हे प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठी घेतात तब्बल इतकी फीस, ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवूड असो वा इतर कोण’त्या क्षेत्रातील सेलिब्रिटी असो, तो प्रत्येकजण आज तुम्हाला सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह राहणारा दिसेल. तुम्हाला वाटतं याचं कारण चाहत्यांमध्ये असलेली त्याची क्रेझ किंबहुना त्याच्याबद्दलच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घेण्याबाबतची ओढ हे सर्व त्या पाठीमागे कारण असू शकेल.

परंतु तुम्हाला जर समजलं यातलं काहीच शंभर टक्के खरं म्हणता येणार नाही तर? चला तर मग पाहुयात या पाठीमागची खरी गंमत नेमकी काय आहे? अर्थातचं तुम्हाला आजवर इंटरनेट आणि

त्यामाध्यमातून होणारा एखाद्या ब्रॅन्डचा अथवा त्याच्या जाहिरातीचा एक ट्रेंड कशा पद्धतीने चालला जातो याबाबत बेसिक माहिती आहेच. त्यातही तुम्हाला युट्यूब चॅनेल माॅनीटायझेशन, पेज व्हेरीफाय होणं, वगैरे गोष्टींच थोडकं का असेना ज्ञान आहेच.

मग एक अशीच बात आता तुमच्यासमोर आम्ही सांगत आहोत ती अशी कि, मोठेमोठे सेलीब्रेटी हे एखाद्या कोणत्याही पोस्टसाठी पैसे घेत असतात. निश्चितच तुम्ही म्हणालं यात नवीन काय आहे? परंतु एकदा भारतीय क्रिकेटर आशिष नेहरा म्हणाला होता की,

मला एखाद्याने पोस्ट करण्यासाठी कोटी रूपये जरी दिले तरिदेखील मी असं काही करणार नाही. परंतु प्रत्यक्षात प्रत्येकजण असं करू शकतं नाही. अर्थातचं कलाकाराला पेन्शन नावाचा प्रकार नसतो त्यामुळे जोवर काम चालत आहे, प्रसिद्धी आहे तोवर पैसा कमावून ठेवणं हेही त्यासाठी भागच आहे. तर मग आपण आता पाहुयात कोणता सेलीब्रेटी एका पोस्टसाठी किती रक्कम आकारतो?

सध्या भारतीय लिस्टमधला इन्स्टाग्राम अकाउंटवर टाॅप टेनमधे फाॅलोवर्सची संख्या अधिक असलेला एकवेळ व्यक्ती आहे तो म्हणजे, विराट कोहली. आज नाही म्हणता विराटचे चक्क ९० मिलीयनपेक्षा अधिक फाॅलोवर्स झालेले आहेत.

तो एका पोस्टला शेअर करण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये घेत असल्याची खबर आहे. त्यानंतर भारतातून सध्या अमेरीकेत स्थायिक होणारी प्रियांका चोप्रा ही एका पोस्टमागे सर्वाधिक पैसे घेणारी अभिनेत्री कलाकार समजली जाते

ती तब्बल दोन कोटी रूपये इतके पैसे एका पोस्टमागे आकारत असल्याची चर्चा आहे. याशिवाय सोशल मीडियावर सतत अपडेट राहणारे, बाॅलीवुडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हेदेखील एक पोस्टसाठी जवळपास ५० लाख रूपयांची रक्कम स्विकारतात.

याखेरीज बाॅलीवुडमधला किंग खान अर्थात शाहरूख तर दुसरीकडे आलिया भट दोघेही प्रत्येकी पोस्टसाखी एक एक कोटी रूपये इतके पैसे घेतात, असं समजलं आहे. सध्या आलिया भट हिने आपल्या कमाईच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्रींना मागे टाकल्याचं चित्र पहायला मिळतं आहे.

अमिताभ यांच्या सोशल मिडीयावर सतत काही ना काही चर्चा रंगत असतात, त्यांच्या पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय बनून राहतात. दुसरीकडे प्रियांका चोप्रा हीने नव्या भारतीय स्त्रीला एक वेगळीच दृष्टी देण्याचं काम तिच्या आजवरच्या कलाकार म्हणून झालेल्या प्रवासामधून व तिने कमावलेल्या यशामधून केलं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment