दीपिका पासून माधुरी पर्यंत या बॉलीवुड अभिनेत्रींचे मंगलसूत्र आहेत खूपच महाग, त्यांची कीमत ऐकून थक्क व्हाल!
आज ग्लॅमरस दुनियात मग्न असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कोणत्याही बाबतीत मागे नाहीत, मग ती त्यांची जीवनशैली असो किंवा त्यांची फॅशन. किंवा मग सोशल मीडियावर चे व्यक्त होणे. सगळी कडे त्याच आघाडीवर दिसत आहेत. या बॉलिवूड अभिनेत्री असे महागडे कपडे किंवा दागिने घालतात ज्यांची किंमत सामान्य माणसाला पूर्णपणे आश्चर्यचकित करते. कारण ती इकते असते की त्या रुपयात 10 कुटुंब स्वतःच्या उदरनिर्वाह करण्याची सोय करतील.
दुसरीकडे काय होतं की जेव्हा एखादी अभिनेत्री लग्न करते, तेव्हा तिच्या दागिन्यांपासून तिच्या लेहेंगापर्यंत सर्व काही खूप महाग असते. प्रचंड महागड्या वस्तू ते वापरतात. पण असेही म्हटले जाते की नवीन वधू तिच्या मेकअपमध्ये कोणतीही कसर सोडत नाही, अशा परिस्थितीत आपल्या बॉलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रींना कसे मागे ठेवता येईल. बरोबर आहे. त्या स्वतः सुद्धा यात कधी मागे राहत नाही.
चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या लग्नाच्या निमित्ताने केवळ महागडे कपडे किंवा दागिने घातलेले नाहीत, तर त्यांच्या लग्नात त्यांनी असे महागडे मंगळसूत्र परिधान केले आहे, की ज्याची किंमत नक्कीच तुमच्या मनाला आश्चर्याचा धक्का देईल. वैवाहिक जीवनात मंगळसूत्र ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अश्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी सर्वात महागडे मंगळसूत्र घातले होते. ज्या अभिनेत्री यांना तुम्ही ओळखता काहींचे तर तुम्ही फॅन असाल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.
सध्या शिल्पा शेट्टीला राज कुंद्राच्या अटकेचा सामना आयुष्यात करावा लागत आहे. राज कुंद्रासोबत त्याची पत्नी शिल्पा शेट्टीलाही सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. तिला या सर्वाचा त्रास होत आहे. पण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये, शिल्पा शेट्टी त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी फॅशन असो किंवा जगणे, कोणत्याही अर्थाने कोणाच्याही मागे नाही.
तिच्या लग्नाच्या दिवशीही शिल्पा लाल रंगाच्या लेहेंगामध्ये खूपच सुंदर दिसत होती. शिल्पा शेट्टीने 22 नोव्हेंबर 2009 रोजी लंडनमधील उद्योजक राज कुंद्रासोबत लग्न केले. शिल्पा शेट्टीने तिच्या लग्नात घातलेले मंगळसूत्र सुमारे 30 लाख रुपयांचे होते. तसे, राज कुंद्रा अनेकदा शिल्पा शेट्टीला महागड्या भेटवस्तू देतात. बघा म्हणजे तिचं आयुष्य किती महागडं आहे.
अनुष्का शर्मा तिच्या लग्नात खूप सुंदर दिसत होती. तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होता. अनुष्का शर्माने 2017 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत इटलीमध्ये लग्न केले. या दोघांच्या लग्नात फक्त त्यांचे जवळचे लोक उपस्थित होते. पण अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नात पाण्यासारखा पैसा वाया गेला. विराटने अनुष्काला घातलेले मंगळसूत्र एक गोंडस पण मोठे लटकन होते जे हिऱ्यांनी जडलेले होते. त्याची किंमत सुमारे 52 लाख असल्याचे सांगितले जाते. ज्या 52 मध्ये सर्वसामान्य गरीब काय काय करतो. मोठ्या घरामध्ये पैसे उडवणे म्हणजे क्षुल्लक गोष्ट असते.
अनुष्का आणि विराटप्रमाणेच दीपिका आणि रणवीर सिंगच्या लग्नाचीही खूप चर्चा झाली. दीपिकाच्या लूकचे सर्वत्र कौतुक झाले. दोघांनी इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील फार कमी लोक उपस्थित होते. रणवीर सिंगने दीपिका पदुकोणला घातलेले मंगळसूत्र सॉलिटेअरसह आकर्षक डिझाइनमध्ये बनवले होते।. एका रिपोर्ट्सनुसार, दीपिकाच्या मंगळसूत्राची किंमत 20 लाख रुपये होती.
सोनम कपूरचे लग्न मुंबईतच झाले. 8 मे 2018 रोजी तिने तिचा प्रियकर आनंद आहुजासोबत तिने लग्न केले. सोनम तिच्या लग्नात लाल रंगाच्या लेहेंगामध्ये खूप सुंदर दिसत होती. तिचा हा लेहेंगा सुमारे 10 लाखांचा होता. पण आनंद आहुजाने लग्नात तिला घातलेले मंगळसूत्र फक्त 50 हजार रुपये खर्च केले. इथे मात्र मंगसळसूत्र एवढ्या कमी चं का असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने 2018 मध्ये परदेशी निक जोनासशी लग्न केले. त्यांचे लग्न उदयपूरमध्ये झाले होते. प्रियांका चोप्रा तिच्या लग्नात खूप सुंदर दिसत होती ज्याची सर्वत्र चर्चा होत होती. सोशल मीडियावर तर फोटो नुसते तुफान व्हायरल होत होते. प्रियांका चोप्राच्या दागिन्यांपासून तिच्या ड्रेसपर्यंत प्रत्येक गोष्टीची किंमत लाखो होती. निकने प्रियांकाला लग्नाच्या वेळी घातलेले मंगळसूत्र 21 लाख रुपयांचे होते.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न बॉलिवूडमधील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक आहे. ऐश्वर्या रायने तिच्या लग्नात कोट्यवधी किमतीचे दागिने परिधान केले होते एवढेच नाही तर अभिषेकने ऐश्वर्याला थ्री पीस डायमंड मंगळसूत्र घातले होते. त्या मंगळसूत्राची किंमत 45 लाख रुपये होती.
शेवटची अभिनेत्री ती म्हणजे बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित, जिने आपल्या स्मित आणि अभिनयाने सर्वांची मने जिंकली, अभिनेत्री नेही डॉ नेनेशी खूप धूमधडाक्याने लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, माधुरीने तिच्या लग्नात घातलेले मंगळसूत्र आठ लाखांच्या जवळपास होते.
तर असे अनेक उदाहरणे देता येतील. इंडस्ट्रीत अजून करोडो पती बरेच कलाकार आहेत. तेही जगण्यावर वायरफळ खर्च करतात. पण आजच्या पुरती एवढीच माहिती. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. वाच रहा स्टार मराठी न्यूज.