एकेकाळी हॉटेल ताजमध्ये वेटर म्हणून काम करणारा मुलगा आज आहे, बॉलीवूड मधील श्रीमंत अभिनेता…

आज दि. २ डिसेंबर २०२० सर्वप्रथम हॅप्पी बर्थडे बोमन इराणी… आज बॉलीवूड मधील या गुणी, हरहुन्नरी अशा चरित्र अभिनेत्याचा वाढदिवस. आपल्यापैकी अनेकांना त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संघर्षमय आयुष्याबद्दल अज्ञात असलेल्या गोष्टी या लेखाद्वारे आपल्यासमोर मांडत आहोत.

आजच्या घडीला प्रसिद्ध अभिनेता बोमन इराणी हा बॉलिवूडमध्ये दमदार आणि हरहुन्नरी अभिनयासाठी ओळखला जातो. बोमनने आपल्या अभिनय कारकीर्दीत अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कधी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ‘व्हायरस’ तर कधी ‘डॉक्टर अस्थाना’ इ. बोमन इराणीचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९५९ रोजी झाला.

बाकीच्या ऍक्टर्सनी ज्यावेळी आपापल्या कारकीर्दीत मैलाचा दगड गाठला होता तेव्हा बोमन फिल्म इंडस्ट्रीत आला. वयाच्या चक्क ४२ व्या वर्षी त्याने अभिनयात पदार्पण केले, आणि आज काही मोजक्या यशस्वी स्टार्सच्या यादीत त्याचा समावेश आहे. आज त्यांच्या वाढदिवशी त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक रंजक गोष्टी जाणून घेऊयात …

READ  विराट कोहली नंतर या प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरच्या घरी येणार पाहून, नाव ऐकून थक्क व्हाल!

अभिनेता बोमन इराणी यांना अभिनयाची आवड आहेच. पण फारच कमी लोकांना हे माहिती आहे की त्याला फोटोग्राफीची सुद्धा खूप आवड आहे. तो एक उत्कृष्ट व्यावसायिक फोटोग्राफर आहे. जेव्हा तो बारावीत शिकत होता, त्यावेळी तो शाळेत क्रिकेट सामन्यांची छायाचित्रे घेत असे.

नंतर त्या संघांना, खेळाडूंना तो ती छायाचित्रे विकून पैसेही मिळवत असे. यानंतर त्यांनी पुण्यात प्रथमच बाईक शर्यतींचे व्यावसायिक फोटोशूट केले. त्यानंतर मुंबईतल्या बॉक्सिंग वर्ल्ड कपला सुद्धा कव्हर करण्याची संधी त्याला मिळाली.

अभ्यासक्रम संपल्यानंतर बोमन इराणी यानी २ वर्ष मुंबईतील हॉटेल ताजमध्ये काम केले. बोमन तेथे वेटर आणि रूम सर्व्हिस स्टाफ म्हणून काम करत होता. काही खासगी कारणास्तव, त्यांना २ वर्षांत ही नोकरी सोडावी लागली. यानंतर त्याने आपल्या कुटूंबासह बेकरी व्यवसायात काम करण्यास सुरवात केली. बोमनने आपल्या आईबरोबर बेकरीच्या दुकानात तब्बल १४ वर्षे काम केले. मग एक दिवस…

READ  सुपरस्टार अभिनेता अजय देवगण आणि काजोल सिंगापूरला राहायला जाणार, इथं राहण्यास असुरक्षितता वाटते, कारण ऐकून थक्क व्हाल!

त्याची सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक श्यामक दावर यांच्याशी भेट झाली. हीच ती भेट जिच्यामुळे त्याच्या नशिबाने अशी उचल खाल्ली की त्याने मागे वळून पाहिलेच नाही. श्यामक दावर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी बोमनला त्याचे अभिनय कौशल्य पाहून रंगभूमीवर काम करण्याचा सल्ला दिला. रंगभूमीवर काम करतांना बोमनने अनेक चित्रपटांमध्येही छोट्यामोठ्या विनोदी भूमिका साकारल्या.

बोमन एक पारशी गृहस्थ आहे आणि त्याने साकारलेली पात्रेही पारशी होती. त्यानंतर २००१ मध्ये एव्रिबडी सेज आय एम फाइन’ आणि ‘लेट्स टॉक’ या दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले. पण २००३ साली आलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटापासून त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. बोमनने आतापर्यंत ५० हून अधिक चित्रपट केले आहेत. या चित्रपटांमध्ये ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘दोस्ताना’, ‘युवराज’, ‘थ्री इडियट्स’, ‘तीनपत्ती’, ‘हम तुम और भूत’, ‘हाऊसफुल’, ‘हाऊसफुल 2’ आणि ‘संजू’ या सुप्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे.

READ  बाहुबली फेम प्रभासने विकत घेतली एवढ्या कोटींची कार, किंमत जाणून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment