विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडल्या या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, 3 नंबरची अभिनेत्री तर…
बॉलिवूड म्हंटलं की श्रीमंती, ग्लॅमरस दुनिया त्यासोबत चर्चेत राहणं हे सगळेच आलं. कारण इथे अनेक अभिनेते अभिनेत्री आपल्या कामाने प्रसिद्ध होतात. चाहत्यांना मोहित करून टाकतात. आणि याच वेळी नकळतपणे एकमेकांच्या प्रेमात पडतात. आणि कधी पुन्हा बाहेर पडतात हेही कळत नाही. बरं इथे लग्न झाल्यानंतर ही प्रेम होतं आणि आधीही.
कसं आहे मित्रानो ! बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनय कलेच्या जोरावर मोठे नाव कमावले आहे. त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत राहिलेल्या काही अभिनेत्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बर्याच चर्चेत होत्या. कारण पैसे आणि प्रसिद्धी आली की माणूस जमिनीवर राहतच नाही; पण त्याचा तोटा येई असा असतो की कधी पडू शकतो याचा भरवसा नसतो.
आता अशा काही अभिनेत्री आहेत की ज्यांचे हृदय म्हणजे मन हे विवाहित पुरुषात गुंतलेले आहे. म्हणजे विवाह बाह्य संबंधित बॉलिवूड मधील चला त्यातील काही अभिनेत्रींवर नजर टाकूयाः सविस्तर जाणून घेऊया.
90 च्या दशकाची प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाझने ( farah najh ) बिंदू दारा सिंगशी ( bindu dara singh ) लग्न केले. पण काही वर्षानंतर दोघांचाही घटस्फो’ट झाला. बिंदूपासून घटस्फो’टानंतर फराहने बॉलिवूड अभिनेता सुमित सहगलशी ( sumit sahgal ) लग्न केले. सुमित सहगलचे आधीच लग्न झाले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शाहीन बानो (shaheen bano ) होते. म्हणजे बघा इथे नातं बनवायला आणि टिकवायला फार वेळ लागत नाही.
तब्बू या अभिनेत्री ला कोण बरं ओळखत नसेल ? ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. त्याचसोबत लोकप्रिय सुद्धा. पण नाव आणि पैसे हे असूनही तिचं मन एका जागेवर थांबलं नाही. अनेकांशी तिचं नाव जोडल्या गेलं आहे. तिचं नाव सुरुवातीला साजिद नाडियाडवाला ( sajid nadiyadwala ) आणि नंतर दक्षिणच्या सुपरस्टार नागार्जुनशी ( nagarajun ) संबंधित जोडले गेले होते. खूप चर्चा झाली होती त्यावेळी या नावाची.
तिला आधीच लग्न झालेल्या नागार्जुनशी लग्न करायचे होते. पण तसे होऊ शकले नाही. आणि कदाचित म्हणूनच वयाच्या पन्नाशीनंतरही तब्बू अद्याप कुमारिका आहे. लग्नच केलेले नाही. नाराज आहे किंवा लग्नावर तिचा आता विश्वास चं नसेल उरला. बरं एवढं सगळं असताना ही तिचा कामावरचा थोडा सुद्धा फोकस हललेला नाही.
अभिनेत्री परवीन बाबी ही सतत चर्चेत असायची. ( parveen babi )यांनी वयाच्या 50 व्या वर्षीच जगाला निरोप दिला होता. खूप कमी वयात. महेश भट्ट, कबीर बेदी आणि डॅनी यासारख्या विवाहित लोकांमुळे ती खूप निराश झाली होती. कारण त्यांच्याशी तिचे संबंध होऊन ही सुखी राहू शकली नाही. परवीन बाबी जिवंत होती तोपर्यंत कुमारी राहिली. म्हणजे बघा इथे अशी विचारधारा असते. जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. त्यात मात्र काहीही बदल होत नाही.
विवाहित जावेद अख्तरवरही शबाना आझमीचे प्रेमात पडले होते. जेव्हा त्यांचे प्रेम फुलले तेव्हा दोघांचेही लग्न झाले. जावेद अख्तरने शबानाशी लग्न करण्यासाठी पत्नी हनी इराणीशी घटस्फो’ट दिला. इथे मात्र विवाहबाह्य संबंध असलेलं प्रेम जिंकलं होतं.
एका काळातील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुरैय्यानेही कधी लग्न केले नाही. तिचे देव आनंदवर खूप प्रेम होते. पण देव आनंदचे आधीच लग्न झाले होते. देव आनंदच्या इच्छेसाठी सुरैया आजीवन कुमारी राहिली.
असे जर नावे शोधली तर खूप सापडतील. कारण असे अनेक उदाहरणे आहेत. काहींनी संसार मांडला तर काहींचा सुरू होण्याआधी मोडला. तर अशीच माहिती आम्ही आपल्याला देत राहू तुम्ही वाचत रहा स्टार मराठी न्यूज. काळजी घ्या सुरक्षित रहा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.