ऋतिक रोशनने ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाबद्दल मांडले हे मत, अजय आणि काजोलने…
या वर्षाच्या सुरुवातीस 10 जानेवारी रोजी अजय देवगणचा तानाजी: द अनसंग वॉरियर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षक या दोघांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तानाजी: द अनसंग वॉरियर अजूनही बॉक्स ऑफिसवर आपले स्थान कायम राखत पुढे चालला आहे. अजय देवगणचा चित्रपट सेलिब्रिटींना देखील आवडला आहे. नुकताच बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने अजय देवगणचा तानाजी हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट त्याला खूप आवडला.
हृतिक रोशनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तानाजीचे कौतुक केले आहे. हृतिक रोशनने लिहिले कि – तानाजी: द अनसंग वॉरियर चित्रपट नुकताच पाहिला, काय मस्त चित्रपट आहे. आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट ऍक्टिव. अजय देवगन आणि काजोलचा उत्तम अभिनय. सैफ शानदार आहे. संपूर्ण कास्ट आणि क्रू यांच्या कठोर परिश्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे.
Just watched #Tanhaji what an incredible movie . Best action ever. @ajaydevgn and Kajol take a bow ! Saif is just brilliant . Entire cast/crew needs an applause for this massive effort! @Officialneha u were superb. What a film 👏
— Hrithik Roshan (@iHrithik) February 18, 2020
आम्ही आपल्याला सांगू इच्छतो कि तानाजी: द अनसंग वॉरियर चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात काजोलने तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. सैफ अली खानने खलनायक उदयभान राठोडची भूमिका साकारली आहे.
तानाजी: द अनसंग वॉरियर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडक कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 350 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या खूप चित्रपटांचा तानाजी: द अनसंग वॉरियर चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम झाला नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.