बॉयफ्रेंडच्या “या” प्रश्नांची उत्तरे देणे मूलींना वाटते त्रासदायक, त्यामुळे चुकूनही तुम्ही हे प्रश्न कधी विचारू नका

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

प्रेमाचे नाते हे खूप सुंदर असते. पण तितकेच ह्या नात्याला विश्वासाने, मायेने, समजुतीने सांभाळावे देखील लागते. बहुतेक लोकांना अगदी पहिल्याच नजरेत खरं प्रेम होते. तर काहीजण मात्र प्रेमात खरेपणा, ईमानदारी ह्या सर्व गोष्टींना जास्त महत्त्व देतात. प्रेमाच्या नात्यात प्रत्येकाच्या आपल्या पार्टनर कडून खूप इच्छा- अपेक्षा असतात. म्हणून तर लहानसहान गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात.

मुलांना रिलेशनशिपमध्ये आपल्या प्रेयसीला अनेक प्रश्न विचारावेसे वाटतात. तिच्या आवडीनिवडींविषयी, भूतकाळाविषयी इ. प्रश्नांचा काहूर मुलांच्या मनात निर्माण होतो. आपले नाते सुरळितपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हावी यासाठी मुलं आधीच पूर्ण काळजी घेतात. यासाठी आपल्या मनात कोणतीही खंत न ठेवता ते रिलेशनशिप मध्ये आपल्या प्रेयसीला हे प्रश्न आवर्जून विचारतात. ज्यांची उत्तरे देणे, हे प्रत्येक मूलीसाठी खूप अवघड असते. यासाठी हे प्रश्न आपल्या गर्लफ्रेंडला मुळीच विचारू नका, अन्यथा तुमचे रिलेशनशिप धोक्यात येऊ शकते.

मी तुझ्या आयुष्यातील पहीलं प्रेम आहे का? : रिलेशनशिपमध्ये आल्यावर मुलं हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात की, आपल्या गर्लफ्रेंड च्या आयुष्यात आपणच पहिले आहोत का…किंवा तिने याआधी कुणावर प्रेम केलं आहे. जर तिने याआधी कुणाला ङेट केले असेल, तर मग त्यांचे नाते का बरं तुटले. अशाप्रकारे या भूतकाळातील प्रश्नांची उत्तरे देणे, सर्वांना कठीण असते. परंतु नाइलाजाने शेवटी मूलींना ही उत्तरे द्यावी लागतात.

See also  या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या रायने काढले अभिषेक बच्चनला चक्क बेडरूमच्या बाहेर, कारण...

रिलेशनशिपमध्ये असताना दोघांसाठी भूतकाळातील गोष्टी जाणून घेणे, महत्त्वाचे आहे. परंतु सारखे सारखे मागील गोष्टी खोदून विचारणे, हे मात्र चुकीचे ठरते. त्यामुळे तुमच्या नात्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

तुझ्या घरच्यांना मी आवडेल का? : आपल्या प्रेयसीच्या घरच्यांना भेटणे, हे सर्व मुलांसाठी एक किचकट काम असते. तिच्या कुटुंबाला भेटल्यावर ते आपल्या फॅमिलीची, नोकरीची इ. विचारपूस करतील. त्यांना सर्व गोष्टी पटल्या तर ठीक. यासाठी मुलं आधीच मूलींना हे विचारतात. त्यामुळे मूलींना पण त्यांच्या समाधानासाठी “हो” असे उत्तर द्यावे लागते.

परंतु जोपर्यंत तुमचे नाते घट्ट होत नाही. तोपर्यंत हे प्रश्न प्रेयसीला विचारू नका. कारण हे प्रश्न निर्माण झाल्यावर फक्त वाद उद्भवतात. तुमच्या स्वभावाची पारख करूनच मुलीचे आई- वडील योग्य निर्णय घेतात.

माझ्या फॅमिली सोबत जुळवून घेता येईल का? : लग्न करताना सगळी मुलं आपल्या प्रेयसीला तुला माझ्या फॅमिली सोबत जुळवून घेता येईल का, हा प्रश्न हमखास विचारतात. तसे पाहता त्यांचा हा विचार अगदी बरोबर आहे. कारण मुलांना आपल्या कुटुंबाची काळजी घेणे महत्त्वाचे असते. परंतु लग्नाआधी या प्रश्नाचे उत्तर देणे, हे प्रत्येक मूलीसाठी थोडे अवघड ठरते.

See also  करवा चौथला पतीने मॅचिंग बांगड्या दिल्या नाहीत, म्हणून या महिलेने केले असे काही, जे ऐकून तुम्ही तर हैरान व्हाल!

याबाबतीत मुलांनी आपल्या भावना व विचार प्रेयसीजवळ मांडले पाहिजे. पण तुम्ही जर तिच्या बाजूने विचार केलात तर ती तुम्हांला योग्य वाटेल. कारण जोपर्यंत आपण त्या व्यक्तींसोबत राहत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यांचे स्वभाव व विचार समजणारच नाहीत. त्यामुळे लग्नाआधी या गोष्टीबद्दल स्पष्ट सांगणे मूली टाळतात.

व्हर्जिन आहेस का? : रिलेशनशिपमध्ये आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, ती व्यक्ती शरीराने व मनाने फक्त आपलीच असावी, असे प्रत्येक मुलाला वाटते. त्यामुळे बहुतेकदा आपली खात्री करुन घेण्यासाठी ते प्रेयसीला हा प्रश्न आवर्जून विचारतात. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, एखादी मूलगी सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, पण तिला आपल्या व्हर्जिनीटी वरून जज केलेले मुळीच आवडत नाही. कारण व्हर्जिनीटी ब्रेक होणे, हे कोणत्याही मूलीच्या हातात नसते.

See also  अभिनेत्री सुष्मिता सेनने आपल्या ब्रेकअपविषयी केला हा मोठा खुलासा; नेमकं काय आहे तिचं मत जाणून घ्या.

ह’ल्ली मूली टेनिस, बँङमिंटन, कराटे, व्यायाम, ङान्स अशा अनेक नवनवीन गोष्टी करतात. त्यामुळे या दरम्यान त्यांची व्हर्जिनीटी ब्रेक होऊ शकते. यासाठी मूलींना हा प्रश्न विचारणे शक्यतो टाळा. नाहीतर तुमच्यावरील तिचा विश्वास कमी होत जाऊन नाते संपुष्टात येऊ शकते.

लग्नानंतर नोकरी करशील का? : बहुतेक मुलांना लग्नानंतर नोकरी करणारी किंवा नोकरी न करणारी पत्नी हवी असते. याबाबतीत दोघांचेही विचार सारखेच असतील असे नाही. अनेकदा मुलं लग्नाआधी प्रेयसीला तू नंतर जॉब करायचा नाही, असे ठामपणे बजावून सांगतात.

मात्र प्रत्येक मूलीचे स्वतःचे असे एक करियर असते. त्यामुळे तिच्या करियर मध्ये मुलांनी दखल देऊ नये. त्याऐवजी दोघांनी व्यवस्थित नियोजन करून लग्नानंतरचे आयुष्य सुखी जगावे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment