कधीकाळी खूपच प्रसिद्ध असलेले बॉलीवूड कलाकार चित्रपट सोडून आज करतायत शेती, हि अभिनेत्री तर…
सर्वसामान्य माणूस नोकरी सोडून शेती करतो तेव्हा आपल्याला फार काही वाटत नाही; उलट कशाला नोकरी सोडली ? शेतीत काय ठेवलं ? अश्या उलट्या चर्चा होतात; पण एखादा सेलिब्रिटी अभिनय सोडून आता शेती करतोय हे ऐकलं की आपल्या सर्वांच्या भुवया ताठ होतात. कारण त्याचे आपण फॅन असतो. तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की असे कोण सेलिब्रिटी आहेत जे आज इंडस्ट्री सोडून छान पैकी शेती करत आहेत.
बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगाचे आयुष्य खूप कमी आहे. म्हणजे येथे प्रत्येकजण येतो चांगलं काम करून फेमस होण्यासाठी. त्यातले काही यशाचं शिखर गाठतात. तेही काही काळापुरतच. कारण नव्याने येणाऱ्या साठी त्यांना जागा मोकळीक करायची असते.
कितीही उत्तम अभिनेते किंवा अभिनेत्री असले तरी प्रत्येकाची एक वेळ निश्चित असते. एखादा तरुण जेव्हा डोळ्यांत अनेक स्वप्ने घेऊन मुंबई शहरात येतात, तेव्हा त्यांना त्यांच्या स्वप्नापेक्षा आतलं जग किती वेगळं असतं हेही कळत नाही. काहींना इथ कामातून लोकप्रियता मिळते तर काही निराश होतात. आणि काही यश मिळवून निवृत्त होऊन सुखी सम्पन्न जीवन जगतात.
लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे अभिनेते धर्मेंद्र पाजी आज शेती करतात. ते अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. लोणावळ्यात त्यांचे एक आलिशान फार्महाऊस आहे. जेथे ते मुंबईच्या गर्दीपासून दूर आरामशीर, आनंददायी उत्तम जीवन जगत आहेत. धर्मेंद्र त्यांच्या फार्महाऊसवर विविध प्रकारची फळे आणि भाज्या पिकवतात. शेतीबरोबरच ते संगोपन केलेल्या जनावरांचीही स्वतः काळजी घेतात. ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे.
शेती करणाऱ्या या सगळ्या अभिनेत्या-अभिनेत्रींनी मनाची शांती किती महत्त्वाची आहे हे सांगितले आहे. आपण आयुष्यभर पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागे धावतो की ज्यात आपण आयुष्य जगणे विसरतो.
पण मनाच्या शांतीसाठी, आम्ही यापुढे त्यांच्यासारखी फार्महाऊस खरेदी करू शकत नाही, परंतु निसर्गासोबत थोडा वेळ घालवू शकतो. कामात सर्व वेळ, दडपण आणि उद्याची चिंता, तुम्ही कुठेतरी राहणे विसरलात का ? तर इथून पुढे आपण मुक्त छंद जगा.
धर्मेंद्र पाजी यांच्या सारखेच जुही चावला ही अभिनेत्री सुद्धा आज शेती करत आहे. तिचे सुद्धा सोशल मीडियावर व्हिडीओ आपल्याला दिसतच असतात. मध्यंतरी 5G आणू नका म्हणून तिने को’र्टात के’स ही दाखल केली होती. ज्यामध्ये तिलाच भरपूर मोठा दं’ड भरावा लागला होता.
अभिनेते नवाजुद्दीन हे आजही कार्यरत आहेत अभिनय क्षेत्रात; पण त्यांच्या गावी भरपूर शेती आहे. ज्यामध्ये शेतीत सध्या उस आहे. भविष्यात मी शेती करणार आहे असेही नवाजुद्दीन अनेकदा म्हणाले आहेत. त्यासोबत पंकज त्रिपाठी यांचे आई वडील आजही गावी शेती करतात. तर असे अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. या सर्व शेतकऱ्यांना, अभिनेत्यांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा !…
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.