वयाच्या चाळीशीत देखील या प्रसिद्ध अभिनेत्री राहिल्या होत्या गरोदर, ही अभिनेत्री तर वयाच्या 43 व्या वर्षी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

लहान मुलांना जन्म देण्याबाबतच्या काही ठराविक गोष्टी गा’य’नॅ’कॉ’लॉ’जि’स्ट कडून सांगितल्या जातात. त्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे, लहान मुलांना महिलांनी शक्यतो जन्म देण्याचा विचार हा वयाच्या 25 ते 30 या दरम्यानच केला पाहिजे. या पाच वर्षांचा कालावधी हा स्त्रीच्या ग’र्भासाठीच्या पोषक वाढीला पुरेपुर योग्य ठरणारा असतो, असं म्हटल्या जातं.

किंबहुना महिलांना सांगितल्या जातं की, याच वयात तुम्ही नवजात शिशुला जन्म देण्याबाबत विचार केला पाहिजे. परंतु या सर्व बाबींना एकप्रकारे चुकीचं ठरवत काही बाॅलीवुड अभिनेत्रींनी वाढत्या वयात तीशी ते चाळीशीदरम्यानही मुलांना सुखरूपरित्या जन्म दिला आहे. चला तर मग कोण आहेत या अभिनेत्री आपण त्यावर एक नजर टाकूयात. सर्वात आधी सांगायचं झालं तर आपण करिना कपूरबद्दल बोलुया.

See also  आपल्या पतीमुळे झाले या अभिनेत्रीचे करियर बरबाद, शेवटी वेश्याव्यवसाय करत दिवस काढत होती...

ae76eda1683366fe1532c9b705cc0a06

करिना अर्थात बाॅलीवुडची बेबो आज वयाच्या चाळीसाव्या वर्षात दुसऱ्यांदा आई होत आहे. वयाच्या थेट छत्तीसाव्या वर्षी बेबो पहिल्यांदा आई झाली होती, तिने तैमुरला जन्म दिला होता. तमाम भारतवासीयांवर आपल्या सौंदर्यातून राज्य केलेली अभिनेत्री अर्थात ऐश्वर्या राय बच्चन.

aish2

ऐश्वर्याने वयाच्या तेहतीसाव्या वर्षी लग्न केलं आणि त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे वयाच्या सदोतीसाव्या वर्षी ऐश्वर्या एका मुलीची आई झाली, अर्थातचं त्या मुलीच नावं आराध्या आहे. आणि आराध्या अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांची प्रचंड लाडकी आहे.

shilpa

आता पुढे आणखी एका जबरदस्त अभिनेत्रीची ही गोष्ट आहे, जी सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. ती अभिनेत्री म्हणजेच शिल्पा शेट्टी. शिल्पाचं लग्न बिझनेसमॅन राज कुंद्रा यांच्यासोबत वयाच्या 34 व्या वर्षी झालं. आणि तब्बल वयाच्या सदोतीसाव्या वर्षी शिल्पा पहिल्यांदा आई बनली.

See also  काजोलने शेयर केले आपल्या सक्सेसफुल करियर मागील सिक्रेट, हे ऐकून तर तुम्ही देखील थक्क व्हाल!

kajol 1

अजय देवगण याची पत्नी अभिनेत्री काजोलचाही या लिस्टमधे समावेश होतो, तिने वयाच्या तीशीत आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. काजोलने मात्र त्यानंतर तब्बल सहा ते सात वर्षांचा गॅप घेतला आणि दुसऱ्या बाळाला वयाच्या छत्तीसाव्या वर्षात जन्म दिला.

rani

एके काळी आपल्या अभिनयाने सर्वांच्या ह्रदयावर राज्य गाजवलेली सदाबहार अभिनेत्री म्हणजे रानी मुखर्जी. रानीनेदेखील आपल्या वयाच्या सदोतीसाव्या वर्षात पहिल्या बाळाला जन्म दिला. तिने आदित्य चोप्रा या फिल्मफेकरसोबत लग्न केलेलं आहे. पुढे या अभिनेत्रीबद्दल बोलायचं म्हणजे, फक्त धकधक गर्ल हा शब्द वापरताच जिची प्रतिमा आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभी राहते अशी अभिनेत्री अर्थात माधुरी दीक्षित.

madhuri

माधुरीने डॉ. नेणेंसोबत लग्न केल्यानंतर वयाच्या 37 व्या वर्षात पहिल्या बाळाला जन्म दिला आणि नंतर दोन वर्षांच्या गॅपने तिला दुसर्‍या बाळाची प्राप्ती झाली. या सर्व अभिनेत्रींच्या आकडेवारीवरून तुम्हाला लक्षात येईलच की, या कित्येक अभिनेत्रींनी जवळपास वयाच्या 35 व्या वर्षानंतरही आपल्या बाळाला सुखरूपरित्या जन्म दिला आहे.

See also  प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने केला मोठा धक्कादायक खुलासा, म्हणाली, "मला किसिंग सीन.."

farah

यात एक गजब गोष्ट सांगायची म्हणजे, फिल्ममेकर फराह खान ही नैसर्गिकरित्या आई बनू शकली नाही परंतु ती “आय व्ही एफ” या तंत्रज्ञानाच्या मदतीने वयाच्या ४३ व्या वर्षी चक्क तीन मुलांची आई झाली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment