, बलराज साहनी आणि गुरुदत्त यांनी तयार केलेला बाजी हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यात बदरुद्दीन ने केलेली दारुड्याची भूमिका ही प्रेक्षकांना फार आवडली. इंडस्ट्रीमध्ये ही त्याच्या भूमिकेची खूप चर्चा झाली. त्यानंतर पुन्हा त्यानं मागे वळून पहिलच नाही. कंडक्टर ची नोकरी सोडली. आणि एका वर्षांत अनेक चित्रपट करून बदरु म्हणजेच जॉनी वॉकर हा अस्सल रांगडी विनोदी अभिनेता यशाच्या शिखरावर पोहचला.
करीयरची गाडी यशाच्या मार्गावर जात असताना असा एकही चित्रपट नसायचा की तो जॉनी वॉकर यांना सोडून तयार व्हायचा. त्यांनी त्यांच्या चित्रपट करियर मध्ये एकूण ३०० पेक्षा जास्त चित्रपटात अभिनय केला. एका मुलाखतीत बलराज साहनी म्हंटले की कुणाचं नशीब कधी उघडेल सांगता येत नाही. त्यामुळे कुणालाच कमी समजू नये. कारण मी माझ्या लेखन असलेल्या चित्रपटात ज्या बदरुला काम दिलं, त्याचा तुमच्यापर्यंत येउस्तोव्हर ‘ जॉनी वॉकर ’ झाला आणि पुढं माझ्या पेक्षाही मोठा आणि लोकप्रिय झाला. फक्त स्वतःच्या कामावर विश्वास असायला ह्वा. जो जॉनी ने कमवला.
जॉनी वॉकर यांनी बाजी सोबत अनेक चित्रपटात दारुड्याच्या भूमिका साकारलेल्या आहेत. पण त्यांच्या खऱ्या आयुष्यात पाहिलं तर जन्म आणि मृत्यु या आयुष्याच्या फेऱ्यात त्यांनी कधीही दा’रूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. त्यांना चहा खूप प्रिय होता. जशी अनेकांना दा’रू प्रिय असते. २९ जुलै २००३ ला जॉनी वॉकर या सुपरस्टार अभिनेत्याने शेवटचा श्वास घेतला; पण त्यांच्या कामाने नाही. ती अजूनही लोकं तितक्याच आत्मीयतेनं, प्रेमाने आवर्जून पाहतात.
I remembar Balraj Sahani