ज्या बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या छोट्या उंचीमुळे हिनवलं जायचं ते आज आहेत सुपरस्टार…
बॉलिवूड मध्ये अनेक असे आज अभिनेते आहेत की ज्यांना सुरुवातीला शरीर यष्ठी मुळे हिनवलं जायचं. म्हणजे उंची लहान आहे. वगैरे वगैरे. पण आज ते यशाच्या उतुंग शिखरावर आहेत. बॉलिवूड मध्ये अनेक वर्षांपासून एक पायंडा पडत आलाय तो म्हणजे अभिनेता होण्यासाठी, सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे चांगले दिसणे, चांगली उंची, सदृढ शरीर, म्हणजेच एकंदरीत चांगला आकार आणि देखावा असेल तर तुम्ही फिट नाहीतर अनफिट.
बॉलिवूड मध्ये तेव्हा ही आणि आजही काही प्रमाणात का होईना अभिनेत्याबद्दल नेहमीच एक विचार केला जातो की त्याची उंची जास्त च असावी. पण जर इतिहासात डोकावून पाहिलं तर बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते दिसून येतील ज्यांची उंची अमिताभ बच्चनसारखी नाही पण जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. क्रेझ आहे. लोकप्रियता तर अमाप आहे.
बऱ्याच वेळा काय होतं, चित्रपटाच्या पडद्यावर आपल्याला बॉलिवूडच्या टिपिकल नायकाचं पात्रं दिसतं, जे पात्र शत्रूला धु धु धुतात. त्यांचा पराभव करतात. एकट्यानेच संपवतात. आता हीच कलाकार मंडळी पडद्यावर कशी दिसतील यापेक्षा नेहेमीच खऱ्या आयुष्यात कशी दिसतात हे जाणून घेणं खूप उत्सुकतचे आहे.
आज आपण ज्या बॉलिवूड कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत की ज्यांची उंची खूपच सरासरी आहे. वास्तविक जीवनात ते तुमच्या आमच्या सारखेच सामान्य दिसतात. या यादीत मोठ्या अभिनेत्याची नावे समाविष्ट आहेत. जाणून घेऊया..
बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमिर खान यांची वास्तविक जीवनात खूप कमी उंची आहे. तो फक्त 5 फूट 6 इंच आहे. मात्र, मोठ्या पडद्यावर तो धूम आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान सारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त अॅक्शन करताना दिसला होता.
नवाजुद्दीन सिद्दीकी : आमिर खान स्टारर चित्रपट सरफरोश मधून आपल्या फिल्मी करिअरची सुरवात करणारे नवाजुद्दीन सिद्दीकी हे आज बॉलिवूड मध्ये एक प्रसिद्ध नाव आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील मूळचे नवाज यांनी सर्व प्रकारचे पात्र साकारले आहे. जर आपण त्याच्या उंचीबद्दल बोललो तर तो फक्त 5 फूट 6 इंच आहे. पण त्यांच्या बॉलिवूडपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत
अभिनयाच्या जुगलबंदी ने प्रेक्षकांना खूप भुरळ घातलेली आहे.
शाहरुख खान : बॉलिवूडचा किंग खानच्या उंचीबद्दल बोलायचे झाले तर तो 5 फूट 8 इंच आहे. रोमान्स किंग म्हणून ओळखले जाणारे शाहरुखचे जगात आजही करोडो फॉलोअर्स आहेत. त्याचसोबत करोडो रुपयांची गुंतवणूक सुद्धा आहे.
सलमान खान : आपल्या चित्रपटांमध्ये कधी वाघाची तर कधी पोलिसांची भूमिका साकारणारा सलमान खान अनेकदा सोशल मीडियावर सतत कार्यशील राहत असतो. आपल्या चित्रपटांमध्ये एका हाताने रॉकेट लाँचर चालवताना दिसणारा सलमान वास्तविक जीवनात फक्त 5 फूट 8 इंच उंच आहे. हा दर्जा आपल्या समाजात सामान्य मानला जातो पण सलमानची प्रतिमा दबंग आहे. बघा सलमान काय फार मोठा आहे का ? उंचीने. पण तरीही तो आज बॉलिवूड चा राजा माणूस आहे. त्याच्याशिवाय पान हलत नाही कुणाचे.
दिवंगत ऋषी कपूर, जे बॉलिवूडच्या सर्वात प्रतिष्ठित कपूर घराण्यातील अभिनेते होते, त्यांची उंचीही खूप कमी होती. 2020 मध्ये जगाचा निरोप घेणारे ऋषी कपूर हे 5 फूट 7 इंच उंच होते पण त्यांचा मुलगा रणबीर कपूरची उंची 6 फूट आहे. आणि आज तो यशस्वी तरुण अभिनेता आणि वडील दिवंगत जेष्ठ लोकप्रिय अभिनेते.
सैफ अली खान : छोटा नवाब म्हणून प्रसिद्ध असलेला सैफ अली खान हा नुकताच बाप झाल्याने चर्चेत आहे. सैफला पाहून राजेशाहीचे शाही स्वरूप जाणवते. पण त्याच्या उंचीबद्दल बोलायचे झाले तर तो देखील 5 फूट 7 इंच आहे.
बघितले का ? बॉलिवूड मधील सर्व दिगगज तुमच्या आमच्या सारखेच सर्व सामान्य उंचीचे आहेत. तरीही ते सुपरस्टार आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.