या प्रसिद्ध अभिनेत्रींची मुलं कधीच पाहत नाही त्यांचे चित्रपट, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड चकाचौंध दुनिया ही कुणाला आवडत नाही, असे तर कुणी शोधूनही सापडणार नाही. बोल्ड व ग्लॅमरस लुकिंग अभिनेत्री पाहण्यासाठी तर सर्वांच्या काळजाचं अक्षरशः पाणी होते. आपल्या फेवरेट अभिनेत्रीची फिल्म पाहण्यासाठी आपण कासावीस होतो. एक चित्रपट आपण कित्येक वेळा पाहतो. पण तुम्हांला ठाऊक आहे का, बॉलीवुड अभिनेत्रींच्या मुलांना मात्र आपल्या आईचे चित्रपट पाहायला अगदी जीवावर येतं. हे ऐकून तुम्हांला थोङे विचित्र वाटेल. मात्र हे अगदी सोळा आणे सत्य आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अशाच अभिनेत्रीं बद्दल सांगणार आहोत, ज्यांची मुले त्यांचे चित्रपट ढुंकून सुद्धा पाहत नाहीत.

जुही चावला : 1990 च्या दशकातील पॉप्युलर अभिनेत्री सुपरस्टार जुही चावला. जुही चे चुलबले बोलणे, तिची मोहक अदाकारी स्माईल आणि मादक सौंदर्य यावर तिचे लाखो चाहते फिदा आहेत. जुहीने आपल्या करियरच्या कारकीर्दीत आमीर खान, शाहरुख खान यांसारख्या अनेक दिग्गज सुपरस्टार अभिनेत्यांसोबत काम केले आहे. तिच्या चित्रपटांची कमाल ही काही निराळीच होती. मात्र जुही चावला हिने आपल्या मुलाखतीत सांगितले आहे की, तिच्या मुलाला माझे चित्रपट पाहायला मुळीच आवडत नाही. कारण चित्रपटात मला रोमान्स करताना पाहून तो खूप अनकम्फर्टेबल होतो, यासाठी तो आपल्या अभिनेत्री आईचे चित्रपट पाहणे, बरेचदा टाळतो. “कयामत से कयामत तक” या चित्रपटामुळे जुहीला अमाप प्रसिद्धी मिळाली होती.

See also  अभिनेत्री रश्मिका मंदाना आहे तब्बल करोडोंच्या संपत्तीची मालकीण, लक्जरी लाईफस्टाइल करते एन्जॉय...

काजोल : काजोल ही इंडस्ट्रीमधील एक फेमस अभिनेत्री आहे. तिने आपल्या करियरच्या कारकीर्दीत अनेक सुपरङुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. किंग खान शाहरुख खानची आणि काजोलची जोडी ही इंडस्ट्रीमधील एक सुपरहिट जोडी होती. मात्र काजोलच्या मुलांना तिचे चित्रपट पाहायला अजिबात आवडत नाही. यामागील कारण तिला विचारले असता, काजोल म्हणते की, माझ्या मुलांना मला चित्रपटात रडताना पाहायला मुळीच आवडत नाही. म्हणून ते माझे फिल्म पाहत नाहीत. तर काजोल अनेकदा आपल्या मुलांसोबतचे फोटोज् सोशल मीडियावर शेयर करत असते.

माधुरी दीक्षित : धक धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या सौंदर्याची कीर्ती तर संपूर्ण जगभरात आहे. तिची एक हलकीशी झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांचा जीव अगदी कासावीस होतो. अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने आपल्या करियरच्या कारकीर्दीत शाहरुख खान, संजय दत्त, अनिल कपूर, नाना पाटेकर अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. सध्या ती फिल्म्स मध्ये काम करत नसली तरीही ङान्सिंग शो मध्ये माधुरी जर्ज ची भूमिका पार पडताना दिसते.

See also  काय आहे क्रांती रेडकरचा इतिहास? पहा नवाब मलिक काय म्हणाले तिच्या बद्दल...

अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या मुलांना सुद्धा आपल्या आईचे चित्रपट पाहायला बिलकुल आवडत नाही. इतकंच नव्हे तर तिने सांगितले की, जर माझ्या मुलांना चित्रपटातील एखादा सीन आवडला नाही, तर ते लगेचच तोंडावर बोलून दाखवतात. त्यामुळे ते विशेषतः माझे चित्रपट पाहणे टाळतात.

करिश्मा कपूर : 1990 च्या दशकातील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री. जिच्या मोहक आवाजाची आणि मादक सौंदर्याची नशा आजवर तिच्या चाहत्यांच्या हृदयावर आजवरही कायम आहे. करिश्मा ही बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एक सुपरहिट क्वीन अभिनेत्री आहे. तिने आपल्या करियरमध्ये अनेक सुपरङुपरहिट चित्रपट दिले आहेत. परंतु तिची स्वतःची मुले मात्र तिचे चित्रपट पाहण्याचे टाळतात. त्या उलट ते आपली मावशी करीना कपूर चे खूप फॅन्स आहेत. करिना कपूरचा एकही चित्रपट पाहायचे करिश्मा ची मुलं सोडत नाहीत.

See also  शारीरिक संबंध बनवण्यासाठी नकार दिल्याने या प्रसिद्ध मॉडेलची झाली ह'त्या... कारण...

ट्विंकल खन्ना : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अक्षय कुमार याची ब्यूटीफुल पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना. ट्विंकल आज चित्रपटांत काम करत नसली तरीही तिच्या चित्रपटांची कीर्ती आणि तिच्या सौंदर्याची छाप तिच्या चाहत्यांच्या मनावर आजही तितकीच टिकून आहे. सध्या ट्विंकल एक लेखिका म्हणून काम करते. पण तुम्हांला माहित आहे का, तिचा मुलगा आरव हा तिच्या चित्रपटांची खूप खिल्ली उडवतो. आरव प्रामुख्याने आपल्या आईचे किसींग सीन पाहून तिची खूप मज्जा घेतो, असे अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने आपल्या मुलाखतीत सांगितले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment