बॉलीवूड मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री आहे एक उत्कृष्ट ‘पेंटर’, तिच्या पेंटिंग पाहून चकित व्हाल!
“छंद माझा हा वेगळा, थोडा अल्लड अन् थोडा न्यारा” मित्रांनो आपल्या सर्वांना वेगवेगळे छंद असतातच. कुणाला लिखाणाचा तर कुणाला गाण्याचा..असो. तर आपले बॉलीवुड सेलिब्रिटीज सुद्धा अभिनयासोबतच अनेक कलांमध्ये पारंगत आहेत. अशीच एक तुमची आमची सर्वांची लाडकी अभिनेत्री जान्हवी कपूर. म्हणजेच आदरणीय दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची सुकन्या.
तुम्हांला ठाऊक आहे का, जान्हवीला चित्रकलेची भन्नाट आवङ आहे. तिने स्वतः बनवलेल्या पेंटिंग्ज तुम्हांला तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतील. ती सर्व पेंटिंग्ज खूपच सुंदर आहेत. त्यामुळेच तर जान्हवी कपूर च्या सर्व पेंटिंग्जला सोशल मीडियावर कमालीचा प्रतिसाद मिळत आहे.
तिच्या कित्येक फॅन्सनी या पेंटिंग्ज वर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. तसेच इतर सेलिब्रिटीज सुद्धा तिच्या या सुंदर पेंटिंग्जचे भरपूर कौतुक करतात. त्याचप्रमाणे आपल्याला तर माहीतच आहे की, बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये जान्हवी ही खूप फेमस अभिनेत्री आहे. कारण तिच्याकङे बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत.
जान्हवीच्या “गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल” आणि “रूही” या चित्रपटांचे विशेष कौतुक केले गेले. त्यानंतर तिने मल्याळम चित्रपट “हेलेन” च्या हिंदी रिमेक मध्ये सुद्धा ती दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.