या कारणामुळे सुधीर जोशींच्या घरात बोमन इराणी सत्यनारायणाच्या पूजेला बसले होते, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही किस्से असे असतात की ते कधीच विसरता येत नाहीत. किंवा त्यांचं महत्व खूप जास्त वाटायला लागतं. मराठी कलाकार आणि हिंदी कलाकार यांची मैत्री चे कितीतरी उदाहरण आपण पाहिलेली असेल. त्यात सुधीर जोशी आणि बोमन इराणी यांची मैत्री तर खूप अतूट नात्याची होती. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात. काय आहे व्हायरल होणारा त्यांच्या मैत्रीचा किस्सा.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणजे सुधीर जोशी. ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातली त्यांची भूमिका, डायलॉग आजही सोशल मीडियावर मीम बनवून शेअर केले जातात. सुधीर जोशी यांच्या मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील भूमिका विशेष गाजल्या होत्या. फार कमी लोकांना माहित आहे की सुधीर जोशी हे इंग्रजी नाटकांमध्ये देखील प्रचंड लोकप्रिय होते.

See also  सलमान खान आणि संजय दत्तचे झाले होते कडाक्याचे भां'ड'ण, कारण ऐकून थक्क व्हाल!

सुधीर जोशी आणि बोमन इराणी यांच्या ‘आय अॅम नॉट बाजीराव’ या नाटकाची आजही चर्चा केली जाते. नुकताच बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांनी एका युट्युब लाइव्ह शो दरम्यान सुधीर जोशी यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या.

सुधीर जोशी यांनी बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांना त्यांचा मुलगा मानला होता. खुद्द बोमन इराणी यांनी सौरव पंतशी गप्पा मारताना याचा खुलासा केला आहे.

सुधीर जोशी आणि बोमन इराणी यांनी ‘आय अॅम नॉट बाजीराव’ या इंग्रजी नाटकामध्ये एकत्र काम केले होते. तेव्हा सुधीर जोशी यांच्यासोबत नाटकात काम करण्याचा अनुभव कसा होता? असा प्रश्न सौरवने बोमन इराणी यांना विचारला होता. ‘सुधीर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा एखाद्या कॉलेजला जाण्यासारखा होता. त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या.

See also  या बॉलीवुड अभिनेत्यासमोर उद्योगपती अंबानी आहेत अगदी शून्य; करोडोंच्या संपत्तीचा आहे हा मालक...

मी माझ्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींकडून दररोज काही तरी शिकत असतो पण सुधीर जोशी यांनी मला खूप काही शिकवले’ असे बोमन इराणी म्हणाले.

‘सुधीर जोशींचे माझ्यावर आणि माझी पत्नी झेनोबियावर प्रचंड प्रेम होते. एकदा त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यांना मुलं नव्हतं म्हणुन त्यांनी मला विचारले होतो की तू पूजेला बसशील का? मी होकार दिला. त्यानंतर मी धोतर नेसले, माझ्या पत्नीने नव्वारी साडी नेसली आणि आम्ही पूजेला बसलो.

त्यांनी आम्हाला त्यांच्या मुलाप्रमाणे वागणुक दिली. आम्हाला त्यांच्या कुटूंबाचा एक भाग बनवला. हे पाहुन त्यावेळी मला खूप आनंद झाला होता’ असे बोमन इराणी पुढे म्हणाले.

बोमन इराणी आणि सुधीर हे किती जवळपास चे आणि चांगले मित्र होते हे यावरून लक्षात आलेच असेल. दोघांच्या मैत्रीला त्रिवार सलाम.

See also  अमिताभ, गोविंदासह फिल्म इंडस्ट्रीने ज्यांच्या डान्स स्टेप्स कॉ'पी केल्या त्या मराठमोळ्या भगवान दादांच्या रंजक गोष्टी जाणून घ्या...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment