राजे-महाराजांच्या घराण्यातील आहेत या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, ही अभिनेत्री तर…
बॉलिवूडच्या जगात बर्याचदा असे दिसते की कलाकार एखाद्या रॉयल फॅमिली सारखे जीवन जगत असतात. अनेक राजा महाराजांवर चित्रपट बनविले जातात, त्याअनुषंगाने बऱ्याच अभिनेत्री महाराण्यांची भूमिका साकारताना दिसून येतात. आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या खऱ्या आयुष्यातील महाराजांच्या कुळातील आहेत.
सर्वप्रथम बोलूया 90 च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री. भाग्यश्री राजघराण्यातील आहे हे फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यांचे वडील विजयसिंह राव माधवराव पटवर्धन हे राजा होते आणि त्यांना त्यांच्या मुलीने (भाग्यश्री) चित्रपटात काम करणे पसंत नव्हते. भाग्यश्री यांनी कमी वयातच लग्न करून चित्रपटसृष्टी सोडली. आज ती आनंदाने जीवन जगत आहे.
आपण टीव्हीची नामांकित अभिनेत्री आणि डांसर मोहिना कुमारीबद्दल ऐकले असेलच. मोहिना ही रीवाची राजकन्या आहे. मोहिना ही महाराजा पुष्पराजसिंग जुदेव यांची मुलगी आहे आणि बर्यापैकी शाही जीवन जगते. एवढेच नव्हे तर उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री आणि अध्यात्मिक गुरु सतपाल महाराज यांची सून देखील आहेत. तिने सुयेश रावत सुयशशी लग्न केले आहे. ती नेहमी सोशल मीडियावर आपल्या पतीबरोबरचे फोटो शेअर करत राहते. ती खूपच सुंदर दिसते. बरोबर ना?
अभिनेत्री सोनल चौहान जी आता चित्रपटांपासून थोडी दूर आहे, पण सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. सोनल उत्तर प्रदेशच्या राजपूत रॉयल फॅमिलीशी संबंधित आहे. ती खूपच सुंदर दिसते आणि आता आनंदी जीवन जगते. जगणारच शेवटी ती राज परिवारातील आहे…
हैदराबादच्या राजघराण्यात जन्मलेली अदिती राव हैदरी आज बॉलिवूडची नामांकित अभिनेत्री बनली आहे. अदितीचे पंजोबा जे. जे. रामेश्वर राव यांनी तेलंगणाच्या वनपर्थ्यावर राज्य केले होते. आदिती ही तिच्या अभिनयाने तुम्हाला वेड लावेल, वेळ मिळाला तर नक्कीच पहा तिचा एखादा चित्रपट.
सैफ अली खान आणि सोहा अली खान पटौदी कुटुंबातील आहेत. वडिलांच्या नि-ध-नानंतर 2011 मध्ये सैफ अली खानला ‘पतौडी नवाब’ बनवण्यात आले होते. सैफ आणि सोहा दोघेही बॉलीवूड मधील प्रसिद्ध कलाकार आहेत.
चित्रपट निर्माते आणि अभिनेता आमिर खानची पत्नी किरण राव देखील राजघराण्यातील आहे. तिचे आजोबा राजा जे.जे. रामेश्वरराव वानपर्तीचे राजा होते. किरण आणि अदिती या चुलत बहीणी आहेत.
रिया आणि रायमा, प्रसिद्ध अभिनेत्री ‘मुनमुन सेन’ च्या मुली आहेत, त्या दोघीही त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. त्यांची आजी बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांची एकुलती एक मुलगी होती. तिची आजी ‘इला देवी’ कूचबिहारची राणी होती, ती जयपूरच्या राणी ‘गायत्री देवी’ची मोठी बहीण होती.
चक दे इंडिया या चित्रपटातील अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू ‘जहीर खान’ ची पत्नी सागरिका देखील रॉयल कुटुंबातील आहेत. तिची आजी इंदौरचे महाराजा ‘तुकोजीराव होळकर’ यांची तिसरी मुलगी आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.