सभागृहात गैरवर्तन केल्या प्रकरणी भाजपचे ‘हे’ 12 आमदार निलंबित

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुंबई: राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. सभागृहात गोंधळ केल्या प्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकात राडा झाल्याचे वृत्त आहे. सभागृहात माजलेल्या गोंधळा दरम्यान भाजप आमदारांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ करत गैरवर्तन केल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

भाजप आमदारांचे वर्तन लांछनास्पद असून काळिमा फासणारे आहे असंही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “आमच्या आमदारांचे काही शब्द आणि वर्तवणूक चुकीची होती हे मी मान्य करतो. झालेल्या प्रकरणाबाबत आम्ही तुमची मागली असून कोणतीही चर्चा न करता कारवाई करू नका किंवा कारवाईचा प्रस्ताव आणू नका. फक्त अध्यक्ष म्हणूनच नाहीतर आम्ही तुमचा भास्करराव जाधव म्हणूनही सन्मान करतो. ”

See also  ना परीक्षा, ना तणाव तरीही दहावीचे ‘एवढे’ विद्यार्थी’ नापास, ‘एवढ्या’ शाळांचा शून्य टक्के निकाल , जाणून घ्या दहावच्या निकालाची आकडेवारी

ठराव संमत झाल्या नंतर देवेंद्र फडणवीस संतापले. ते म्हणाले, “याठिकाणी तुमचे बहुमत आहे म्हणून तुम्ही एकतर्फी ठराव मंजूर करून आमच्या 12 आमदारांचे निलंबन केले आहे. हा लोकशाहीचा खून आहे. विरोधकांची संख्या कमी करण्याचा हा सरकारचा डाव आहे. आम्ही सरकारवर नेहमी टीका करतो म्हणून त्यांनी आमची मुस्कटदाबी केलेली आहे. त्यामुळे आम्ही या गोष्टीचा निषेध करत असून आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत.”

हे आहेत 12 आमदार

अभिमन्यू पवार, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुंटे, आशिष शेलार, योगेश सागर, नारायण कुचे, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, पराग आळवणी, कीर्ती कुमार भांगडिया, हरिष पिंगळे या 12 आमदारांचे 1 वर्षासाठी निलंबन झाले आहे.

Leave a Comment