‘राजा हिंदुस्थानी’ तील ‘त्या’ किसिंग सिन बाबतीत करिश्मा कपूरने केला खुलासा, म्हणाली, “अमीर…

करिश्मा कपूर बॉलिवूडमधील 90 च्या दशकातली सर्वात सुंदर आणि गुणी अभिनेत्री आहे. आज करिश्मा कपूर जरी चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहते. आपल्या काळात तिने इंडस्ट्रीत अनेक हिट फिल्म्स दिली आहेत. त्या काळात करिश्माने जवळपास प्रत्येक सुपरहिट अभिनेत्याबरोबर काम केले आहे. त्याचबरोबर करिश्माने ‘मेंटलहुड’ या वेब सिरीजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवले आहे.

आजकाल ती आपल्या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान करिश्माने आपल्या सुपरहिट फिल्म ‘राजा हिंदुस्थानी’ मध्ये आमिर खानसोबत किसिंग सीनबद्दल काही गोष्टी शेअर केल्या.

करिश्माच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपटाबद्दल जेव्हा कधी चर्चा होते तेव्हा एका चित्रपटाचं नाव हमखास घेतलं जातं तो म्हणजे ‘राजा हिंदुस्तानी’. 1996 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन 24 वर्ष झाली असून त्यानंतर करिश्माने चित्रपटाशी संबंधित एक खुलासा केला आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने नुकतीच तिच्या ‘मेंटलहुड’ या वेब मालिकेबद्दल फिल्म समीक्षक राजीव मसंद यांना मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान, तिने आमिर खानबरोबरच्या तिच्या 1996 च्या सुपरहिट फिल्म राजा हिंदुस्थानी चित्रपटात त्याच्या किसिंग सीनबद्दल काही खुलासा केला आहे. आमिरबरोबर किसिंग सीन शूट करताना तिला कोणत्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला हे करिश्माने सांगितले.

1996 मध्ये आलेल्या या चित्रपटात करिश्मासोबत आमीर खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. चित्रपटातील गाणी तर आजही लोक गुणगुणत असतात. त्यातील ‘परदेसी जाना नाही’ हे गाणं आजही अनेक ठिकाणी वाजताना ऐकायला मिळतं. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा एका सीनची जबरदस्त चर्चा होती. हा सीन होता आमीर खान आणि करिश्माचा किसिंग सीन.

‘राजा हिंदुस्तानी’ मधील करिश्मा आणि आमिरच्या किसिंग सीनची गणना फिल्म इंडस्ट्रीतील खूप वेळ किस करणाऱ्या सीनमध्ये केली जाते. करिश्मा कपूर म्हणाली की, त्या काळात ‘राजा हिंदुस्थानी’ चे ‘किसिंग सिन’ ची खूप चर्चा होती. त्यावेळी माझ्यासाठी हे किसिंग सीन करणे सोपे नव्हते.

या सीनसंबंधी करिश्माने खुलासा केला असून त्यावेळी आपण प्रचंड घाबरलो होतो असं सांगितलं आहे. आपण अक्षरश: थरथरत होतो असं ती सांगते. हा सिन पूर्ण करण्यास आम्हाला तीन दिवस लागले. मी विचार करत होते की हा किसिंग सीन कधी संपेल.

कारण फेब्रुवारी महिन्यात ऊटीमध्ये इतकी थंडी होती आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिन शूट झाला होता आणि मी थंडीने थरथरत होते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छतो कि हा ‘राजा हिन्दुस्तानी’ हा चित्रपट 24 वर्षांपूर्वी आला होता.

सध्या करिश्मा कपूर बॉलिवूडपासून दूर आहे. पण आजही तिचे अनेक चाहते आहेत. चित्रपटांपासून दूर असलेली करिश्मा आता वेब सीरिजच्या माध्यमातून पदार्पण करण्यास सज्ज आहे. करिश्मा लवकरच जी ५ वर येणाऱ्या मेंटलहूड वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment