बॉलीवुड स्टार्स लग्नात परफॉर्मन्स सादर करण्यासाठी आकारतात तब्बल एवढं मानधन, शाहरुख खान तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटीज हे आपल्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफमुळे देखील नेहमी चर्चेत असतात. त्यामुळे त्यांच्या फॅन्सना सुद्धा स्टार्स च्या ग्लॅमरस आणि लक्जरी लाईफस्टाइलचे आकर्षण असते. त्याचबरोबर आपल्या आवडत्या कलाकाराची एकूण प्रॉपर्टी किती आहे, ते अभिनया व्यतिरिक्त आणखी काय करतात, त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या आहेत. हे जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स खूप उत्सुक असतात. त्यामुळे हे स्टार्स लग्नसमारंभात ङान्स करण्यासाठी तब्बल किती मानधन आकारतात, हे आपण आज पाहूया.

सलमान खान – दबंग स्टार सलमान भाईजान याचा चाहतावर्ग तर अफाट आहे. त्यामुळे त्याची एक छोटीशी झलक पाहण्यासाठी देखील त्याचे फॅन्स अगदी वेडेपिसे होतात. अहो, परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, कोट्यवधींचा मालक असणारा सल्लू भाईजान लग्नामध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी तब्बल 2 कोटी इतकं मानधन आकारतो.

See also  बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या लग्नाचे आतील फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल...

शाहरूख खान :
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेचा किंग खान हा सुद्धा मोठमोठ्या कार्यक्रमात, राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रिटींच्या लग्न सोहळ्यांत ङान्स करतो. मात्र त्यासाठी तो 3 कोटी रुपए घेतो, असे मीडिया रिपोर्टस् नुसार म्हटले जाते.

कतरिना कैफ :
अभिनेत्री कतरिना कैफ ही बॉलीवुडची एक मोस्ट ब्युटीफूल अभिनेत्री आहे. नुकतेच तिने अभिनेता विक्की कौशल सोबत सप्तपदी घेतले आहेत. कतरिना सुद्धा अनेक कार्यक्रमांमध्ये ङान्स परफॉर्मन्स करते. परंतु त्यासाठी ती तब्बल 3.5 कोटी रुपए आकारते.

अक्षयकुमार :
बॉलीवुडचा खिलाडी अभिनेता अक्षयकुमार याचे तर वर्षभरात तीन-चार चित्रपट तर हमखास रिलीज होतात. तरीदेखील तो दिग्गजांच्या कार्यक्रमांत ङान्स परफॉर्मन्स सादर करतो. त्यासाठी तो अडीच कोटी मानधन घेतो.

प्रियांका चोप्रा :
बॉलीवुडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा हॉलीवूड नगरीत सुद्धा बोलबाला आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता ही अगदी सातासमुद्रापार पसरलेली आहे. प्रियांका चोप्रा एका ङान्स परफॉर्मन्ससाठी 2.5 कोटी रुपए घेते.

See also  नाराज होऊन एकदा अभिनेता संजय दत्त रस्त्यावरच लोळू लागला होता, त्यानंतर त्याच्या वडिलांना असे काही करावे लागले कि...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment